Mofat Bhandi Yojana 2025: महाराष्ट्र सरकार राज्यातील बांधकाम कामगारांना मदत करण्यासाठी अनेक योजना राबवत असतात त्यापैकीच मोफत भांडी योजना सुद्धा आहे. या योजनेतून लाभार्थी पात्र महिलांना ₹15,000 ते ₹30,000 रुपये पर्यंत किमतीचा भांडी संच मोफत दिला जातो. यात दैनंदिन जीवनात लागणारे स्वयंपाक घरातील अनेक प्रकारचे उपयोगी भांडी असतात. महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने (Maharashtra Building and Other Construction Workers Welfare Board) अंतर्गत हि योजना राबवण्यात येते.
Mofat Bhandi Yojana १३ फेब्रुवारी २०२४ रोजी सुरू करण्यात आली असून, आता तिची अर्ज प्रक्रिया पुन्हा सुरू झाली आहे. चला तर जाणून घेऊ या योजनेचा लाभ कोणत्या महिलांना मिळणार आहे आणि अर्ज प्रक्रिया काय असणार आहे. तसेच मोफत भांडी योजनेत मिळणारे कोणते भांडे आहेत याची यादी सुद्धा जाणून घेऊ.
Mahila StartUp Yojana: महिलांना उद्योगासाठी मिळणार 1 लाख ते 25 लाख पर्यंत आर्थिक मदत, असा करा अर्ज
Mofat Bhandi Yojana मुख्य उद्देश
हि योजना राज्यातील गरीब व गरजू बांधकाम कामगार क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांसाठी सुरु करण्यात आली आहे. या योजनेचा मुख्य उद्देश बांधकाम कामगारांना आर्थिक मदत देणे आणि त्यांच्या स्वयंपाकासाठी आवश्यक भांड्यांची सोय करून देणे हा आहे. अनेक कामगारांना रोजच्या गरजा पूर्ण करण्यास अडचणी येतात, अशा कामगारांना या योजनेचा मोठा फायदा मिळणार आहे.
मिळणाऱ्या ३० भांड्यांची यादी
अनु. क्र. | वस्तूचे नाव | संख्या |
---|---|---|
1 | ताट | 4 |
2 | वाट्या | 8 |
3 | पाण्याचा ग्लास | 4 |
4 | पातेले (झाकणासह) | 3 |
5 | भातवाडी | 1 |
6 | मोठा चमचा | 1 |
7 | पाण्याचा जग (2 लिटर) | 1 |
8 | मसाल्याचा डब्बा (7 कप्प्याचा) | 1 |
9 | तीन डब्याचा सेट (14, 16, 18 इंच) | 3 |
10 | परात | 1 |
11 | कुकर (5 लिटर, स्टेनलेस स्टील) | 1 |
12 | कढई (स्टीलची) | 1 |
13 | स्टीलची पाण्याची टीप (झाकणासह) | 1 |
एकूण | – | 30 वस्तू |
मोफत भांडी योजनेसाठी पात्रता
योजनेचा लाभ केवळ लाभार्थी पात्र महिलांना मिळावा म्हणून राज्य सरकारने यासाठी काही अटी व पात्रता जाहीर केल्या आहेत. जसे अर्जदार महिला हि महाराष्ट्रातील स्थायी रहिवासी असणे आवश्यक आहे तसेच ती महिला महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार मंडळात नोंदणीकृत असणे आवश्यक आहे. त्या महिलेचे कामगाराचे कार्ड आणि स्मार्ट कार्ड सक्रिय (Active) असणे आवश्यक आहे. यापूर्वी महिलेने Mofat Bhandi Yojna करीत अर्ज केलेला नसावा. एका कुटुंबातील एकाच महिलेला योजनेचा लाभ मिळणार आहे.
अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- कामगाराचे नोंदणी प्रमाणपत्र (वर्कर्स कार्ड)
- रेशन कार्ड
- रहिवासी प्रमाणपत्र
- वार्षिक उत्पन्न दाखला
- 90 दिवस कामाचे प्रमाणपत्र
- हमीपत्र
- पासपोर्ट साईज फोटो
अर्ज करण्याची प्रक्रिया
Mofat Bhandi Yojana Online Apply करण्यासाठी तुम्हाला https://mahabocw.in या अधिकृत वेबसाइट वर जावे लागेल. येथे गेल्यावर “Workers Registration” हा पर्याय निवडून नाव, मोबाईल नंबर, आधार क्रमांक, पत्ता इत्यादी माहिती भरून नोंदणी करा. त्यानंतर तुम्हाला सर्व आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करायचे आहे. सर्व तपशील तपासून अर्ज सबमिट करा. नोंदणी पूर्ण झाल्यानंतर, अर्ज मंजूर झाल्यावर तुम्हाला मोफत भांडी संच योजनेचा लाभ दिला जाईल.
निष्कर्ष
Mofat Bhandi Yojana ही बांधकाम क्षेत्रातील कामगारांसाठी अत्यंत उपयुक्त योजना आहे. या योजनेमुळे कामगारांना दैनंदिन जीवनातील मूलभूत गरजांची पूर्तता करण्यात मदत होईल. ही योजना पूर्णपणे मोफत असून, कोणत्याही प्रकारे पैसे मागितल्यास सावध राहा आणि थेट अधिकृत पोर्टलवरूनच अर्ज करा.
मी नितिकेश, मागील 4 वर्षांपासून महाराष्ट्रातील विविध शासकीय माहिती, सरकारी नौकरी माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम करतोय. marathisathi.in या वेबसाईटवर तुम्हाला सर्व योजना एका ठिकाणी, अगदी सोप्या भाषेत समजून घेता येतील, कारण तुमचा हक्काचा लाभ मिळवायला माहिती असणं गरजेचं आहे!
Im worker in office