LPG Gas Cylinder Price: राज्यातील या नागरिकांसाठी मोठी खुशखबर आहे, सप्टेंबर महिन्यापासून एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमती मध्ये मोठे बदल करण्यात आले आहे. वाढत्या महागाई मध्ये या महिन्यात नागरिकांना दिलासा मिळाला आहे. घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीमध्ये बदल झाले कि व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात कपात करण्यात आले याची माहिती जाणून घ्या या लेखाच्या माध्यमातून.
एलपीजी गॅस सिलिंडर स्वस्त झाले (LPG Gas Cylinder Price)
सप्टेंबरपासून एलपीजी गॅस सिलिंडरचे दर कमी झाले आहेत. व्यावसायिक वापरासाठी लागणारा 19 किलोचा सिलिंडर आता 51.50 रुपयांनी स्वस्त मिळणार आहे. त्यामुळे दिल्लीमध्ये त्याची किंमत 1580 रुपये आणि मुंबईत 1531.50 रुपये झाली आहे. मात्र घरगुती 14 किलो सिलिंडरच्या किमतीत काहीही बदल झालेला नाही. या दरकपातीचा सर्वात मोठा फायदा हॉटेल आणि रेस्टॉरंटला होणार आहे.
सप्टेंबरपासून व्यावसायिक गॅस सिलिंडर स्वस्त
महागाईने त्रस्त नागरिकांना सप्टेंबरच्या पहिल्या दिवशीच थोडा दिलासा मिळाला आहे. ऑईल कंपन्यांनी व्यावसायिक 19 किलो गॅस सिलिंडरच्या किमतीत 51.50 रुपयांनी घट केली आहे. त्यामुळे दिल्लीमध्ये या सिलिंडरची किंमत 1580 रुपये, तर मुंबईत 1531.50 रुपये झाली आहे. याआधी ऑगस्ट महिन्यातही व्यावसायिक सिलिंडर स्वस्त करण्यात आले होते.
घरगुती 14 किलो सिलिंडरच्या किमतीत मात्र कोणताही बदल झालेला नाही. हे दर गेल्या अनेक महिन्यांपासून जशेच्या तशे आहेत. त्यामुळे राज्यातील महिलांना अपेक्षित दिलासा मिळालेला नाही, पण रेस्टॉरंट्स, हॉटेल्स आणि लघुउद्योजकांना मात्र याचा फायदा होणार आहे.
देशातील नवे दर
- दिल्ली : १५८० रुपये
- मुंबई : १५३१.५० रुपये
- कोलकाता : १३३४.५० रुपये
- चेन्नई : १७३८ रुपये
घरगुती सिलिंडरच्या किमती
- दिल्ली : ८५३ रुपये
- मुंबई : ८५२.५० रुपये
- कोलकाता : ८७९ रुपये
- चेन्नई : ८६८ रुपये
घरगुती गॅसचे दर स्थिर, व्यावसायिक सिलिंडर स्वस्त
घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत शेवटचा बदल 8 एप्रिल रोजी करण्यात आला होता. त्यानंतर हे तेव्हापासून स्थिर आहेत. त्यामुळे राज्यातील महिलांच्या अपेक्षा अजूनही अपूर्णच राहिल्या आहेत.
सप्टेंबरपासून व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात कपात झाल्याने उद्योग आणि व्यवसायांना थोडा दिलासा मिळाला आहे. मात्र घरगुती सिलिंडरचे दर जैसे थे राहिल्यामुळे सामान्य ग्राहकांना अजून थोडा धीर धरण्याचीच वेळ आली आहे. आता ऑईल कंपन्यांच्या पुढील निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मी नितिकेश, मागील 4 वर्षांपासून महाराष्ट्रातील विविध शासकीय माहिती, सरकारी नौकरी माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम करतोय. marathisathi.in या वेबसाईटवर तुम्हाला सर्व योजना एका ठिकाणी, अगदी सोप्या भाषेत समजून घेता येतील, कारण तुमचा हक्काचा लाभ मिळवायला माहिती असणं गरजेचं आहे!