MSRTC Bharti: नोकरीच्या शोधात आहेत परंतु अजूनही चांगली नोकरी मिळालेली नाही, तर आता खास दहावी पास आणि आयटीआय झालेल्या तरुणांसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळामध्ये नोकरी करण्याची संधी धावून आली आहे. मित्रांनो या भरतीमध्ये साधारणता एकूण 367 प्रशिक्षणार्थींच्या पदे भरली जाणार आहेत. जर तुमचा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास नसेल किंवा परीक्षाच द्यावयाची नसेल तरी तुम्ही या MSRTC Bharti साठी अर्ज करू शकणार आहेत. कारण महामंडळात जी हि भरती घेतली जात आहे ती प्रशिक्षणार्थी पद करता असेल. या पदासाठी कुठलीही लेखी पारिक्षा घेतली जात नाही. या मध्ये 10 वी आणि ITI पास विद्यार्थ्यांपासून पदवीधारक विद्यार्थी सुद्धा अर्ज करू शकणार आहेत.
Also Read: BSF Recruitment 2025: सीमा सुरक्षा दलात नोकरीची संधी 1121 जागांची आली जाहिरात
MSRTC Bharti संपूर्ण तपशील
महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यामध्ये MSRTC Bharti केली जाणार आहे. पात्र उमेदवारांना त्यांच्या शिक्षणानुसार महामंडळातील विविध पदांसाठी अर्ज करता येऊ शकतो. तसेच या भरतीमध्ये इलेकट्रोनिक्स मेकॅनिक, मोटार मॅकेनिक, शिटमेटल वर्कर, वेल्डर, पेंटर आणि डिझेल मॅकेनिक यांसारख्या पदांकरता अर्ज मागवण्यात येत आहेत.
शैक्षणिक पात्रता
- MSRTC Bharti साठी उमेदवार किमान दहावी उत्तीर्ण असावा
- वेगळ्या वेगळ्या पदानुसार त्या त्या फिल्ड आयटीआय उत्तीर्ण असावे
- तसेच इंजिनिअर सुद्धा या महामंडळाच्या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत.
वयोमर्यादा
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळासाठी प्रशिक्षणार्थीचा अर्ज हा 18 ते 35 याच वयोगटातील उमेदवार करू शकतील. उमेदवार जर अनुसूचित जाती आणि जमातीमधील असेल तर त्याला पाच वर्षाची वयोमर्यादेत सूट डेली जाणार आहे.
महत्वाच्या तारका
MSRTC Bharti साठी मागील महिन्यातच अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून सप्टेंबरची 11 तारीख हि शेवटची असणार आहे.
भरतीचा अर्ज कसा कारायचा
भरतीचा अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम तुमची नोंदणी होणे आवश्यक असेल. त्यासाठी तुम्हाला www.apprenticeshipindia.gov.in या अधिकृत वेबसाईट वर जायचे आहे. तुमची नोंदणी झाल्यानंतर भरतीचा अर्ज भरून एन डी पटेल रोड, शिंगाडा तलाव, नाशिक येथील पत्त्यावर जमा करून द्यावा लागतो. मित्रांनो, अर्ज करण्याची वेळ संपायच्या आत लवकर अर्ज करा हि विनंति.
भारतीचा अर्ज करण्यासाठी |
येथे क्लिक करा |
निष्कर्ष
राज्यातील बेरोजगार युवकांना MSRTC Bharti चा अर्ज भरून प्रशिक्षणार्थी पदाची नोकरी मिळवता येणार आहे. सरकारी क्षेत्रातील किंवा महामंडळांमध्ये नोकरी करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना उत्तम संधी चालून आलेली आहे. अधीक माहिती हवी असल्यास तुम्ही महामंडळाच्या अधिकृत साईटला भेट देऊ शकता.
नमस्कार,
माझे नाव आकाश भगत आहे, मी एक ब्लॉगिंग क्षेत्रामध्ये मागील 4 वर्षांपासून कार्यरत आहे. मी 2023 पासून योजना या टॉपिक वरती ब्लॉग लिहत आहो. त्यामुळे माझ्याकडे जवळपास 2 वर्षाचा योजना, नौकरी आणि इतर शासकीय माहितीच्या टॉपिक चा अनुभव आहे. तसेच मी सध्या marathisathi.in या साईट च्या माध्यमातून सर्व माहिती सोप्या आणि खऱ्या स्वरूपाची देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहे.