Maratha Aarakshan: मराठा आरक्षण, एक असा लढा जो वर्षानुवर्षांपासून अजून सुद्धा सुरूच आहे. मित्रांनो, मागील दहा दिवसात जे मुंबई मध्ये मराठा समाजाने मराठा आरक्षणासाठी आंदोलन केले त्याच्याकडे संपूर्ण देशाने बारकाईने बघितले आहे. या आंदोलनाने संपूर्ण मुंबई हि भगव्या रंगांनी नटलेली होती. राज्यभरातून लाखो मराठा बांधव आपल्या पुढच्या पिढीच्या भविष्याचा विचार करून या आंदोलनात शामिल झाले होते. या तोडगा काढत मराठा आरक्षणाचा तोडगा काढत हैद्राबाद गॅझेट मांडले. ज्यानुसार आंदोळकरांना वाटले कि या मार्फत आपण आता OBC मध्ये नक्कीच सामाविस्ट होऊ आणि आरक्षणाचा लाभ घेऊ. त्यामुळे मराठा नेते मनोज दादा जरंगे यांनी त्यांच्या सहकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार शासनाने काढलेला जी- आर मान्य केला आणि आपले आंदोलन सफल झाल्याचे जाहीर केले. मात्र त्यानंतर जसे सर्व मराठे गावाकडे गेले तेव्हापासून खरी सर्कसच सुरु झाली.
Also Read: Devendra Fadnavis आणि Manoj Jarange येणार सोबत? जरांगे देणार का फडणवीसांना साथ?
मराठा आरक्षण विवाद
मित्रांनो, मराठा समाज आरक्षण मिळायला हवे हि सर्वांची इच्छा जरी असली तरी मात्र OBC बांधवांच्या या आरक्षणाला तीव्र विरोध केला जात आहे. याचे कारण असे कि, मराठा आंदोलकांना आरक्षण हे OBC प्रवर्गातून हवे आहे. OBC समाज मात्र आपल्या आरक्षण हे मराठयांना देण्यास नकार देत आहेत. कारण सहाजिकच आहे जर आपल्याकडे फक्त एक भाकर आहे आणि आपली भूक मोठी आहे आणि जर त्या एका भाकरीतसुद्धा हिस्से पाडण्यात आलेत तर मात्र याचे मोठे नुकसान हे OBC समाजाला होणार आहेत. म्हणून OBC नेते हे या हैद्राबाद गेझेट ला कडाडून विरोध करत आहे. त्यांचे असे म्हणणे आहे कि गरजवंत मराठ्यांना आरक्षण मिळाले पायजे परंतु आमचे आरक्षण न देता. महाराष्ट्रात वेगळ्या वेगळ्या ठिकाणे ओबीसी समाज आंदोलने सुद्धा करत आहे.
मुंबई उच्च न्यायालयात याचिका
महाराष्ट्र सरकारने Maratha Aarakshan करता हैद्राबाद गॅझेट आणि सातारा गॅझेटचा जी- आर हा 2 सप्टेंबर रोजी काढला होता. याच जी- आर ला आव्हाहन म्हणून मुंबई उच्च नायालयामध्ये दोन जनहित याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. शासनाने काढलेला जी- आर आणि घेतलेला निर्णय पूर्णपणे बेकायदा असल्याने तो रद्द करण्यात यावा अशी मागणी यावेळी याचिका कर्त्यांकडून करण्यात आली आहे.
हि याचिका प्रलंबित असेपर्यंत सरकारने काढलेल्या अधिसूचना किंवा जी-आरची अंमलबजावणी होऊ नये आणि कोणत्याही मराठा समुदायातील व्यक्तीला ओबीसींचे जातप्रमाणपत्र मिळू नये अशीसुद्धा मागणी या याचिकेत झालेली आहे. मित्रांनो, शिव अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेने आणि त्यासोबत युवक संघटनेचे वकील, ऍड. सतीश तळेकर यांनी हि याची मुबई उच्च न्यायालयामध्ये दाखल केली, तर दुसरी याचिका हि वकिलीचा व्यवसाय करणारे ऍड. विनिताजी धोत्रे यांच्याकडूनसुद्धा करण्यात आली आहे. लवकरच या याचिकेवर उच्च न्यायालय भूमिका स्पष्ट करणार असल्याची शक्यता आहे.
काय आहे या याचिकेत
मित्रांनो, जोई उच्च न्यायालयात Maratha Aarakshan विरोधात जी याचिका टाकण्यात आली आहे त्यामध्ये मराठा आणि कुणबी अर्थातच OBC हे एक नसून मराठा समाज हा अर्थी आणि सामाजिक बाबतीने मागास नसल्याचे सर्वोच न्यायालयाने खूपदा स्पष्ट करून सुद्धा राज्यसरकारने मराठा समाजातील व्यक्तींना कुणबीचे प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सरकारचा निर्णय हा सर्वोच न्यायालयाने दिलेल्या निकालाचे उल्लंघन करणारा आहे. असे या याचिकेमध्ये स्पष्ठ मत मांडण्यात आले आहे.
अशा पद्धतीने जर मराठा समाजाला ओबीसी मध्ये सामावून घेतले गेले तर मात्र ओबीसी प्रवर्गातील नागरिकांची सरकारी नोकरी आणि इतर ठिकाणी मिळणारी संधी मात्र हिरावून घेतली जाते. सरकारने आंदोलनकर्ते जराजे याच्या दबावाला बाली पडून हा निर्णय घेऊन इ अधिसूचना जारी केली आहे. सरकारने संविधानिक तत्व आणि मूल्यांएवजी तुष्टीकरणाला प्राधान्य दिले असल्याचा आरोप सुद्धा यामध्ये केला गेला आहे. तसेच जर शासनाने काढलेल्या हैद्राबाद गॅझेट नुसार आरक्षण लागू केले तर मात्र आरक्षणाची जी मर्यादा आहे ते ओलांडली जाऊ शकते.
राज्यसरकारने जी- आर च्या माध्यमातून जया अधिसूचना काढल्या आहेत त्या भेदभावपूर्ण, मनमानी आणि घटनेचे कलम 14 चे उल्लंघन करणारे आहे. राजकीय फायदा किंवा स्वार्थापोटी हा निर्णय सरकारने घेतला असल्याचा गंभीर आरोप याचिकाकर्त्यांनी केला आहे.
निष्कर्ष
सरकारने जरी Maratha Aarakshan दिले असले, तरी खरी कसोटी हि न्यायालयामध्ये असणार आहे. कारण सध्या मुंबईच्या उच्च नायालयामध्ये दोन याचिका सरकारने काढलेल्या अधिसूचनविषयी दिल्या गेल्या आहेत. त्यामुळे हा तिढा कधी सुटेल हे बघणे महत्वाचे असेल.
नमस्कार,
माझे नाव आकाश भगत आहे, मी एक ब्लॉगिंग क्षेत्रामध्ये मागील 4 वर्षांपासून कार्यरत आहे. मी 2023 पासून योजना या टॉपिक वरती ब्लॉग लिहत आहो. त्यामुळे माझ्याकडे जवळपास 2 वर्षाचा योजना, नौकरी आणि इतर शासकीय माहितीच्या टॉपिक चा अनुभव आहे. तसेच मी सध्या marathisathi.in या साईट च्या माध्यमातून सर्व माहिती सोप्या आणि खऱ्या स्वरूपाची देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहे.