MAHABOCW 2025: महाराष्ट्र राज्य सरकारने राज्यातील बांधकाम कामगार क्षेत्रात काम करणाऱ्या नागरिकांसाठी MAHABOCW म्हणजे “Maharashtra Building and Other Construction Workers Welfare Board” (महाराष्ट्र बांधकाम व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळ) पोर्टल निर्माण केले आहे. या पोर्टल बांधकाम कामगारांसाठी अनेक सुविधा व सर्व योजना एकाच ठिकाणी उपलब्ध आहे.
MAHABOCW म्हणजे काय? (थोडक्यात माहिती)
बांधकाम कामगारांसाठी सुरु केलेले हे पोर्टल अतिशय लाभदायक आहे. या पोर्टल वर विविध शासकीय योजना, आर्थिक मदत, विमा, शैक्षणिक सहाय्य, आरोग्य सुविधा इत्यादी सेवा बांधकाम कामगारांना दिल्या जातात. राज्यातील कामगार Mahabocw online registration (नोंदणी) करून उपलब्ध सर्व योजनांचा लाभ घेऊ शकतात. येथे महिलांसाठी भांडी योजना तसेच बांधकाम कामगारांच्या पाल्यांसाठी Mahabocw scholarship status check सुविधा सारख्या अनेक सुविधा मोफत उपलब्ध आहे.
MAHABOCW चे उद्दिष्ट
या मंडळाचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या असंघटित कामगारांना सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देणे आणि त्यांचे सामाजिक व आर्थिक संरक्षण करणे हे आहे. या मंडळाद्वारे बांधकाम कामगारांची नोंदणी करून त्यांना अधिकृत ओळख दिली जाते.
कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांना विविध योजना उपलब्ध करून दिल्या जातात, जसे की अपघात, मृत्यू किंवा आजारपणाच्या वेळी आर्थिक मदत मिळते. मुलांच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती व शैक्षणिक सहाय्य दिले जाते. तसेच महिला कामगारांसाठी गर्भधारणेदरम्यान आर्थिक मदत आणि मुलीच्या विवाहासाठी सहाय्य अशा विशेष सुविधा पुरवल्या जातात.
महिलांना न काही करता लखपती बनवणारी पोस्टाची योजना। मिळणार 7.5% व्याजदर: Mahila Samman Yojana 2025
कोण नोंदणी करू शकतात?
- राजमिस्त्री, सुतार, प्लंबर, इलेक्ट्रिशियन
- रंगारी, वेल्डर, लोहार
- सिमेंट, वाळू, विटा उचलणारे मजूर
- रस्ते, पूल, इमारती, विहिरी, कालवे, धरणे इत्यादी बांधकामावर काम करणारे मजूर
अट:
- वय 18 ते 60 वर्षांच्या दरम्यान असावे.
- मागील 12 महिन्यांत किमान 90 दिवस बांधकाम क्षेत्रात काम केलेले असावे.
नोंदणी कशी करावी?
MAHABOCW Online Registration करण्यासाठी दोन मार्ग आहेत, ऑनलाइन व ऑफलाइन.
ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया
- अधिकृत संकेतस्थळावर जा https://mahabocw.in
- “Worker Registration” या पर्यायावर क्लिक करा.
- आवश्यक माहिती भरा जसे नाव, पत्ता, जन्मतारीख, मोबाईल नंबर इ.
- आधार कार्ड, रहिवासी दाखला, कामाचा पुरावा आणि पासपोर्ट फोटो अपलोड करा.
- अर्ज सबमिट करा.
- मंडळाकडून पडताळणी झाल्यानंतर नोंदणी प्रमाणपत्र मिळते.
ऑफलाइन नोंदणी प्रक्रिया
जवळच्या MAHA BOCW कार्यालयात किंवा कामगार सहाय्य केंद्रात अर्ज सादर करता येतो. कागदपत्रे देऊन अर्ज भरावा आणि अधिकाऱ्यांची सही घ्यावी.
Mahabocw profile Login
तुम्ही नोंदणीकृत कामगार असाल तर प्रोफिले लॉगिन कशी करायची जाणून घेऊ. सर्वप्रथम तुम्हाला अधिकृत वेबसाइट वर जायचे आहे. तेथे तुम्हला “बांधकाम कामगार प्रोफाइल लॉगिन करा” हा पर्याय निवडावा लागेल. त्यानंतर आधार नंबर आणि मोबाइलला नंबर टाकून तुम्ही लॉगिन करू शकता.
आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- राहत्या ठिकाणाचा पुरावा
- वयाचा पुरावा
- कामाचा पुरावा
- पासपोर्ट साईज फोटो
MAHA BOCW अंतर्गत मिळणाऱ्या योजना व लाभ
| योजना / लाभाचे नाव | थोडक्यात माहिती |
|---|---|
| 🧑🎓 शैक्षणिक सहाय्य योजना | कामगारांच्या मुलांना शिक्षणासाठी शिष्यवृत्ती |
| 👩⚕️ आरोग्य सहाय्य योजना | आजारपण किंवा अपघात झाल्यास वैद्यकीय मदत |
| 👰 कन्यादान योजना | मुलीच्या विवाहासाठी आर्थिक सहाय्य |
| 🏥 मृत्यू व अपघात विमा योजना | अपघात किंवा मृत्यू झाल्यास कुटुंबाला आर्थिक मदत |
| 🏡 घर बांधणी योजना | कामगारांसाठी घर बांधण्यासाठी आर्थिक सहाय्य |
| 👶 गर्भवती स्त्रियांसाठी सहाय्य | प्रसूतीदरम्यान आर्थिक मदत |
| 🧰 साधनसामग्री खरेदी योजना | कामासाठी आवश्यक टूलकिट खरेदीसाठी सहाय्य |
संपर्क व मदत
- अधिकृत संकेतस्थळ: https://mahabocw.in
- ईमेल: info@mahabocw.in
- हेल्पलाइन क्रमांक: 1800-123-9282 (टोल फ्री)
निष्कर्ष
MAHA BOCW मंडळ हे महाराष्ट्रातील लाखो बांधकाम कामगारांसाठी वरदान ठरले आहे. कामगारांच्या जीवनमानात सुधारणा घडवणे, त्यांना आर्थिक व सामाजिक सुरक्षा प्रदान करणे हे या मंडळाचे प्रमुख ध्येय आहे. म्हणून जर तुम्ही बांधकाम क्षेत्रात काम करत असाल, तर लगेच MAHABOCW मध्ये नोंदणी करून शासनाच्या सर्व योजनांचा लाभ घ्या.
मी नितिकेश, मागील 4 वर्षांपासून महाराष्ट्रातील विविध शासकीय माहिती, सरकारी नौकरी माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम करतोय. marathisathi.in या वेबसाईटवर तुम्हाला सर्व योजना एका ठिकाणी, अगदी सोप्या भाषेत समजून घेता येतील, कारण तुमचा हक्काचा लाभ मिळवायला माहिती असणं गरजेचं आहे!