EV Car Subsidy 2025: महाराष्ट्र राज्य सरकारने इलेक्ट्रिक कार वर तब्बल 2 लाख रुपयांची सबसिडी देण्याची मोठी घोषणा केली आहे. तुम्ही सुद्धा कार घेण्याचे नियोजन करत असाल तर हा लेख पूर्ण वाचा तुम्हाला फायदा होऊ शकतो. त्याचबरोबर तुम्हाला नोंदणी शुल्क आणि टोल मध्ये सुद्धा सूट मिळू शकते. इलेक्ट्रिक कार खरेदीवर तुम्हाला अनेक प्रकारचे फायदे मिळू शकतात.
चला तर जाणून घेऊ EV Car Subsidy म्हणजे नेमकं काय? इलेक्ट्रिक कार्ड खरेदी करणाऱ्या इच्छुक नागरिकांना आता काय फायदे मिळणार तसेच याचा लाभ कोणाला मिळणार याबाबत संपूर्ण माहिती विस्तार मध्ये या लेखाचा माध्यमातून जाणून घेऊ.
लाडकी बहीण योजना धक्का! तब्बल ४२ लाख अर्ज रद्द, २६ लाख महिलांना ऑगस्टचा हप्ता थांबणार
EV Car Subsidy म्हणजे नेमकं काय? (थोडक्यात माहिती)
मित्रानो EV Car म्हणजेच इलेक्ट्रिक कार जी पेट्रोल किंवा डिझेल अशा कुठल्याही इंधनावर चालत नाही. ती चालते तर इलेक्ट्रिसिटी मुळे. इलेक्ट्रिक कारमध्ये खास बॅटरी असते जी वीजेवर चालते. ही बॅटरी चार्ज करावी लागते आणि एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर कार ठराविक किलोमीटरपर्यंत सहज चालवता येते. यामुळे इंधनाचा खर्च वाचतो आणि प्रवासही पर्यावरणपूरक होतो. तर EV Car मुळे प्रदूषण सुद्धा कमी होत असल्यानी सरकार अशा कार खरेदी करण्यासाठी नागरिकांना Maharashtra EV Car Subsidy म्हणजेच अनुदान सुद्धा देते.
इलेक्ट्रिक कार चालवायला खर्च कमी लागतो. येणाऱ्या काही काळामध्ये आपल्याला रास्तवे इलेक्ट्रिक कार जास्त दिसायला लागतील. त्यामुळे तुम्ही सुद्धा नियोजन करत असाल तर हि संधी तुमच्यासाठी चांगली आहे.
EV Car खरेदीवर मिळणारे फायदे
सरकारने जाहीर केलेल्या नवीन EV पॉलिसी अंतर्गत इलेक्ट्रिक कार खरेदीदारांना अनेक महत्त्वाचे फायदे मिळणार आहेत. व्यावसायिक वापरासाठी खरेदी केल्या जाणाऱ्या 25,000 इलेक्ट्रिक कार्सना 2 लाख रुपयांपर्यंतची सबसिडी मिळेल, तर वैयक्तिक वापरासाठी खरेदी केलेल्या 10,000 कार्सना 1.5 लाख रुपयांपर्यंत सवलत दिली जाईल.
याशिवाय इलेक्ट्रिक कारधारकांना मुंबई-पुणे, मुंबई-नाशिक आणि अटल सेतूसारख्या मोठ्या एक्सप्रेसवेवर टोलमधून पूर्ण सूट मिळणार आहे. सर्व इलेक्ट्रिक कार्सवर नोंदणी शुल्क आणि रोड टॅक्स देखील माफ केला जाईल. तसेच प्रत्येक 25 किलोमीटरवर चार्जिंग स्टेशन उभारले जाणार असल्यामुळे लांब पल्ल्याचा प्रवास करणेही सोपे होणार आहे.
इलेक्ट्रिक कार खरेदीसाठी सुवर्णसंधी
जर तुम्ही इलेक्ट्रिक कार खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर आत्ता हा सर्वात योग्य काळ आहे. महाराष्ट्र सरकारच्या नवीन EV Car Subsidy Maharashtra पॉलिसीमुळे इलेक्ट्रिक कार्स आधीपेक्षा स्वस्त झाल्या आहेत. टोल आणि नोंदणी शुल्कातून मिळणारी सूट मिळाल्यामुळे इलेक्ट्रिक कार खरेदी केल्यानंतरचा एकूण खर्च खूपच कमी पडतो.
याशिवाय Tata Motors सारख्या कंपन्या 1.86 लाखांपर्यंतचे अतिरिक्त फायदे देत आहेत, ज्यामध्ये फ्री चार्जिंग सुविधा आणि एक्स्चेंज बोनसचा समावेश आहे. त्यामुळे इलेक्ट्रिक कार खरेदी करून तुम्ही पैसे वाचवू शकता आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभही घेऊ शकता.
इलेक्ट्रिक कार सबसिडीचे संपूर्ण मार्गदर्शन
वाहन प्रकार | सबसिडी रक्कम | लाभार्थी संख्या |
---|---|---|
वैयक्तिक इलेक्ट्रिक कार | ₹1.5 लाख पर्यंत | 10,000 कार्स |
व्यावसायिक/कमर्शियल कार | ₹2 लाख पर्यंत | 25,000 कार्स |
मी नितिकेश, मागील 4 वर्षांपासून महाराष्ट्रातील विविध शासकीय माहिती, सरकारी नौकरी माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम करतोय. marathisathi.in या वेबसाईटवर तुम्हाला सर्व योजना एका ठिकाणी, अगदी सोप्या भाषेत समजून घेता येतील, कारण तुमचा हक्काचा लाभ मिळवायला माहिती असणं गरजेचं आहे!