शेतकरी बांधवांसाठी मागेल त्याला सोलर पंप योजनेतून 90% अनुदान! अर्ज करण्याची एकदम सोपी प्रक्रिया, Magel Tyala Solar Pump Yojana

Magel Tyala Solar Pump Yojana
WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

महाराष्ट्र सरकारने राज्यातील शेतकऱ्यांसाठी Magel Tyala Solar Pump Yojana सुरु केली आहे. या योजनेतून राज्यातील शेतकऱ्यांना 90% अनुदानावर सोलर पंप मिळणार आहे. केवळ 10% गुंतवणूक करून सोलर पंप बसवू शकता. तसेच SC किंवा ST समाजातील शेतकऱ्यांना 95% अनुदान मिळणार आहे. यामुळे शेतकऱ्यांचा विजेचा खर्च 0 होईल आणि शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होईल.

चला तर जाणून घेऊ योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणते लागणार आहेत तसेच अर्ज प्रक्रिया काय आहे आणि राज्यातील कोणते शेतकरी या योजनेसाठी पात्र असणार आहे अशी संपूर्ण माहिती या लेखाच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला देऊ.

Aadhar Card Download: फक्त 2 मिनिटात करा मोबाईल वरून तुमचे आधार कार्ड डाउनलोड। हि आहे संपूर्ण प्रोसेस

Magel Tyala Solar Pump Yojana उद्देश काय आहे?

शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक असलेली वीज सौर ऊर्जेतून उपलब्ध करून देणे हा या योजनेचा प्रमुख उद्देश आहे. विजेच्या अनियमित पुरवठ्यामुळे शेतीचे नुकसान होऊ नये आणि शेतकऱ्यांचा खर्च कमी व्हावा, यासाठी सरकार ही योजना राबवत आहे.

पात्रता निकष

Magel Tyala Solar Pump Yojana Maharashtra राज्यात सुरु असल्यामुळे अर्जदार शेतकरी हा राज्यातील स्थायी रहिवासी असणे आवश्यक आहे. तसेच अर्जदार शेतकऱ्याकडे किम 2.5 एकर जमीन स्वतःच्या नावावर असावी. शेतामध्ये पाण्याचा स्त्रोत (विहीर, बोरवेल, नदी) असावे. यापूर्वी सौर कृषी पंपासाठी अर्ज केलेला नसावा, अशा सर्व शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळणार आहे.

अनुदान आणि खर्चाचे प्रमाण

प्रवर्गअनुदान टक्केवारीशेतकऱ्यांचा खर्च
सामान्य शेतकरी90%10%
SC/ST मागासवर्गीय शेतकरी95%05%

सौर पंपाचे प्रकार (जमिनीच्या आकारानुसार)

जमिनीचे क्षेत्रफळसौर कृषी पंपाची क्षमता
2.5 एकरपर्यंत3 HP
2.5 ते 5 एकर5 HP
5 एकरपेक्षा जास्त7.5 HP

आवश्यक कागदपत्रे

  • सातबारा उतारा
  • आधार कार्ड
  • बँक पासबुक
  • पासपोर्ट साइज फोटो
  • जातीचे प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • ना हरकत प्रमाणपत्र

Agristack Farmer ID Maharashtra: फार्मर आयडी असेल त्यांनाच नुकसान भरपाई आणि विम्याचा लाभ मिळेल। फक्त 5 मोबाईलवर काढा Farmer ID

Magel Tyala Solar Pump Yojana साठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया

मागेल त्याला सोलार पंप योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया अतिशय सोपी आहे. सर्वप्रथम अधिकृत संकेतस्थळाला https://www.mahadiscom.in/solar_MTSKPY/ भेट द्या. त्यानंतर “लाभार्थी सुविधांमध्ये अर्ज करा” या पर्यायावर क्लिक करा. अर्ज फॉर्म उघडल्यानंतर त्यामध्ये तुमची वैयक्तिक माहिती, जमिनीची माहिती, रहिवासी पत्ता, जलस्त्रोताची माहिती आणि बँक तपशील अचूकपणे भरा. आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून फॉर्ममध्ये अपलोड करा.

सर्व माहिती तपासल्यानंतर अर्ज सबमिट करा. अर्ज सबमिट झाल्यानंतर त्याची पोचपावती मिळेल, ती प्रिंट करून घ्या. पोचपावतीवरील अर्ज क्रमांकाचा वापर करून तुम्ही तुमच्या अर्जाची स्थिती ऑनलाईन तपासू शकता. अर्ज मंजूर झाल्यानंतर ठराविक रक्कम भरून तुम्हाला सौर कृषी पंपाचा संपूर्ण संच मिळेल.

📞 हेल्पलाइन संपर्क

कुठल्याही शंकेसाठी महावितरण ग्राहक सेवा क्रमांक 1800 233 3435 वर संपर्क साधा.

निष्कर्ष

Magel Tyala Solar Pump Yojana Maharashtra ही शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त योजना आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना विजेच्या समस्येतून दिलासा मिळतो आणि शेतीसाठी स्थिर, स्वस्त व टिकाऊ ऊर्जा उपलब्ध होते. जर तुम्ही पात्र शेतकरी असाल तर ही सुवर्णसंधी गमावू नका आजच ऑनलाइन अर्ज करा आणि शासनाच्या या योजनेचा लाभ घ्या.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *