Gov Job News: काय झालं? लागला ना शॉक. तर लागेलच कारण राज्यात लवकरच मोठी भरती ते हि सरकारी कार्यालयामध्ये काही दिवसातच सुरु होणार आहे. मुख्यता या भरतीमध्ये ना कोणी परीक्षा घेणार नाही कोणी मुलाखतीसाठी बोलावणार. कारण हि भरती अनुकंपावरील सरकारी भरती आहे. जी आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वात मोठ्या अनुकंपावरील भरती आहे.
विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला कळले नसेल कि, अनुकंपावरील भरती काय असते. तर ज्या कुटुंबातील व्यक्ती शासकीय सेवेमध्ये रुजू असतो, मात्र काही कारणामुळे किंवा बिमारीमुळे जर मृत्यू झाला तर त्याच्या जागी त्याची पत्नी किंवा घरातील एक सदस्य जसे मुलगा हा नोकरीवरती अनुकंप भरतीच्या माध्यमातून घेतला जात असतो.
कशी होईल हि अनुकंपाची भरती
मागील महिन्यातील बातम्या जर का बघितल्या असेल तर आधी अनुकंपावरील भरती पूर्ण होणार आहे आणि नानंतरच इतर भर्त्यासाठीच्या जाहिराती ह्या प्रसिद्ध केल्या जातील. मित्रांनो, राज्यातील विविध विभागातील विविध कार्यालयामध्ये ज्या 10 हजार अनुकंपावरील जागा रिक्त आहेत, त्यांच्यासाठी हि भरती केली जाणार. जवळपास पंधरा दिवसाच्या आत हि भरती पूर्ण करण्याचे आदेश सुद्धा सरकारने प्रशासनातील अधिकाऱ्यांना दिले असल्यामुळे पात्र उमेदवारांसाठी मोठा दिलासा आहे.
खास बाब तर हि आहे, कि या वर्षीच्या भरतीमध्ये चतुर्थ श्रेणीमधील पदे सुद्धा या भरतीमार्फत भरले जाणार आहे. यापूर्वी चतुर्थ श्रेणीतील अनुकंपावरील पदे हि बहुदा कंत्राटी तत्वांभर भरलेले गेलेली आपण बघितली असेल. ज्या नोकरीसाठी जो पात्र वारसदार आहे त्यालाच हि नोकरी मिळणार आहे. जेणेकरून कुटुंबातील कर्ता आणि कमावता जो व्यक्ती होता त्याच्या जागी आर्थिक स्थिरता टिकवण्यासाठी त्यांचा वारस उभा होईल. हि नियुक्ती त्या त्या जिल्हाप्रशासनाच्या माध्यमातून केली जात असल्याने जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा तातडीने भरती पूर्ण केन्यासाठीचे निर्देश मिळाले आहेत.
स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने नोंदविला आक्षेप
राज्य सरकारची हि भरती मान्य नसून या निर्णयावर राज्य स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने यावर आक्षेप नोंदवला आहे. शासन ज्या अनुकंपावर्ती दहा हजार जाग भरत आहे, ते स्पर्धा परीक्षाची तयारी करणाऱ्यांसाठी अन्यायच असेल, असे स्पष्ट मत आक्षेप नोंवितांना त्यांनी मांडले आहे. सोबतच त्यांनी असे सुद्धा म्हण्टले कि, कुटुंबातील कर्त्या व्यक्तीचे निधन झाले म्हणून त्यांच्या कुटुंबांसाठी इतर पर्याय खुले करावे किंवा इत्तर कुठली मदत करावी. परंतु आमच्या लाख मोलाच्या सरकरी नोकऱ्या का म्हणून फुकट द्याव्यात? असा प्रश्न सोबतच शासनाने लवकरात लवकर काही तरी निर्णय जाहीर करावा अशी विनंती सुद्धा या वेळेला समितीने केली आहे.
अनुकंपा धोरण काय आहे?
विद्यार्थी मित्रांनो, 1973 पासून अनुकंपा धोरण लागू करण्यात आले आहे. राज्यातील सरकारी किंवा निमसरकारी कार्यालये आणि संस्थांमध्ये कार्यरत असणाऱ्यांचा जर का सेवे मध्ये रुजू असतांना मृत्य झाला असेल, तर त्याच्या परिवारातील पात्र वारसदाराला त्याच विभागामध्ये नोकरी दिल्या जाण्याची तरतूदच या धोरणामध्ये आहे. वेळ, काळ परिस्थितीनुसार या धोरणामध्ये वेळोवेळी बदल आणि दुरुस्त्या सुद्धा करण्यात आल्या आहे.
निष्कर्ष
राज्यातील अनुकंपावरील नोकरीकरिता पात्र उमेदवारांना फार मोठा दिलासा या भरतीच्या माध्यमातुन मिळालेला आहे. जर तुम्ही या सरकारी नोकरीसाठी इच्छुक आहार आणि पात्र आहेत तर नक्की तुमच्या जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जाऊन संपर्क करा आणि प्रक्रिया पूर्ण करा.
नमस्कार,
माझे नाव आकाश भगत आहे, मी एक ब्लॉगिंग क्षेत्रामध्ये मागील 4 वर्षांपासून कार्यरत आहे. मी 2023 पासून योजना या टॉपिक वरती ब्लॉग लिहत आहो. त्यामुळे माझ्याकडे जवळपास 2 वर्षाचा योजना, नौकरी आणि इतर शासकीय माहितीच्या टॉपिक चा अनुभव आहे. तसेच मी सध्या marathisathi.in या साईट च्या माध्यमातून सर्व माहिती सोप्या आणि खऱ्या स्वरूपाची देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहे.