Ladki Bahin Yojana e-KYC Process 2025: महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी महत्वाची बातमी असणार आहे. जर तुम्ही अजून पर्यंत e-KYC प्रक्रिया पूर्ण केली नसेल तर घाबरू नका, अगदी सोप्या आणि सरळ भाषेत आम्ही तुम्हाला Ladki Bahin Yojana e-KYC Process म्हणजे ई-केवायसी प्रक्रिया कशी करायची याची माहिती देणार आहे. हि प्रक्रिया करणे आवश्यक आहे अन्यथा तुमचे हफ्ते बंद होऊ शकतात त्यामुळे तयारीत करून घ्या.
Ladki Bahin Yojana e-KYC Process | लाडकी बहीण योजना e-KYC काय आहे?
मागच्या वर्षी ऑगस्ट २०२४ मध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सुरुवात झाली होती. या योजनेमध्ये गरीब व गरजू महिलांना प्रतिमाह १५०० रुपये देण्याची घोषणा राज्य सरकारने केली होती. परंतु राज्यातील अनेक अश्या महिला होत्या ज्या लाभार्थी नसून त्यांनी योजनेचा लाभ घेतला होता त्यामुळे योजनेत बरेच घोटाळे होऊ लागले. याच सर्व कारणामुळे राज्य सरकारने Ladki Bahin Yojana e-KYC करणे बंधनकारक केले आहे.
यापुढे फक्त लाभार्थी पात्र महिलांनाच योजनेचा लाभ घेता येणार आहे. त्यासाठी महिलांना e-KYC प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचं आहे. हि प्रक्रिया पूर्णपणे मोफत आहे, तुम्ही तुमच्या मोबाईल वरून सुद्धा करू शकता.
🔶 Aadhar Photo Change Online 2025: मोबाईलवरून आधार कार्डचा फोटो बदला, एकदम सोपी पद्धत
कधी पर्यंत e-KYC करता येणार?
e-KYC प्रक्रिया करण्यासाठी शासनाने सर्व लाडक्या बहिणींना २ महिन्याची मुदत दिली आहे. या २ महिन्यामध्ये तुम्हाला हि प्रक्रिया करावी लागणार, त्यानंतरच पुढील हफ्ते येणास सुरुवात होईल.
e-KYC करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- बँक पासबुक किंवा खात्याचा तपशील (ज्या खात्यात योजना रक्कम येते)
- मोबाइल नंबर (आधारशी लिंक असलेला)
- नोंदणी आयडी (असल्यास)
e-KYC कुठे आणि कसे करावे?
पर्याय १) ऑनलाईन पोर्टल
- महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत संकेतस्थळावर जा.
- “माझी लेडकी बहीण योजना e-KYC” पर्याय निवडा.
- आधार क्रमांक टाकून OTPद्वारे लॉगिन करा.
- बँक खाते आणि इतर तपशीलाची खात्री करा.
- यशस्वी पडताळणीनंतर e-KYC पूर्ण होईल.
पर्याय २) CSC केंद्र (कॉमन सर्व्हिस सेंटर)
- जवळच्या CSC केंद्रावर जा.
- आधार कार्ड आणि बँक पासबुक दाखवा.
- बायोमेट्रिक (फिंगरप्रिंट/आयरिस) द्वारे e-KYC पूर्ण होईल.
e-KYC न केल्यास काय होईल?
- e-KYC न केल्यास पुढील महिन्यापासून हप्ता बंद होईल.
- महिला योजनेतून वगळल्या जाऊ शकतात.
- नंतर e-KYC केल्यावरच पैसे पुन्हा मिळू शकतात.
e-KYC का आवश्यक आहे?
योजनेचा खरा लाभ फक्त पात्र महिलांपर्यंत पोहोचावा यासाठी e-KYC (इलेक्ट्रॉनिक ओळख पडताळणी) करणे बंधनकारक आहे. यामुळे बनावट नावे, डुप्लीकेट खाते किंवा चुकीची माहिती देणाऱ्यांवर नियंत्रण ठेवता येते.
e-KYCचे फायदे
- फसवणूक आणि चुकीचा लाभ घेणाऱ्यांवर आळा.
- आधार क्रमांक आणि बँक खाते लिंक असल्याची खात्री.
- लाभार्थ्यांचा अद्ययावत डेटा सरकारकडे उपलब्ध.
निष्कर्ष
मुख्यमंत्री माझी लेडकी बहीण योजना ही महाराष्ट्रातील महिलांसाठी वरदान ठरते आहे. मात्र योजनेचा लाभ अखंडित मिळवण्यासाठी e-KYC वेळेत पूर्ण करणे अत्यावश्यक आहे. सर्व लाभार्थींनी ठरलेल्या मुदतीत e-KYC पूर्ण करून आपला हप्ता सुरू ठेवावा.
मी नितिकेश, मागील 4 वर्षांपासून महाराष्ट्रातील विविध शासकीय माहिती, सरकारी नौकरी माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम करतोय. marathisathi.in या वेबसाईटवर तुम्हाला सर्व योजना एका ठिकाणी, अगदी सोप्या भाषेत समजून घेता येतील, कारण तुमचा हक्काचा लाभ मिळवायला माहिती असणं गरजेचं आहे!