Maharashtra Nuksan Bharpai: महाराष्ट्र २० ऑक्टोबर २०२५, अतिवृष्टी आणि पुरामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेल्या महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांना केंद्र सरकारकडून मोठा दिलासा मिळाला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घोषणा केली, दोन्ही राज्यांसाठी एकूण ₹१९५० कोटी ८० लाख रुपयांचा दुसरा हप्ता मंजूर केला आहे.
Aadhaar Card Loan 2025: फक्त आधार कार्डवर मिळणार ₹50,000 लोन! जाणून घ्या कसे मिळेल थेट खात्यात पैसे
महाराष्ट्राला ₹१५६६ कोटी, कर्नाटकाला ₹३८३ कोटी निधी
या निधीपैकी महाराष्ट्राला ₹१५६६ कोटी ४० लाख रुपये तर कर्नाटकला ₹३८३ कोटी ४० लाख रुपये मिळणार आहेत. हा निधी राज्य आपत्कालीन प्रतिसाद निधी (SDRF) अंतर्गत केंद्राच्या वाट्याचा भाग म्हणून दिला जाणार आहे. पूरग्रस्त भागांतील पुनर्वसन, रस्त्यांची दुरुस्ती आणि शेतीचे नुकसान भरून काढण्यासाठी ही रक्कम वापरण्यात येईल.
सरकारकडून तातडीची मदत दुष्काळग्रस्तांनाही आधार
केंद्र सरकारने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, देशभरातील पूर आणि दुष्काळग्रस्त नागरिकांना तातडीची मदत देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. यंदा एसडीआरएफ अंतर्गत २७ राज्यांना एकूण ₹१३,६०३ कोटींचा निधी वितरित करण्यात आला आहे. तसेच राष्ट्रीय नैसर्गिक आपत्ती निधी (NDMF) अंतर्गत ₹२१८९ कोटींची मदत देण्यात आली आहे.
Rojgar Hami Yojana: ग्रामीण भागात रोजगाराची हमी देणारी योजनांची बघा संपूर्ण माहिती.
आपत्ती काळात केंद्र सरकारची सक्रिय भूमिका
केंद्राने राज्य आपत्ती निवारण निधी (SDMF) अंतर्गत २१ राज्यांना ₹४५७१ कोटींची मदत दिली आहे, तर NDMF अंतर्गत ₹३७२ कोटींचा अतिरिक्त निधी देण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार आपत्ती काळात तत्परतेने मदतकार्य राबवत असल्याचे सरकारने स्पष्ट केले. एनडीआरएफ, लष्कर आणि हवाई दलाच्या मदतीने पूरग्रस्तांना तातडीची मदत पोहोचवण्यात आली आहे.
शेतकऱ्यांसाठी मदतीचा हात फडणवीस यांची प्रतिक्रिया
मॉन्सून काळात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्राने एनडीआरएफ चा दुसरा हप्ता जारी केला आहे. ही अग्रिम मदत असून, अंतिम निधी वाटपाची प्रक्रिया सुरू असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. त्यांनी केंद्र सरकारचे आभार मानत म्हटले की, पूर आणि अतिवृष्टीमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना ही मदत निश्चितच दिलासा देणारी ठरेल.
मी नितिकेश, मागील 4 वर्षांपासून महाराष्ट्रातील विविध शासकीय माहिती, सरकारी नौकरी माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम करतोय. marathisathi.in या वेबसाईटवर तुम्हाला सर्व योजना एका ठिकाणी, अगदी सोप्या भाषेत समजून घेता येतील, कारण तुमचा हक्काचा लाभ मिळवायला माहिती असणं गरजेचं आहे!