Manoj Jarange: सध्या मुंबई च्या आझाद मैदानावर मराठ आरक्षणासंदर्भात मोठे अंदोलन मराठा नेते मी मनोज जरांगेकडून केले जात आहे. त्यांच्या कडे महाराष्ट्रासह संपूर्ण देशाच्या नागरिकांचे ल क्ष लागलेले आहे. गरीब मराठ्यांना आरक्षण मिळण्यासाठी यापूर्वी सुद्धा अनेक मोठे-मोठे आंदोलने झालेली आहेत.
परंतु ज्या ज्याप्रकारे सध्याचे मुंबईमध्ये मराठा आंदोलनाने विअस्तरित रूप घेतले आहे तेवढे आतापर्यंत कधीच घडले नव्हते. मुंबईमधील प्रत्येक रस्त्यावर मराठा बांधव भगवे झेंडे घेऊन दिसत आहेत. सधया गणेश उत्सव जे मुंबईकरांच्या आवडीचा सण आहे आणि अशावेळेला सगळीकडे ट्राफिक ज्याम झाल्यामुळे मुंबईकरांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अशातच न्यायालयाने आंदोलनं कर्त्यांना मोठा धक्का दिला आहे.
रस्ते रिकामे करण्याचे दिले आदेश
न्यायालयाने मनोज जरांगेच्या आंदोलनाची दाखल घेत प्रशासनाला मुंबई मधील आझाद मैदान व्यतिरिक्त ज्या ठिकाणी आंदोलक दिसतील त्यांच्यावर कारवाईला करण्याचे आदेश दिले आहे. तसेच लवकरात लवकर मुंबईकरांसाठी रस्ते रिकामे करून देण्याच्या सूचना सुद्धा केल्या आहेत.
कारण जेव्हा मराठा आरक्षणासाठी परवानगी दिली जात नव्हती तेव्हा न्यायालयाने मात्र आंदोलन करण्याचा प्रत्येकाचा अधिकार आहे असे मत व्यक्त केले होते. मात्र एवढे आंदोलक मुंबई मध्ये येतील याची अपेक्षा क्षणाला पण नव्हती आणि न्यायालयाला सुद्धा नव्हती. त्यामुळे जे आंदोलनस्थळांव्यतिरिक्त ज्या ठिकाणी आंदोलनकर्ते गोंधळ घालत आहेत. त्यान्ना मुंबई मधून बाहेर कडून रस्ते रिकामे करण्याचे आदेश न्यायाने दिले.
आंदोलनकर्त्यांवर होणार गुन्हे दाखल
पाच हजार आंदोलकांना मुंबईमध्ये येऊन आंदोलन किंवा उपोषण करण्याची परवानगी दिली होती. मात्र याउलटच चित्र आपण मुंबई मध्ये बघत आहोत. जे आंदोलक शासनाच्या प्रॉपर्टीचा विनाकारणच चाले करण्यासाठी उपयोग करत आहेत आणि नासधूस करत आहेत त्यांच्यावर सक्त कारवाई करून गुन्हे दाखल करण्याचे आदेश सुद्धा प्रशासनाला न्यायालयाने दिले आहेत.
ओबीसी मधून आरक्षण देण्यास मुख्यामंत्र्यांनी दिला नकार
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी मधून मराठा समाजाला आरक्षण देणेसाठी स्पष्ट नकार दिला आहे. मात्र मराठा नेता मनोज दादा जरंगे यांचा हट्ट आहे कि त्यांना आरक्षण हे ओबीसींमधूनच हवे आहे. त्यामुळे सध्या चालू असलेल्या त्यांचे आमरण उपोषणाचे आंदोलन बेमुदत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. अशातच मराठा नेता राधाकृष्ण विखे पाटील यांनी माडातून काही तरी मार्ग निघत असल्याचे संकेत प्रसार माध्यमांसमोर दिले आहे.
आंदोलनामध्ये सुप्रिया सुळेंवर फेकल्या पाण्याच्या बॉटल
सध्या मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रातीलच मराठा बांधव आरक्षण मिळवण्यासाठी करो या मारो च्या भूमिकेत आहेत. अशातच जेव्हा जिथे मनोज जरांगेचे आंदोलन सुरु आहे त्या ठिकाणी सुप्रिया ताई सुळे त्यांची भेट घेण्याकरता आणि आंदोलनाला समर्थान करण्याकरता गेल्या होत्या.
मात्र काही आंदोलकांनी त्यांना घेरलं आणि त्यांच्यावर पाण्याच्या बॉटल सुद्धा फेकल्या होत्या. तसेच काही आंदोलांनी त्यांचे वडील शरद पवार साहेब यांच्या विरुद्ध सुद्धा घोषणाबाजी केली होती. तरी सुद्धा सुप्रियाताईंनी सतेज वर जाऊन मनोज जरांगेची भेट घेऊन विचारपूस केली आणि आंदोलनाला समर्थन दिले होते.
नमस्कार,
माझे नाव आकाश भगत आहे, मी एक ब्लॉगिंग क्षेत्रामध्ये मागील 4 वर्षांपासून कार्यरत आहे. मी 2023 पासून योजना या टॉपिक वरती ब्लॉग लिहत आहो. त्यामुळे माझ्याकडे जवळपास 2 वर्षाचा योजना, नौकरी आणि इतर शासकीय माहितीच्या टॉपिक चा अनुभव आहे. तसेच मी सध्या marathisathi.in या साईट च्या माध्यमातून सर्व माहिती सोप्या आणि खऱ्या स्वरूपाची देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहे.