Gai Gotha Yojana: गोठा बांधण्यासाठी गाई गोठा अनुदान योजनेतून मिळवा 3 लाख रुपयांचे अनुदान, अर्ज सुरु

Gai Gotha Yojana
WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Gai Gotha Yojana Maharashtra 2025: महाराष्ट्र राज्य सरकार द्वारा राज्यातील ग्रामीण क्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी हि योजना सुरु केली आहे. गाई गोठा योजना चा माध्यमातून शेतकऱ्यांना गोठा निर्मितीसाठी 3 लाख पर्यंतचे अनुदान दिले जातील. योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन दोन्ही पद्धतींनी अर्ज केल्या जाऊ शकतो.

महाराष्ट्रातील अनेक शेतकरी हे शेती सोबत गाई, म्हशी, शेळी, मेंढी चे सुद्धा पालन करतात त्यामुळे त्यांना गोठा असणे आवश्यक असतो. हि योजना मुख्यतः शेतकऱ्यांसाठी आहे, गाईंना स्वछ आणि हवेशीर ठेवण्यासाठी मजबूत गोठा बांधण्यासाठी राज्य सरकार आर्थिक मदत करते. तुम्हाला पण या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर या लेख मध्ये दिलेली माहिती सविस्तर वाचा.

महिलांचं आयुष्य बदलणार सखी वन स्टॉप सेंटर योजनाSakhi One Stop Centre Yojana Maharashtra 2025

Gai Gotha Yojana 2025 म्हणजे काय?

ज्या शेतकऱ्यांकडे गाई किंवा म्हशी आहेत त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. गाई, म्हशींचा संख्येनुसार तुम्हाला या योजनेचा लाभ दिल्या जाणार आहे. याची प्रत्येक्षात माहिती या लेख मध्ये पुढे उपलब्ध आहे.

राज्यातील शेतकरी हा नेहमी शेतीवर अवलंबून तर असतोच परंतु कधी कधी पावसाची साथ नसल्या मुळे किंवा जास्त पावसामुळे शेतीचे नुकसान होते. त्यामुळे शेतकरी हा शेतीव्यतिरिक्त व्यवसाय म्हणून गाई, शेळी किंवा म्हशी पालन करतात. हा व्यवसाय शेतकऱ्याने आणखी मोठ्या प्रमाणात चालवायला पाहिजे म्हणून सरकार ने Gai Gotha Yojana ची सुरु केली आहे.

महाराष्ट्र गाई गोठा योजना ची वैशिष्ट्ये

शेतकऱ्यांना गोठा बांधताना सरकारकडून तांत्रिक मार्गदर्शन दिलं जाणार आहे, ज्यामुळे गोठा मजबूत आणि योग्य पद्धतीने उभारता येईल. यासोबतच गोठा बांधण्यासाठी शेतकऱ्यांना थेट आर्थिक सहाय्यही मिळणार आहे, जे त्यांच्या खर्चाचा भार हलका करेल. शेणखत व जैविक खतासाठी योग्य नियोजन करून शेतीस मदत होईल. गोठ्याची स्वच्छता राखण्यासाठी पाण्याची व मलमूत्र निचऱ्याची सोय केली जाणार आहे, जे पशुधनाच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. तसेच शेतकऱ्यांचे पशुधन सुरक्षित राहावे यासाठीही शासनाकडून विविध प्रकारची मदत उपलब्ध करून दिली जाणार आहे.

योजनेचा उद्देश

गाई गोठा योजना चा मुख्य उद्देश आहे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा गाईंना योग्य निवास म्हणजेच गोठा निर्मित करण्यासाठी मदत करणे. आरोग्यदायी स्वछ आणि सुरक्षित गोठ्यामुळे गाईचे आरोग्य चांगले राहते आणि दूध उत्पादनामध्ये वाढ होते तसेच शेण खताचा वापर आणखी प्रभावी पद्धतींनी केल्या जाऊ शकतो.

योजनेसाठी पात्रता

Gai Gotha Yojana या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार हा महाराष्ट्रातील रहिवासी असणे आवश्यक आहे. ही योजना अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीमधील शेतकऱ्यांसाठी उपलब्ध आहे. लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्याकडे एका पेक्षा जास्त गाई असणे गरजेचे आहे. गोठा बांधण्यासाठी शेतकऱ्याजवळ योग्य जागा असावी आणि ती जागा अर्जदाराच्या नावावर नोंदणीकृत असणे आवश्यक आहे. तसेच, एका शेतकऱ्याला या योजनेचा लाभ फक्त एकदाच मिळू शकतो.

आता याच महिलांना मिळणार फ्री गॅस सिलेंडरMofat Gas Cylinder Yojana 2025

योजनेतून मिळणारे अनुदान

1किमान 2 आणि कमाल 6 गायी/ म्हशी साठी77,188 रुपयांचे अनुदान
26 किंवा त्यापेक्षा 18 पर्यंत गायी/ म्हशी साठी1,54,373 रुपयांचे अनुदान
318 पेक्षा जास्त गायी, म्हशी साठी2,31,564 रुपयांचे अनुदान

योजनेचे फायदे

सुरक्षित आणि स्वच्छ गोठ्यामुळे गाईंचे आरोग्य चांगले राहते, ज्याचा थेट परिणाम दूध उत्पादनावर होतो. गाई आरोग्यदायी असल्यानं दूध अधिक प्रमाणात मिळते, त्यामुळे शेतकऱ्याला आर्थिक फायदा होतो. दूध विक्रीसह गाईच्या शेणामुळे तयार होणाऱ्या सेंद्रिय खताचा वापर शेतीत केल्यामुळे उत्पादनात वाढ होते. त्यामुळे शेतकरी अधिक उत्पन्न मिळवू शकतो.

याशिवाय शेण व गोमूत्र गोळा करून सेंद्रिय खत तयार करून ते विक्रीसाठी वापरता येते. यामुळे शेतकरी अतिरिक्त उत्पन्न मिळवू शकतो. गोठा स्वच्छ असल्यामुळे शेती परिसर आरोग्यदायी आणि स्वच्छ राहतो. तसेच, या योजनेतून मिळणाऱ्या आर्थिक सहाय्यामुळे शेतकऱ्याला गोठा बांधताना कोणताही आर्थिक तणाव जाणवत नाही.

Gai Gotha Yojana अर्ज करण्यासाठी लागणारे कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • रहिवासी दाखला
  • गाईंची नोंद (पशुधनाचा तपशील)
  • सातबारा उतारा (7/12)
  • बँक खाते तपशील (IFSC कोडसह)
  • फोटो (गोठा बांधण्याची जागा दर्शवणारा)
  • पशुपालन प्रमाणपत्र (ग्राम पंचायत किंवा पशुवैद्यकीय अधिकारी कडून)

महाराष्ट्र गाई गोठा अनुदान योजना साठी अर्ज प्रक्रिया

Gai Gotha Yojana साठी अर्ज प्रक्रिया हि ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतींनी करता येणार आहे. तुम्हाला योग्य वाटेल त्या पद्धतींनी अर्ज करा मात्र दोन्ही पद्धती साठी सगळे आवश्यक कागदपत्रे असणे आवश्यक आहे.

तुम्हाला जर घर बसल्या ऑनलाईन अर्ज कराचा असेल तर mahaegs.maharashtra.gov.in या अधिकृत वेबसाईट वर जाऊन ऑनलाईन फॉर्म भरायचा आणि सगळे आवश्यक कागदपत्रे अपलोड करून फॉर्म ला सबमिट करायचा असतो.

जर तुम्हाला ऑनलाईन अर्ज करता येत नसेल तर ऑफलाईन सुद्धा करू शकता. त्यासाठी तुम्हाला तुमचा गावातील ग्रामपंचायत मध्ये जाऊन फॉर्म घ्यायचा आहे आणि त्या फॉर्म मध्ये संपूर्ण विचारलेली माहिती भरायची सोबत आवश्यक कागदपत्रे जोडायचे आणि ग्राम सचिवांकडे फॉर्म ला जमा करायचे.

संपर्क माहिती

तालुका पशुसंवर्धन कार्यालय / ग्रामसेवक कार्यालय
जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालय
महाराष्ट्र शासनाची अधिकृत वेबसाइट: mahaegs.maharashtra.gov.in
आपले सरकार सेवा केंद्र
हेल्पलाइन: 1800-120-8040 (कृषी विभाग)

निष्कर्ष

Gai Gotha Yojana हि महाराष्ट्रातील फक्त योजना च नाही तर शेतकऱ्यांना गाई पालन व्यायवसायासाठी मिळालेली साथ आहे. स्वच्छता, योग्य निवास, आणि आरोग्य या सर्व गोष्टी गाईंच्या देखभालीसाठी तितक्याच महत्त्वाच्या आहेत जितकं अन्नपाण्याचं पोषण. जर तुमच्याकडे गाई असतील आणि तुम्ही योजनेसाठी पात्र असाल तर आजच या योजनेसाठी अर्ज करा आणि लाभ घ्या.

अश्याच नवीन योजनेच्या माहिती साठी आमचा What’s App Group ला Join करा.

FAQ

1) शेतकऱ्याने स्वतः गोठा बांधल्यास अनुदान मिळेल का?

होय, गोठा शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार बांधलेला असल्यास, तपासणीनंतर अनुदान मंजूर केले जाऊ शकते.

2) Gai Gotha Yojana अर्ज केल्यानंतर किती दिवसांत काम सुरू होते?

अर्ज सादर केल्यानंतर साधारणतः 30 ते 60 दिवसांत अधिकाऱ्यांकडून जागेची पाहणी होते आणि मंजुरीनंतर काम सुरू करता येते.

3) Gai Gotha Yojana गाई नसताना योजना लागू होईल का?

नाही. ही योजना फक्त त्यांच्यासाठी आहे ज्यांच्याकडे गाई आहेत आणि त्या प्रत्यक्ष पाळल्या जात आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *