Kapil Sharma Warning: कपिल शर्मा एक असा कॉमेडियन ज्याला आपल्या भारतातील बच्चा-बच्चा ओळखतोय. परंतु यांची ख्याती हि फक्त भारतापुरतीच नाही आहे तर जगातील जवळपास 200 देशांमध्ये यांचा कॉमेडी शो बघितला जातो. नेहमी त्यांच्या शो मध्ये मोठे मोठे सेलिब्रेटी सोबतच मोठे मोठे उद्योगपती सुद्धा हल्ली यायला लागले आहेत. त्यामुळे दिवसें दिवास त्यांची ख्याती हि वाढतच चालली आहे.
आज आपल्या भारतात लाखो नाही तर करोडो कपिलचे फॅन आहेत. आज एका पोलीस कॉन्स्टेबल चा मुलगा त्याच्या कलेने येवडा मोठा झाला तर खरे, परंतु त्याला हि अमीरी सुखाने जीवन जगायला देते कि नाही, ते आपल्याला खाली कडणारच आहे. तत्पूर्वी आजच एक मोठी घटना घडली आहे. महाराष्ट्रातील एका नेत्याने कपिल शर्माला डायरेक्ट वार्निंगचा दिली आहे. ते कोणती तर चला बघूया.
Read Also: Raj-Uddhav Melava: दसरा मेळाव्यात पुन्हा राज आणि उद्धव येणार एकत्र? मेळाव्यासाठी मिळाली परमिशन.
बॉम्बे बोलणे सोडा नाहीतर परिणाम भोगा
आता ह्या धमकी वरून तुम्हाला काढलेच असेल कि हि धमकी कासामुळे मिळाली आहे. मागील काही महिन्याआधीच भाषेचा वाद महाराष्ट्रभर पेटला होता. त्यात महाराष्ट्रातील मनसे अर्थात राज साहबे ठाकरेंचा पक्ष हा नेहमीच मराठी माणसांसाठी आणि मराठी भाषेसाठी धडपड करत असतात. कपिल शर्मा पंधरा वर्षांपासून मुंबई मध्ये काम करतात, त्यांचा शो करतात. तरी अजूनसुद्धा त्यांना मराठी येत किंवा आपल्या मुंबईला ते अजूनही बॉम्बे या नावाने बोलतात. यामुळेच माणसे नेते आक्रमक होऊन Kapil Sharma ला Warning दिली आहे.
मनसे नेते अमेय खोपकरांचा इशारा
अमेय खोपकरांनी त्यांच्या एक्स वर म्हंटले आहे कि, मुंबई मध्ये राहून आपण मुंबईतच काम करतो. त्यामुळे मुंबईचा आदर केला पायजे आणि तिचे योग्य नाव बॉलीवूड व इतर ठिकाणे घ्यायला हवे. कपिल शर्मा यांच्या शो मध्ये मोठे मोठे सुपरस्टार्स येतात आणि त्यांच्याकडून सुद्धा अनेकदा मुंबईचे नाव चुकीचे घेतले गेली आहे.
या मुंबई शहराला मुंबई असे म्हणतात. कपिल शर्माचा शो आम्ही खूप आधीपासून बघत आलेलो आहोत, हा नवीन सीजन सुरु होण्यापूर्वी सुद्धा आमच्या शहराला बॉम्बे किंवा बम्बई याच नावाने उच्चारले गेले आहे. आम्हाला हे पटत नाही आणि आम्ही याचा विरोध करतो आहोत. हा आमचा नुसता आक्षेप नाही तर राग आहे. या शहराला मुंबई या नावाने बोललेले जाते. जसे तुम्ही इत्तर शहर जसे चेन्नई, कोलकत्ता, बेंगलोर असे बोलले जाते तर मग तुम्ही आमच्या शहराचा अपमान का बर करत आहेत?
पुढे अमेय खोपकर बोलले कि, तुम्ही एवढ्या वर्षांपासून मुंबईत काम करत आहात. तुमची कर्मभूमी हि मुंबई आहे. इथल्या लोकांना तुम्ही आवडता तुमचा शो सुद्धा मुंबईकर आवडीने बघतात. मुंबई हि आमच्या हृदयामध्ये आहे, त्यामुळे मुंबईचा अपमान करू नका. असा मी कपिल शर्मा यांना इशारा देत आहे.त्यामुळे त्यांनी त्यांच्या झालेल्या चुका सुधाराव्या आणि यापुढे चुका होऊ देऊ नये, अन्यथा आम्ही माणसे स्टाईलने समजावू. असा इशाराच दिला गेला आहे.
निष्कर्ष
मागील महिन्यामध्येच दुबई मध्ये कपिल शर्माच्या एका कॅफे मध्ये गोलोबर करून हल्ला झाला होता. त्यात मुंबई मध्ये सुद्धा त्यांना स्थानिक पक्ष मनसेकडून धमकी मिळाली आहे. त्यामुळे कपिल शर्मांना आटा बॉम्बे ला मुंबई याच नावाने उच्चारावे लागेल. यामध्ये त्यांची खरी कसोटी ठरू शकणार आहे. कारण त्यांच्या शो मध्ये देशभरातून लोक येतात त्यांच्याकडून ते कशे मुंबई बोलून घेतील हे बघावे लागेल.
नमस्कार,
माझे नाव आकाश भगत आहे, मी एक ब्लॉगिंग क्षेत्रामध्ये मागील 4 वर्षांपासून कार्यरत आहे. मी 2023 पासून योजना या टॉपिक वरती ब्लॉग लिहत आहो. त्यामुळे माझ्याकडे जवळपास 2 वर्षाचा योजना, नौकरी आणि इतर शासकीय माहितीच्या टॉपिक चा अनुभव आहे. तसेच मी सध्या marathisathi.in या साईट च्या माध्यमातून सर्व माहिती सोप्या आणि खऱ्या स्वरूपाची देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहे.