महाराष्ट्रामध्ये नवीन 20 जिल्हे आणि 81 तालुके निर्माण होणार, बावनकुळेंनी मांडला प्रस्ताव, बघा संपूर्ण यादी

Maharashtra New Distric List
WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Maharashtra New Distric List: राज्यालतील लोकसंख्या हि दिवसेंस दिवस हजारोंच्या संख्येने वाढत चाललेली आहे. त्यामुळे आता गावांचे रूपांतर शहरात तर शहरे तालुका आणि जिल्ह्यांच्या आकाराने व्यापक बनत चालली आहेत. तेथील जनतेला वेळेवर शासकी कामे आणि इतर सुविधा मिळाव्या म्हणून महाराष्ट्रात नवीन 20 जिल्हे आणि 81 तालुके निर्माण होणारा प्रस्ताव राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी मांडला आहे. हा प्रस्ताव सायरेक्ट विधिमंडळात मांडल्या गेल्यामुळे यावर नक्की चर्चा होऊन नवीन जिल्ह्यांची आणि तालुक्यांच्या निमाणीकरणाचे आदेश निघणार असल्याची शक्यवता वर्तवली जात आहे. तुम्हला तुमचे गाव तालुका आणि जळ झालेले आवडेल का? नक्की कळवा.

🔶 Also Read: Maratha Aarakshan: मराठा आरक्षणाचा तिढा सुटता- सुटेना, उच्च न्यायालयात दाखल केली याचिका

चंद्रशेखर बावनकुळे स्पष्ट बोलले

हा ठराव मांडल्यानंतर चंद्रशेखखर बावनकुळे साहेबांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला आहे. त्यावेळी ते म्हणाले कि, खूप वर्षांपासून काही तालुक्यांना जिल्हा बनवण्याची मागणी जोर धरत आहे. अनेकदा आंदोलने झालेत परंतु शासनाने यावर निर्णय घेतला नाही. याचे कारण हेच आहे कि, पंधरा वर्षांपासून जनगणनाच झालेली नाही आहे, त्यामुळे लोकसंख्या आणि भौगोलिक परिस्थितीचा अंदाज लावता येत नाही. म्हणू हे प्रक्रिया रखडलेली होती.

मात्र केंद्रसरकारने विशेषतः प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांनी जनगणनेची घोषणा केली आणि जशी जनगणना होईल तसाच नवीन जिल्हे आणि तालुके घोषित करण्याचा मार्ग सुद्धा मोकळा होणार आहे. सधया हा प्रसार मी मांडलेला आहे, ज्यावर लवकरच चराच होईन निर्णय सुद्धा घेण्यात येईल, असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले.

नवीन जिल्हा किंवा तालुक्याचे होणारे फायदे

मित्रांनो, लोकसंखया वाढली त्यामुळे सरकारी कार्यालयांसमोर रांगाच्या रांगा बघायला मिळतात. नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो आणि काम पूर्ण झाले नाही तर दोन तीन द चक्रा सुद्धा माराव्या लागतात. ज्यामुळे मोठे आर्थिक नुकसान सुद्धा होते. हेच जर नवीन जिल्ह्ये किंवा तालुके बनतील तर तर गर्दी अर्धी होईल आणि शासकीय कामांना वेग येईल. तसेच प्रत्येक जिल्ह्याला आणि तालुक्याला मिळणाऱ्या निधीत वाढ होईल आणि अधिक विकास होण्यापासून कोणीही थांबवू शकणार नाही. तसेच गावातील नागरिकांना डायरेक्ट जिल्ह्याचे अंतर कमी होईल आणि प्रवास खर्च वाचेल.

राज्यात नवीन उदयोगांना नवीन जागा मिळेल आणि अर्थव्यवस्था चांगली होईल. नागरिकांना, महिलांना, शेकऱ्यांना सरकारी योजना आणि अन्य सरकारी सेवांचा लाभ झटपट घेता येईल. उपचारासाठी जास्त लांब जाण्याची गरज पडणार नाही.

सध्याचे जिल्हे

मित्रांनो, सध्या आपल्या राज्यामध्ये एकूण 36 जिल्हे असुंन प्रशासन सुलभ चालवण्यासाठी त्यांना एकूण सहा महसूल विभागात वाटले केले आहे. कोकण, पुणे, नासिक, छ. संभाजीनगर, अमरावती आणि नागपूर हे ते विभाग आहेत.

निष्कर्ष

राज्यामध्ये नवीन जिल्ह्यांची आणि नवीन तालुक्यांची निर्मिती अर्थातच विकासाची नांदी म्हणायला काही हरकत नाही. जेवढे जिल्ह्यांचा प्रस्ताव मांडण्यात आला तेवढे जरी नाही बनले त्यापेक्षा अर्धे जरी बनले तरी सुद्धा विकासाला चांगली चालना मिळू शकते. लवकरच या प्रस्ताव मंजूर हौल आणि त्यामध्ये तुमच्या जिल्ह्याचे सुद्धा नाव येईल हि अपेक्षा. यादी बघण्यासाठी व्हाट्स अप ला जॉईन करा, धन्यवाद.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *