MGNREGA Free Cycle Yojana: मित्रांनो, मनरेगा अर्थात महात्मा गांधी रोजगार हमी योजना होय. या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक गावातील बेरोजगारांना रोजगार देण्याचे काम हे स्थानिक पाटलियावर केले जाते. ज्याला कामाची गरज आहे परंतु गावामध्ये कामच मदत नाही आहे, अशा नारिकांना या योजनेच्या माध्यमातून कामाची हमी दिली जाते. ज्या मजुरांकडे या योजनेचे जॉब कार्ड असेल अशांनाच या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या लाभाचा फायदा मिळवता येऊ शकतो. MGNREGA Free Cycle Yojana हि सुद्धा त्या लाभांपैकी एक आहे.
Also Read: PM Wani Yojana: पीएम वाणी योजनेअंतर्गत मिळणार अगदी मोफत Wi-Fi, सोबत इंटरनेट सुद्धा असेल मोफत
MGNREGA Free Cycle Yojana काय आहे?
रोजगार हमीच्या माध्यमातून रोजगार तयार करण्यासाठी स्थानिक ग्रामसचिव व गावाचा सरपंच गावाच्या विकासासाठीच काम शोधून देत असतात. परंतु जर तुम्ही मजूर असाल तर तुम्हाला चांगले माहित असेल कि, काम कुठे कुठे दिले जाते. तुमच्या गावाच्या किमान पाच किलोमीटर पर्यंतच्या क्षेत्रामध्ये कुठेही कामाचे नियोजन करून रोजगार दिला जातो. जरी गावामध्ये कुठे काम नसले, तर जर कोणी काम मागितले तर त्यांना रोजगार देणे हि ग्राम सचिवांची जबाबदारी राहते. आणि जर का काम हे पाच किलोमीटर अंतरावर असेल तर सोबत आपले संसाधन घेऊन जाते फार जड असते. म्हणून जे नागरिक रोजगार हमीचे मजूर आहेत असाहन्न MGNREGA Free Cycle Yojana राबवून सायकल खरेदी करण्याकरता 4 हजारांचे अनुदान दिले जाते.
योजनेचा उद्देश
मजूर म्हटले कि, शेतकऱ्यांपेक्षा गरजू आणि गरीब घटक असतो. त्यांच्याकडे मजुरी व्यातिरीक्त कुठलेही उत्पन्नाचे साधने नसतात. त्यात जर का हाताला काम सुद्धा नसले तर त्यांचे आणि परिवाराचे उदरनिर्वाहाचे फार मोठे संकट उभे राहील. तसेच रोजगार हमी योजनेअंतर्गत काम मिळतो परंतु ते सुद्धा एवढे लाभ असते कि, कामावर जाण्यासाठीच दोन तीन तास लागतील. वरून पायाला जो त्रास होतो तो वेगळा. यावर उपाय आणि कामगारांना मदतीचा हात म्हणून 4 हजारांचे अनुदान हे सायकल खरेदीसाठी शासन देत आहे.
योजनेचे पात्रता निकष
अर्जदार हा एक मजूर असणे आवश्यक आहे. त्याच्याकडे जॉब कार्ड असावे आणि त्याचे वय किमान अठरा वर्ष तरी असावे. जे कामगार दारिद्र्यरेषेखालील असेल त्यांना 4 हजारांचे अनुदान मिळण्यासाठी अधिक प्राधान्य मिळणार. रोजगार हमी मध्ये कामागार्ने किमान नव्वद दिवस काम केले असेल तर त्यांना या योजनेसाठी पात्र करण्यात येईल.
आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- जॉब कार्ड
- रहिवासी दाखला
- जन्माचा दाखला
- बँकेचे खातेबुक
- पासपोर्ट फोटो
- मोबाईल नंबर
येथे करा अर्ज
MGNREGA Free Cycle Yojana साठी अर्ज करायचा असल्यास MGNREGA च्या अधिकृत वेबसाईटवर जायचे आहे. त्याचे होम पेज मध्ये फ्री सायकल योजना असावा पर्याय असेल, त्यावरती क्लिक करा. तुमच्यापुढे योजनेचा अर्ज येईल त्यात तुमची आणि जॉब कार्डच्या सर्व सदस्यांची माहिती टाकावी आणि अर्ज सबमिट करा.
निष्कर्ष
मजूर बांधवांनो, सायकल हे कामावर जाण्यासाठीचे एक उत्तम साधन आहे. सायकल या योजनेच्या माध्यमातून मोफत तर मिळणारच आहे ज्यामुळे मजुरांना श्रम कमी लागतील आणि पायांना अराम मिळेल. तसेच त्यामध्ये पेट्रोल टाकावे लागत नाही म्हणून शिल्लकच खर्च हि येत नाही. तुमच्याकडे जॉब कार्ड असेल तर नक्कीच या योजनेचा लाभ घेऊ शकता.
नमस्कार,
माझे नाव आकाश भगत आहे, मी एक ब्लॉगिंग क्षेत्रामध्ये मागील 4 वर्षांपासून कार्यरत आहे. मी 2023 पासून योजना या टॉपिक वरती ब्लॉग लिहतोय. त्यामुळे माझ्याकडे जवळपास 2 वर्षाचा योजना, नौकरी आणि इतर शासकीय माहितीच्या टॉपिक चा अनुभव आहे. तसेच मी सध्या marathisathi.in या साईट च्या माध्यमातून सर्व माहिती सोप्या आणि खऱ्या स्वरूपाची देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहे.