Ladki Sunbai Yojana 2025: या योजनेचा भव्य शुभारंभ ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. लाडकी बहीण योजना प्रचंड यशस्वी ठरल्यानंतर आता राज्य सरकारने लाडकी सून योजना सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेतून राज्यातील लाडक्या बहिणींना सहायता दिली जाणार आहे.
चला तर जाणून घेऊ आता राज्य सरकारच्या लाडक्या बहिणीनंतर लाडकी सून योजनेचे सुनिला काय फायदे मिळणार आहे तसेच योजनेचा उद्देश काय आहे अशी संपूर्ण माहिती या लेख मध्ये उपलब्ध आहे.
Ladki Sunbai Yojana म्हणजे काय?
गेल्या काही महिन्यांपासून घरगुती हिंसाचाराच्या घटना वाढताना दिसत आहेत. महिलांना न्याय मिळावा आणि अशा प्रकारच्या अत्याचारांना आळा बसावा म्हणून शिवसेनेने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. ‘लाडकी बहीण योजने’ नंतर आता राज्यात ‘लाडकी सून योजना’ सुरू करण्यात आली आहे. सासरच्या मंडळींकडून शारीरिक किंवा मानसिक त्रास सहन करणाऱ्या सुनांना तात्काळ मदत मिळावी, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. यासाठी एक खास हेल्पलाईन नंबरही सुरू करण्यात आला आहे.
लाडकी सुनबाई योजनेचा उद्देश
कार्यक्रमात बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, जशी आपली मुलगी असते तशीच सूनही असते. तिलाही समान आदर आणि सन्मान मिळायला हवा. राज्यात अनेक घरांमध्ये सुनांवर होणाऱ्या अत्याचारांना पूर्णविराम देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. या योजनेतून लाभार्थी पात्र सुनेला सहायता सुद्धा दिल्या जाणार आहे.
या योजनेत फक्त पीडित महिलांना मदत केली जाणार नाही, तर ज्या सासूंनी आपल्या सुनेशी चांगले वागणूक दिली आहे त्यांचाही सन्मान केला जाईल. त्यामुळे समाजात एक सकारात्मक वातावरण तयार होईल आणि सासू–सुनेचे नाते अधिक घट्ट होईल, असा विश्वास शिंदेंनी व्यक्त केला.
Sheli Palan Yojana Maharashtra: शेळीपालन व्यवसायासाठी सरकार कडून 50 लाख कर्ज 75% अनुदानावर मिळत आहे
Ladki Sunbai Yojana Helpline Number
या योजनेअंतर्गत घरगुती हिंसाचाराचा सामना करणाऱ्या महिलांसाठी 8828862288 हा हेल्पलाईन नंबर जाहीर केला आहे. या क्रमांकावर संपर्क केल्यास पीडित महिलांना तत्काळ मदत मिळणार आहे.
ही सेवा राज्यभरातील सर्व शिवसेना शाखा आणि कार्यालयांद्वारे उपलब्ध करून दिली जाणार आहे. सुरुवातीला समुपदेशनाद्वारे वाद मिटवण्याचा प्रयत्न केला जाईल, पण जर तो उपाय यशस्वी ठरला नाही तर पुढील कायदेशीर आणि आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल.
मी नितिकेश, मागील 4 वर्षांपासून महाराष्ट्रातील विविध शासकीय माहिती, सरकारी नौकरी माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम करतोय. marathisathi.in या वेबसाईटवर तुम्हाला सर्व योजना एका ठिकाणी, अगदी सोप्या भाषेत समजून घेता येतील, कारण तुमचा हक्काचा लाभ मिळवायला माहिती असणं गरजेचं आहे!