Gold Price Today: आजच्या काळात सर्वसाधारण नागरिकांसाठी सोने खरेदी करणे अवघड झाले आहे. आपण बघतोच आहे सोन्याच्या भावात दरोरोज किती बदल होत आहे. सोनं हा भारतात खूप महत्त्वाचा आणि लोकप्रिय गुंतवणुकीचा पर्याय मानला जातो. विशेषतः महिलांसाठी सोनं हे खूप महत्वाचं आहे त्याचप्रमाणे दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी सोनं सुरक्षित मानल्या जाते.
चला तर जाणून घेऊ आजचे सोन्याचे भाव आणि चांदीचे भाव काय आहे. तसेच भारतातील मोठ्या शहरातील भाव आम्ही तुम्हाला या लेखाच्या माध्यमातून सांगू. यावरून तुम्ही तुमच्या शहरातील सोन्याचे आजचे भाव किती आहे याचा अंदाज लावू शकता.
🔶 Gov Job News: राज्यात 15 सप्टेंबर 2025 पासून सुरु होणार 10 हजार जागांची परीक्षा बिना सरकारी भरती.
Gold Price Today | काय आहे आजचे सोन्याचे भाव?
सोन्याच्या दरात आज वाढ झाली आहे, आजचे 24 कॅरेट सोन्याचे भाव ₹1,10,300 प्रति 10 ग्रॅमवर पोहोचलं आहे. चांदीचा भावही वाढून ₹1,30,100 प्रति किलो झाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात होणाऱ्या बदलांमुळे पुढच्या काही दिवसांत सोन्याच्या आणि चांदीच्या दरात अजून बदल होण्याची शक्यता आहे.
आज सोनं किती रुपयांनी वाढलं?
सोन्याच्या आणि चांदीच्या भावात आज (बुधवार) सुरुवातीच्या सत्रात थोडी वाढ झाली आहे.
24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम ₹10 ने वाढून ₹1,10,300 झाला आहे, असे GoodReturns वेबसाइटने सांगितले आहे. त्याचप्रमाणे चांदीचा भावही वाढला असून, 1 किलो चांदीचा दर ₹100 ने वाढून ₹1,30,100 झाला आहे.
प्रमुख शहरातील 24 कॅरेट सोन्याचे दर
- मुंबई व कोलकाता: ₹1,10,300 प्रति 10 ग्रॅम
- चेन्नई: ₹1,10,740 प्रति 10 ग्रॅम
- दिल्ली: ₹1,10,450 प्रति 10 ग्रॅम
प्रमुख शहरातील 22 कॅरेट सोन्याचे दर
- मुंबई, कोलकाता, बेंगळुरू आणि हैदराबादमध्ये: ₹1,01,110 प्रति 10 ग्रॅम
- चेन्नई: ₹1,01,510 प्रति 10 ग्रॅम
- दिल्ली: ₹1,01,260 प्रति 10 ग्रॅम
चांदीचे दर
- दिल्ली, कोलकाता, मुंबई: ₹1,30,100 प्रति किलो
- चेन्नई: ₹1,39,900 प्रति किलो
सोन्याचा वार्षिक परफॉर्मन्स
2025 मध्ये आतापर्यंत सोन्याच्या दरात 38% वाढ झाली आहे.
याआधी, 2024 मध्ये सोन्याच्या दरात 27% वाढ नोंदवली गेली होती.
सोन्याच्या दरात ही वाढ होण्यामागे मुख्य कारणे आहेत:
- डॉलरची कमकुवत स्थिती
- केंद्रीय बँकांची सतत खरेदी
- सौम्य (लवचिक) मौद्रिक धोरणे
- जागतिक अनिश्चितता
या सर्व घटकांमुळे सध्याच्या काळात सोन्याच्या भावात तेजी दिसून येत आहे.
मी नितिकेश, मागील 4 वर्षांपासून महाराष्ट्रातील विविध शासकीय माहिती, सरकारी नौकरी माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम करतोय. marathisathi.in या वेबसाईटवर तुम्हाला सर्व योजना एका ठिकाणी, अगदी सोप्या भाषेत समजून घेता येतील, कारण तुमचा हक्काचा लाभ मिळवायला माहिती असणं गरजेचं आहे!