Ladki Bahin Not Get Installment: लाडकी बहीण योजनेतील ऑगस्टचा हप्ता थांबणार, लाखो महिलांना मोठा धक्का बसण्याची शक्यता. जुलै महिन्यात राज्यातील अनेक महिलांना लाडकी बहीण योजनेचा हफ्ता मिळाला आता त्या सर्व महिलांना ऑगस्ट चा हफ्ता मिळण्याची उत्सुकता होती. पण, यावेळी लाखो महिलांना १५०० रुपयांचा हप्ता मिळणार नाही, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.
चला तर जाणून घेऊ आता कोणत्या महिलांना योजनेचा लाभ मिळेल आणि कोणाला मिळणार नाही. तुम्ही सुद्धा ऑगस्ट हफ्ता मिळण्याची वाट पाहत असाल तर हा लेख पूर्ण वाचा तुम्हाला सविस्तर माहिती मिळेल.
Nuksan Bharpai 2025: शेतकऱ्यांसाठी धक्कादायक आनंदाची बातमी! खात्यात थेट ९२१ कोटींची मदत सुरू
किती अर्ज बाद झाले?
या योजनेसाठी राज्यभरातून जवळपास २.५ कोटी महिलांनी अर्ज केले होते. त्यातील तब्बल ४२ लाख अर्ज रद्द करण्यात आले आहेत. त्यापैकी २६ लाख महिला थेट अपात्र ठरल्या आहेत, अशी माहिती महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. अजूनही पडताळणी सुरू असल्यामुळे हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.
पडताळणी कशी चालू आहे?
फक्त योजनेच्या लाभार्थी पात्र महिलांना लाभ मिळावा म्हणून गावागावात व शहरांमध्ये अंगणवाडी सेविका घराघरांत जाऊन तपासणी करत आहेत. त्या उत्पन्न, नोकरी, वाहन व मालमत्तेची माहिती घेत आहेत. नियम न पाळणाऱ्या महिलांचे अर्ज थेट बाद केले जात आहेत.
लाभ मिळणार कोणाला?
राज्यातील ज्या महिला पात्रता निकषमध्ये बसतात अशा सर्व महिलांना ऑगस्ट चा हफ्ता नियमितपणे मिळणार आहे. काही महिला अश्या पण आहे ज्या पात्रता निकष पूर्ण करतात परंतु त्यांना २ महिन्यापासून हफ्ता मिळत नाही अशा महिलांना सुद्धा एकसाथ सगळे हफ्ते मिळण्याची शक्यता आहे. मात्र अपात्र ठरलेल्या महिलांना पुढे कोणतेही पैसे मिळणार नाहीत.
Mofat Pithachi Girni Yojana 2025: या महिलांना मिळणार आता मोफत पिठाची गिरणी, अर्ज झाले सुरु
कोणत्या कारणामुळे महिलांना हप्ता मिळणार नाही?
सरकारने काही ठरावीक अटी ठेवल्या आहेत. त्या न पाळल्यास महिलांना योजनेचा लाभ मिळणार नाही. मुख्य अटी अशा आहेत:
- वय मर्यादा: फक्त २१ ते ६५ वयोगटातील महिला पात्र.
- कुटुंबाचे उत्पन्न: वार्षिक उत्पन्न २.५ लाखांपेक्षा जास्त असेल तर अपात्र.
- नोकरी: सरकारी नोकरी करणाऱ्या महिलांना लाभ नाही.
- वाहन: कुटुंबाकडे चारचाकी वाहन असल्यास लाभ मिळणार नाही.
- करदाते: आयकर भरणारे कुटुंबही वगळले जातील.
निष्कर्ष
लाडकी बहीण योजना महिलांसाठी आर्थिक मदतीचा मोठा आधार आहे. परंतु, सरकारच्या नियमांचे पालन न केल्यास लाभ मिळणार नाही हे आता स्पष्ट झाले आहे. या योजनेतून राज्यातील ४२ लाख अर्ज बाद झाल्याची आकडेवारी धक्कादायक आहे. पडताळणी अजून सुरू असल्याने किती महिलांना शेवटी फायदा होईल हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
मी नितिकेश, मागील 4 वर्षांपासून महाराष्ट्रातील विविध शासकीय माहिती, सरकारी नौकरी माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम करतोय. marathisathi.in या वेबसाईटवर तुम्हाला सर्व योजना एका ठिकाणी, अगदी सोप्या भाषेत समजून घेता येतील, कारण तुमचा हक्काचा लाभ मिळवायला माहिती असणं गरजेचं आहे!