Gatai Kamgar Yojana Maharashtra 2025: गटई कामगारांनो, पत्र्याचा स्टॉल मोफत मिळवायचा असेल हा अर्ज करा

Gatai Kamgar Yojana
WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

महाराष्ट्र सरकार राज्यातील गटई काम करणाऱ्या नागरिकांसाठी Gatai Kamgar Yojana Maharashtra 2025 सुरू करत आहे. या योजनेतून लाभार्थी पात्र गटई कामगारांना १००% अनुदानावर पत्र्याचे स्टॉल दिले जाणार आहे. योजनेसाठी अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे तरी सर्व इच्छुक लाभार्थी पात्र नागरिकांनी लवकरात लवकर अर्ज करून योजनेचा लाभ घ्यावा.

गटई कामगार योजना महाराष्ट्रातल्या गटई काम करणाऱ्या नागरिकांसाठी अतिशय महत्वाची व उपयुक्त योजना ठरते. तर आपण या लेखाच्या माध्यमातून जाणून घेऊ Maharashtra Gatai Kamgar Yojana Online Apply करता येते कि नाही आणि योजनेचे अन्य लाभ काय मिळणार अशी संपूर्ण माहिती उपलब्ध आहे.

Lakshmi Mukti Yojana Maharashtra 2025: महिलांनो आता फक्त एक अर्ज करा अणि जमिनीचा हिस्स्यात सहखातेदार बना

Gatai Kamgar Yojana Maharashtra म्हणजे काय?

मित्रांनो सर्वप्रथम आपण जाणून घेऊ गटई कामगार कोण असतात. जे नागरिक रस्त्याच्या कडेला बसून आपला स्वतःचा छोटासा व्यवसाय करतात जसे बूट, बेल्ट, चप्पल, बॅग किंवा इतर चामड्याच्या वस्तू दुरुस्त करण्याचे काम करतात अश्या नागरिकांसाठी हि योजना आहे. गटई कामगार योजनेतून अशा सर्व नागरिकांना १००% अनुदानावर पत्र्याचे स्टॉल दिले जाते.

हि योजना महाराष्ट्र शासनाच्या बांधकाम कामगार कल्याण मंडळामार्फत राबवली जाणारी एक कल्याणकारी योजना आहे. या योजनेतून अनुसूचित जाती प्रवर्गातील चर्मकार समाजातील गटई कामगारांसाठी तसेच बांधकाम क्षेत्रात नोंदणीकृत गटई कामगारांना लाभ दिला जातो.

गटई कामगार योजनेचा मुख्य उद्देश काय?

गटई कामगारांना पावसात, उन्हात काम करावे लागते आणि त्यांच्याकडे दुकान सुद्धा नसते त्यामुळे शासनाने हा निर्णय घेतला आहे. या योजनेचा मुख्य उद्देश आहे रस्त्यावर बसून व्यवसाय करणाऱ्या नागरिकांना उष्णता, पाऊस आणि वारा यापासून संरक्षण मिळावे. पत्र्याच्या स्टॉलमुले त्यांना ऊन आणि पावसापासून संरक्षण मिळेल. तसेच त्यांच्या व्यवसायात वृद्धी येईल उत्पन्न सुद्धा वाढेल.

योजनेचे फायदे

या योजनेतून लाभार्थी पात्र नागरिकांना अनेक फायदे मिळतील. गटई कामगारांना पूर्णपणे मोफत सरकारी मदतीवर लोखंडी पत्र्याचा स्टॉल मिळणार आहे. या स्टॉलमुळे त्या नागरिकांचे व्यवसाय स्थैर्य होईल तसेच उत्पादन वाढेल. या नागरिकांना उन्हात, पावसात व्यवसाय करावा लागते, परंतु आता या स्टॉलमुळे त्यांना आधार मिळेल. व्यवसायासाठी लागणारे सर्व वस्तू सुरक्षित राहतील अशे अनेक प्रकारचे लाभ या लाभार्थी पात्र नागरिकांना मिळेल.

योजनेसाठी पात्रता

गरजू नागरिकांना योजनेचा लाभ मिळावा अन्य कोणी लाभ घेऊ नये म्हणून शास्नानाने पात्रता जाहीर केल्या आहे. सर्वप्रथम अर्जदार गटई कामगार हा महाराष्ट्राचा स्थायी रहिवासी असणे आवश्यक आहे. तसेच तो व्यक्ती अनुसूचित जाती (चर्मकार समाज, मोची, ढोर, होलार वगैरे) या समाजातील असायला पाहिजे. अर्जदाराचे वय कमीत कमी १८ आणि जास्तीत जास्त ५० असणे आवश्यक आहे.

सर्वात महत्वाचे म्हणजे जिथे स्टॉल उभारायचे आहे ती जागा ग्रामपंचायत/नगरपालिका/महानगरपालिका/छावणी मंडळांनी अधिकाराने ताब्यात दिलेली असावी. तसेच अर्जदाराकडे गटई काम करण्याचा पुरावा असणे आवश्यक आहे.

Rani Durgavati Yojana Maharashtra 2025: या महिलांना व्यवसायासाठी सरकार देत आहे १००% अनुदान, असा करा अर्ज

आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • जाती प्रमाणपत्र
  • उत्पन्नाचा पुरावा
  • वय पुरावा
  • रहिवासी प्रमाणपत्र
  • स्थळाचा भाडे करार / ताबा / मालकीचा पुरावा
  • पासपोर्ट फोटो
  • रेशन कार्ड
  • बँक खात्याचा तपशील

योजनेसाठी अर्ज कसा करावा?

योजनेसाठी अर्ज प्रक्रिया सोपी आहे. Gatai Kamgar Yojana Maharashtra या योजनेसाठी तुम्हाला ऑफलाईन अर्ज करावा लागतो. त्यासाठी तुम्हाला संबंधित जिल्ह्याच्या सहाय्यक आयुक्त किंवा समाज कल्याण कार्यालयात भेट द्यावी लागेल. तेथे तुम्हाला मोफत गटई कामगार योजना फॉर्म उपलब्ध होईल किंवा फॉर्म तुमच्यासाठी खाली उपलब्ध करून दिला आहे. Gatai Kamgar Yojana Form PDF Download करून पुढील प्रक्रिया करू शकता.

फॉर्म भरण्याची प्रक्रिया हि काळजीपूर्वक पार पाडावी त्यानंतर आवश्यक कागदपत्रे फॉर्म सोबत जोडावे आणि अर्ज सादर करावा. अश्या प्रकारे तुम्ही सोप्या पद्धतींनी योजनेचा फॉर्म भरू शकता. नियमितपणे अर्ज सादर केल्यावर तुम्हाला पावती मिळेल. पावती सुरक्षित ठेवावी कारण भविष्यात त्याची आवश्यकता लागू शकते.

Gatai Kamgar Yojana Form PDF

निष्कर्ष

Gatai Kamgar Yojana 2025 ही बांधकाम क्षेत्रातील कामगारांसाठी दिलासा देणारी योजना आहे. राज्यातील लाखो गटई कामगारांना याचा फायदा होत आहे. सरकारने दिलेले हे सामाजिक सुरक्षा कवच, कामगार आणि त्यांच्या कुटुंबासाठी एक मोठा आधार ठरत आहे. जर आपण किंवा आपला परिचित गटई कामगार असेल, तर या योजनेची नोंदणी करून लाभ घ्यावाच. कारण संकटाच्या वेळी ही योजना तुमच्या पाठीशी उभी राहते.

FAQ

1) स्टॉल कुठे बसवला जाईल?

स्टॉल त्या जागी बसवला जातो जिथे अर्जदाराला ग्रामपंचायत, नगरपालिका किंवा महानगरपालिका परवानगी देते.

2) ही योजना ऑनलाइन अर्जासाठी उपलब्ध आहे का?

नाही, सध्या अर्ज फक्त ऑफलाइन स्वीकारले जातात.

3) अर्जाची अंतिम तारीख आहे का?

दरवर्षीची अंतिम तारीख जिल्ह्यानुसार बदलू शकते. स्थानिक समाज कल्याण कार्यालयातून माहिती घ्यावी.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *