HSRP Number Plate संबंधित शासनाचा ताजा निर्णय, वाहन धारकांसाठी अत्यंत महत्वाची बातमी समोर आली आहे. HSRP म्हणजेच High Security Number Plate जर तुम्ही तुमच्या वाहनाला येत्या नोव्हेंबर अखेर पर्यंत बसवली नाही तर तुमची गाडी जप्त होऊ शकते किंवा तुम्हाला मोठा दंड भरावा लागू शकतो. त्यामुळे या बाबत सर्व माहिती तुम्ही सर्वाना असायला पाहिजे. आज प्रत्येक घरात किमान एक गाडी तरी आहे म्हणून प्रत्येकापर्यंत हि माहिती पोहचवणे आवश्यक आहे.
HSRP Number Plate बसवली नाही तर काय होणार?
राज्य परिवहन आयुक्त विवेक भिमनवार यांनी यासंदर्भात एक अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार, ज्या वाहनांवर HSRP प्लेट बसवलेली नाही, अशा वाहनांवर काही महत्त्वाचे निर्बंध लागू होणार आहेत. जर गाडीवर ही नंबर प्लेट नसेल, तर ती दुसऱ्याच्या नावावर हस्तांतरित करता येणार नाही, तसेच RC बुकवरील पत्ता बदल करता येणार नाही. त्याचप्रमाणे, वाहनावरील कर्जाची नोंद करणे किंवा काढणे शक्य होणार नाही. जुन्या वाहनांची पुन्हा नोंदणी (Re-registration) आणि परमिटचे नूतनीकरण सुद्धा थांबवले जाईल. सोप्या भाषेत सांगायचं तर, जर तुमच्या गाडीवर HSRP प्लेट नसेल, तर आरटीओशी संबंधित कोणतंही मोठं काम होऊ शकणार नाही.
वारंवार वाढणारी डेडलाईन
ही HSRP बसवण्याची अंतिम मुदत वाढवण्याची ही चौथी वेळ आहे. अजूनही मोठ्या संख्येने वाहनधारकांनी नंबर प्लेट बसवलेली नसल्यामुळे शासनाने हा निर्णय घेतला आहे. चला पाहूया आतापर्यंतच्या मुदती.
- मूळ डेडलाईन: मार्च 2025
- पहिली वाढ: एप्रिल 2025 अखेरपर्यंत
- दुसरी वाढ: जून 2025 अखेरपर्यंत
- तिसरी वाढ: 15 ऑगस्ट 2025 पर्यंत
- चौथी वाढ (सध्याची): नोव्हेंबर 2025 अखेरपर्यंत
जप्त गाड्यांसाठी कठोर नियम
परिवहन आयुक्तांनी सर्व आरटीओ कार्यालयांना आणखी एक महत्त्वाचा आदेश दिला आहे. ज्या वाहनांना HSRP नसल्यामुळे जप्त करण्यात आलं आहे, ती वाहने जोपर्यंत नंबर प्लेट बसवत नाहीत तोपर्यंत सोडायची नाहीत. तसेच ज्या वाहनांकडे HSRP बसवल्याचा पुरावा किंवा अपॉइंटमेंट पावती नाही, अशांवर भरारी पथकांकडून कठोर कारवाई केली जाणार आहे.
HSRP Number Plate का महत्त्वाची आहे?
HSRP म्हणजे सुरक्षितता आणि ओळख सुनिश्चित करणारी एक खास नंबर प्लेट आहे. ही प्लेट वाहनांसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते कारण तिच्यामुळे चोरी झालेल्या वाहनांचा शोध घेणं अधिक सोपं होतं. तसेच, बनावट नंबर प्लेट वापरणाऱ्या वाहनांवर नियंत्रण ठेवता येतं, ज्यामुळे गुन्हेगारी प्रकारांमध्ये घट होते. याशिवाय, या प्लेटमुळे वाहतूक व्यवस्थेत पारदर्शकता आणि सुरक्षितता मोठ्या प्रमाणात वाढते.
Graduate Voter Registration Online: पदवीधर मतदार नोंदणी करा 5 मिनिटात. बघा A टू Z संपूर्ण प्रक्रिया.
नोव्हेंबर ही अंतिम संधी!
महाराष्ट्र शासनाने वाहनधारकांना वारंवार मुदतवाढ देऊन मोठा दिलासा दिला असला तरी, यावेळी नोव्हेंबर अखेरची मुदत अंतिम इशारा मानली जात आहे. जर या वेळेतही वाहनधारकांनी नंबर प्लेट बसवली नाही, तर दंड आणि कारवाई टाळता येणार नाही. HSRP Number Plate लावणे अत्यंत आवश्यक आहे. हि तुमच्या सुविधेसाठीच आहे त्यामुळे सर्वानी लवकरात लवकर HSRP नंबर प्लेट लावा आणि अतिरिक्त दंडापासून बचाव करा.
मुद्दा | माहिती |
---|---|
HSRP म्हणजे काय? | ही एक विशेष सुरक्षा नंबर प्लेट आहे जी वाहनाची ओळख आणि सुरक्षितता सुनिश्चित करते. |
उद्देश | चोरी, बनावट नंबर प्लेट आणि फसवणूक टाळणे. |
फायदे | चोरी झालेल्या वाहनांचा शोध घेणे सोपे होते आणि वाहतूक नियंत्रण अधिक प्रभावी होते. |
सुरक्षितता | नंबर प्लेटवर खास कोड (Laser Code) असतो जो ओळख पटविण्यास मदत करतो. |
बंधनकारक वाहनं | 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेली सर्व जुनी वाहने. |
HSRP नसल्यास परिणाम | आरटीओतील कामे जसे की मालकी हक्क बदल, पत्ता बदल, परमिट नूतनीकरण थांबवले जातील. |
सध्याची अंतिम मुदत | नोव्हेंबर 2025 अखेरपर्यंत (शासनाची चौथी मुदतवाढ). |
महत्त्व | वाहनचोरी कमी करणे, बनावट नंबर प्लेट रोखणे आणि रस्ते सुरक्षा वाढवणे. |
मी नितिकेश, मागील 4 वर्षांपासून महाराष्ट्रातील विविध शासकीय माहिती, सरकारी नौकरी माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम करतोय. marathisathi.in या वेबसाईटवर तुम्हाला सर्व योजना एका ठिकाणी, अगदी सोप्या भाषेत समजून घेता येतील, कारण तुमचा हक्काचा लाभ मिळवायला माहिती असणं गरजेचं आहे!