लाडकी बहीण योजना e-KYC करताना OTP येत नाही किंवा अन्य प्रॉब्लेम होत आहे? हा उपाय करा पुढील हफ्ते येण्यास सुरुवात होईल

Ladki Bahin Yojana e-KYC OTP Problem
WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

महाराष्ट्रातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मध्ये राज्य सरकारने नवीन अपडेट आणले आहे. आता सर्व लाडक्या बहिणींना e-KYC करणे अनिवार्य केले आहे त्याशिवाय पुढील हफ्ते मिळणार नाही. मात्र अनेक महिलांना हि प्रक्रिया करताना प्रॉब्लेम येत आहे, जसे काही महिलांना OTP येत नाही तर काही महिला वेबसाइट ओपन होण्यास प्रॉब्लेम येत आहे. तुमच्या सर्व प्रॉब्लेम चे उपाय या लेखात उपलब्ध आहे, त्यासाठी तुम्हाला लेख पूर्ण वाचावा लागेल.

सरकारचा मोठा निर्णय! राज्य सरकार कडून या महिलांना मिळणार भाऊबीज भेट २००० रुपये | Bhaubij bhet 2000 GR येथे बघा

Mazi Ladki Bahin Yojana eKYC
Mazi Ladki Bahin Yojana eKYC

OTP न मिळाल्यास काय कराल?

e-KYC प्रक्रियेत सर्वात जास्त तक्रार OTP न मिळण्याची किंवा उशिरा मिळण्याची आहे. अशी समस्या आल्यास खालील गोष्टी तपासा:

  • इंटरनेट कनेक्शन तपासा – कमकुवत नेटवर्कमुळे OTP उशिरा मिळू शकतो.
  • फोनमध्ये मेसेज मेमरी मोकळी ठेवा – काही वेळा मेसेज इनबॉक्स फुल असल्यास OTP पोहोचत नाही.
  • काही वेळानंतर पुन्हा प्रयत्न करा.
  • वेबसाइट ओपन होत नसल्यास रात्रीच्या वेळी वेबसाइट ओपन करून e-KYC प्रक्रिया करून बघा.

अर्जाची स्थिती तपासा

जर लाडकी बहीण योजनेचा मासिक हप्ता मिळत नसेल, तर अधिकृत वेबसाइटवर लॉगिन करून अर्जाची स्थिती तपासा. अर्ज मंजूर नसेल, तर OTP प्रक्रिया देखील थांबू शकते.

बँक खात्याची खात्री करा

तुमचे बँक खाते आधारशी जोडलेले आहे का, तसेच आधारवरील नाव व इतर तपशील बरोबर आहेत का हे तपासणे आवश्यक आहे. चुकीची माहिती असल्यास OTP येण्यात किंवा हप्ता जमा होण्यात अडथळे येऊ शकतात.

प्रशासनाशी संपर्क साधा

वरील सर्व उपाय करूनही समस्या कायम राहिल्यास जिल्हा प्रशासनातील महिला व बालविकास विभागाशी त्वरित संपर्क साधावा. तेथील अधिकारी तुमच्या तक्रारीची नोंद घेऊन आवश्यक मदत करतील.

मोफत शिलाई मशीन योजना सुरु। महिलांना मिळणार सुवर्ण संधी Sewing Machine Scheme

e-KYC करण्याची अधिकृत पद्धत

राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार e-KYC प्रक्रिया सोपी आहे.

  • अधिकृत वेबसाइट https://ladakibahin.maharashtra.gov.in येथे जा.
  • होमपेजवरील ‘e-KYC’ बॅनरवर क्लिक करा.
  • आधार क्रमांक व कॅप्चा कोड टाका.
  • ‘Send OTP’ वर क्लिक करा आणि आधारशी लिंक असलेल्या मोबाईलवर आलेला OTP टाका.
  • OTP टाकून ‘Submit’ करा.

निष्कर्ष

सरकारने जाहीर केलेल्या सूचनांनुसार e-KYC प्रक्रिया पूर्ण केल्यास महिलांना दरमहा मिळणारा 1500 रुपयांचा आर्थिक लाभ कोणत्याही विलंबाशिवाय खात्यात जमा होऊ शकतो. त्यामुळे पात्र महिलांनी वेळेत e-KYC करून योजनेचा लाभ घ्यावा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

2 thoughts on “लाडकी बहीण योजना e-KYC करताना OTP येत नाही किंवा अन्य प्रॉब्लेम होत आहे? हा उपाय करा पुढील हफ्ते येण्यास सुरुवात होईल”