Ladki Bahin Yojana eKYC Update: लाडकी बहीण योजना आपण सर्वांना चांगल्या प्रकारे माहितीच असेल. योजनेमध्ये अनेक घोटाळे होऊ लागल्यामुळे सरकारने eKYC प्रक्रिया सुरु केली. या प्रक्रियेमध्ये सुद्धा काही अडचणी येत असल्यामुळे आता थोडे बदल करण्यात आले आहे. आता सर्व पात्र लाडक्या बहिणींना आपली स्वतःची केवायसी तर करायचीच आहे त्याचबरोबर आपल्या वडील किंवा पतीची केवायसी सुद्धा करावी लागणार आहे. पूर्ण माहिती सविस्तर जाणून घेण्यासाठी हा लेख पूर्ण वाचा.
Ladki Bahin Yojana eKYC Update
लाडक्या बहिणींनो eKYC प्रक्रियेबद्दल तुम्हाला माहितीच आहे. अनेक बहिणींनी eKYC प्रक्रिया केली आहे परंतु निम्म्या पेक्षा जास्त महिलांची केवायसी प्रक्रिया अजून झाली नाही. Ladki Bahin Yojana eKYC Update अशे आहे कि आता या पुढील हफ्ते स्वीकारण्यासाठी eKYC बंधनकारक असेल. त्यासाठी तुम्हाला स्वतः बरोबर आपल्या वडील किंवा पतीची eKYC सुद्धा करायची आहे. लग्न झालेल्या महिलांना पतीची आणि अविवाहित मुलींना वडिलांची केवायसी करणे आवश्यक आहे.
पती किंवा वडिलांची eKYC का आवश्यक आहे?
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ गेल्या काही महिन्यापासून अनेक महिला घेत होत्या ज्यांचे उत्पन्न 2.50 लाख पेक्षा जास्त आहे, नौकरी असणाऱ्या महिलांनी सुद्धा योजनेचा लाभ घेतल्यामुळे सरकारला हे पॉल उचलावे लागले. यापूर्वी फक्त महिलांची वैयक्तिक (personal) उत्पन्न पाहिली जात होती, पण आता नव्या मार्गदर्शक सूचनांनुसार जर महिला विवाहित असेल तर पतीचे उत्पन्न, आणि जर अविवाहित असेल तर वडिलांचे उत्पन्न तपासले जाईल.
या प्रक्रियेचा उद्देश काय आहे?
eKYC प्रक्रियेमुळे राज्यातील योग्य महिलांना लाभ मिळेल. याआधी लाभ घेणाऱ्या काही महिला अशा होत्या कि त्यांच्या परिवारातील उत्पन्न चांगले असून सुद्धा लाभ घेत होत्या आणि ज्या महिलांना गरज आहे अशा महिलांना लाभ मिळत नसल्यामुळे हि प्रक्रिया सरकारला सुरु करावी लागली.
Ladki Bahin Yojana eKYC Update कशी करावी?
सर्वप्रथम तुम्हाला सरकारच्या या https://ladakibahin.maharashtra.gov.in/ekyc अधिकृत लिंक वर क्लिक करा. तुमच्या समोर e-KYC – मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना फॉर्म उघडेल येथे आधार क्रमांक आणि कॅप्टचा कोड टाकून “ओटीपी पाठवा” यावर क्लिक करा. तुमच्या मोबाइलला वर OTP येईल तो इथे टाका. पती किंवा वडिलांची माहिती भरा जर तुम्ही विवाहित असाल तर पतीचा आधार क्रमांक, आणि जर अविवाहित असाल तर वडिलांचा आधार क्रमांक टाकावा. नंतर पुन्हा तीच OTP प्रक्रिया करा.
OTP प्रक्रिया पूर्ण झाल्यावर जातीय वर्ग निवडा आणि एक घोषणापत्र भरा की कुटुंबात कोणतीही सरकारी नोकरी किंवा पेन्शन घेतली जात नाही. तसेच कुटुंबातील फक्त एक विवाहित आणि एक अविवाहित महिला या योजनेचा लाभ घेत आहेत. सर्व माहिती नीट भरल्यानंतर स्क्रीनवर असा संदेश दिसेल ✅ “Success – आपली e-KYC यशस्वीरीत्या पूर्ण झाली आहे.”
Aadhar Yojana Scholarship| राज्यातील मुलींना शिक्षणासाठी मिळणार 60,000 हजाराचे अनुदान.
निष्कर्ष
Ladki Bahin Yojana eKYC Update करणे सर्व पात्र महिलांसाठी अनिवार्य आहे. अजून पर्यंत केली नसेल तर लवकरात लवकर करून योजनेचे पुढील हफ्त्याचा लाभ घ्या. अनेक लोक म्हणतात हि योजना बंद होणार आहे तर यावर माझे उत्तर आहे हि योजना बंद होणार नाही फक्त योजनेचा लाभ पात्र महिलांना यापुढे मिळेल.
मी नितिकेश, मागील 4 वर्षांपासून महाराष्ट्रातील विविध शासकीय माहिती, सरकारी नौकरी माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम करतोय. marathisathi.in या वेबसाईटवर तुम्हाला सर्व योजना एका ठिकाणी, अगदी सोप्या भाषेत समजून घेता येतील, कारण तुमचा हक्काचा लाभ मिळवायला माहिती असणं गरजेचं आहे!