Kusum Solar Pump Yojana 2025: शेतकरी बांधवांना दिवाळी निमित्त एक आनंदाची बातमी आपण आज या आर्टिकल च्या माध्यमातून बघणार आहे. या बातमी मुळे शेतकऱ्यांना कुठलेली वीज बिल भरण्याची अजिबात गरजच पडणार नाही आणि एकदा केलेली गुंतवणूक त्यानंतर वर्षांनी वर्ष खर्च करण्याची अजिबात गरजच पडणार नाही. त्यामुळे अतिशय महत्वाची असलेली हि Kusum Solar Pump Yojana चा लाभ कसा घ्यायचा याची सविस्तर माहिती या आर्टिकल मध्ये तुम्हाला मिळणार आहे.
योजनेचा उद्देश
आधीच शेती करत असतांना लाखो रुपये खर्च हा आपल्या शेतकरी बांधवांना येत असतो. त्यातच महाविचारचे वीज बिल सुद्धा उतपन्नाच्या अर्धे येते. अशा वेळेला शेतकऱ्यांना मोठा प्रश्न उभा राहतो, कि वीज बिल भरायचे कि आपल्या परिवाराच्या आर्थिक गरज पूर्ण करायच्या म्हणून शासनाने शेतकऱयांना मदत मिळावी या करता हि योजना सुरु करण्याचा उद्देश सामोरे ठेवला आहे.
योजनेचा लाभ कसा मिळणार
योजनेचा अर्ज करणाऱ्या शेतकरयांना कृषी पम्पासोबतच सोलर पॅनल सुद्धा दिली जाणार आहेत. अनुसूचित जाती आणि जमाती मधील शेतकऱ्यांना केंद्र शासन आणि महाराष्ट्र शासन 95% अनुदान देत आहे. तर इतर प्रवर्गातील शेतकरी बांधवांना 90% अनुदान सोलर कृषी पंपावर दिल जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना स्वतःच्या खिशातून फक्त आणि फक्त 5%-10% पर्यंतच रक्कम भरावी लागेल.
शेतकऱ्यांना मिळणारे फायदे
सोलर पंप खरेदीसाठी आर्थिक ताण येऊ नये म्हणून 90% अनुदान शासन देत आहे. तसेच शेताचे सिंच करण्यासाठी वीज बिळापासून मुक्तता देणारा हा मोठा सोर्स असेल. तुम्हाला आवश्यक नसलेली अतिरिक्त वीज विकून तुम्ही लाखी रुपये सुद्धा कमावू शकणार आहेत. मोठ्या बचतीसाठी आणि पर्यावरणाशी पूरक असा सोर्स असल्यामुळे पर्यावरणाची हानी थांबेल आणि पर्यावरणातून मिळणाऱ्या ऊर्जेचा सदुपयोग करता येईल. तसेच शेतकऱ्यांना रात्री-बेरात्री शेतामध्ये जाण्याची गरज पडणार नाही.
योजनेची पात्रता
योजनेचा लाभ हा भारतातील शेतकरी बांधव किंवा नोंदणीकृत असलेली सहकारी संस्थेला मिळणार आहे. त्यासाठी अर्जदाराचे आधार कार्ड, जमिनीचे कागदपत्रे, बँकेचे पासबुक आणि पासपोर्ट फोटो असणे आवश्यक असतील. त्याचप्रमाणे योजनेचा अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने भरावा लागेल.
ऑनलाईन अर्ज कसा करावा?
अर्जदार जर महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असेल, तर त्यांनी pmkusum.maharashtra.gov.in या अधिकृत वेबसाईट ला भेट द्यावी. Apply Online या पर्यायावर क्लिक करून Kusum Solar Pump Yojana 2025 साठी चा अर्ज भरावा आणि कागदपत्रे सुद्धा अपलोड करून घ्यावी. नंतर मागण्यात आलेली टोकन फी भरून अर्ज सबमिट करून टाकावा.
महत्वाच्या सूचना: सध्या Kusum Solar Pump Yojana 2025 चे ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली असून, शेतकरी बांधवांनी लवकरात लवकर अर्ज करून योजनेचा लाभ घ्यावा.
निष्कर्ष
शेतकऱ्यांना अतिशय फायदेमंद आणि कमीत कमी रकमेत लाभ मिळवून देणारी हि, योजना आहे. योजनेचा लाभ राज्यातील प्रत्येक शेतकऱ्यांना मिळावा या साठी शासन प्रोत्साहन देत आहे. जेणेकरून शेतकऱ्यांना आर्थिक लाभ मिळवा आणि सूचनांचे सर्व प्रश्न मार्गी लागावेत, धन्यवाद.
नमस्कार,
माझे नाव आकाश भगत आहे, मी एक ब्लॉगिंग क्षेत्रामध्ये मागील 4 वर्षांपासून कार्यरत आहे. मी 2023 पासून योजना या टॉपिक वरती ब्लॉग लिहतोय. त्यामुळे माझ्याकडे जवळपास 2 वर्षाचा योजना, नौकरी आणि इतर शासकीय माहितीच्या टॉपिक चा अनुभव आहे. तसेच मी सध्या marathisathi.in या साईट च्या माध्यमातून सर्व माहिती सोप्या आणि खऱ्या स्वरूपाची देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहे.