Mukhyamantri Rajshri Yojana Maharashtra 2025: राज्य शासनाने ही योजना राबवायला सुरुवात केली आहे. या योजनेचा मध्यातून लाभार्थी मुलींना टप्या टप्याने 50000 रुपये ची आर्थिक मदत केली जाणार आहे. राज्यातील गरीब परिवारातील मुलींचा शिक्षणासाठी, आरोग्यासाठी आणि भविष्यासाठी आर्थिक आधार निर्माण करण्यासाठी हि योजना राबवण्यात येत आहे.
महाराष्ट्र सरकारने सुरु केलेली हि योजना मुलींचा परिवारासाठी आणि मुलींसाठी सुद्धा खूप लाभदायक आहे. राज्यातील सर्व मुलींना चांगले शिक्षण मिळावे, चांगले आरोग्य मिळावे हा या योजनेचा उद्देश आहे. मुख्यमंत्री राजश्री योजना महाराष्ट्र या योजनेचा लाभ मिळण्यासाठी अर्ज प्रक्रिया काय आहे तसेच योजनेसाठी पात्रता काय आहे याची माहिती आपण या लेख मध्ये जाणून घेऊ.
Sakhi One Stop Centre Yojana Maharashtra
Mukhyamantri Rajshri Yojana Maharashtra | मुख्यमंत्री राजश्री योजना म्हणजे काय?
मुख्यमंत्री राजश्री योजना हि महाराष्ट्र शासनाची आर्थिक सहायता करणारी योजना आहे. या योजनेअंतर्गत मिळणार लाभ हा टप्प्या टप्प्याने दिला जातो. मुलगी जन्माला आल्या पासून 12 वी उत्तीर्ण होई पर्यंत एकूण 6 टप्यांमध्ये 50,000 रुपये चा लाभ दिला जातो. 1 जून 2016 नंतर जन्म झालेल्या मुलींनाच या योजनेचा लाभ दिल्या जाणार आहे. मुलींचे शिक्षण, आरोग्य तसेच अन्य गरजा पूर्ण करण्यासाठी हि मदत केली जाते.
मुख्यमंत्री राजश्री योजना या योजनेचे नाव आधी मुख्यमंत्री शुभलक्ष्मी योजना होते, त्याला बदलवून आता Mukhyamantri Rajshri Yojana Maharashtra असे केले आहे. मुलींनी शिकावे, मुलींनी नौकरी करावी अशी या योजनेमागची सरकारची घोषणा आहे.
Mukhyamantri Rajshri Yojana चे मुख्य बिंदू
योजनेचं नाव | मुख्यमंत्री राजश्री योजना |
राज्य | महाराष्ट्र |
श्रेणी | राज्य सरकार ची योजना |
लाभार्थी | राज्यातील गरीब परिवारातील मुली |
लाभ | 50,000 रुपये |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाईन |
योजनेचा उद्देश
मुलींचा जन्म म्हणजे आनंदाचा क्षण असायला पाहिजे, त्यावर कुठल्याही दुःखाची छाया नसावी या भावनेने प्रेरित होऊन राज्य सरकारने मुख्यमंत्री राजश्री योजनेचा आरंभ केला आहे. या योजनेचा मुख्य उद्देश आहे मुलीचा जन्माला प्रोत्साहन देणे तसेच मुलींचा शिक्षणासाठी, चांगल्या आरोग्यासाठी सहायता करणे आहे. मुलगी हि भार नाही तर आधार आहे हे समाजाला समजून सांगणे हा सुद्धा या योजनेचा उद्देश असू शकतो.
योजनेचे फायदे
- मुलींचा जन्मावेळी आर्थिक मदत मिळते.
- मुलीचा जन्म झाल्यापासून तर 12 वी उत्तीर्ण होई पर्यंत टप्या टप्याने सहायता मिळते.
- मुलींचा वडिलांचा आर्थिक भार कमी होतो.
- मुलींचा आरोग्य, शिक्षण आणि सुरक्षितकडे लक्ष दिले जाते.
अनुदान रक्कम कशी मिळते?
मुख्यमंत्री राजश्री योजनेचा अंतर्गत मिळणारी लाभ राशी हि मुलीचा वडिलांचा खात्यात जमा केली जाते.
टप्पा | आर्थिक सहाय्य |
---|---|
मुलीचा जन्म नोंदणीकृत केल्यावर | ₹5,000 |
मुलगी 1 ली मध्ये शाळेत गेल्यावर | ₹5,000 |
6 वी मध्ये प्रवेश घेतल्यावर | ₹7,000 |
9 वी मध्ये प्रवेश घेतल्यावर | ₹8,000 |
11 वी मध्ये प्रवेश घेतल्यावर | ₹10,000 |
12 वी उत्तीर्ण केल्यावर | ₹15,000 |
एकूण सहाय्य | ₹50,000 पर्यंत |
Mukhyamantri Rajshri Yojana Maharashtra साठी पात्रता काय असणार
- मुलगी व मुलीचा परिवार महाराष्ट्रातील रहिवासी असायला पाहिजे.
- मुलीचा जन्म 1 जून 2016 नंतर झाला असावा.
- मुलीचा जन्म हा सरकारी रुग्णालयात किंवा अधिकृत संस्थेत झालेला असावा.
- जन्म नोंदणी झालेली असावी.
- मुलीचा कुटुंबच वार्षिक उत्पन्न 6 लाख पेक्षा कमी असायला पाहिजे.
- मुलगी मान्यता प्राप्त किंवा शासकीय शाळेत शिक्षण घेत असावी.
आवश्यक कागदपत्रे
- मुलीचा जन्म दाखला
- आधार कार्ड (मुलगी आणि पालक दोघांचे)
- उत्पन्नाचा दाखला
- बँक पासबुक झेरॉक्स
- शाळा प्रवेश प्रमाणपत्र (शिक्षणसाठी टप्प्यांवर)
- रहिवासी दाखला
- स्वयंघोषणा पत्र (कुटुंबात किती मुले आहेत हे स्पष्ट करणारे)
योजनेसाठी ऑनलाईन अर्ज असा करा
योजनेचा लाभ घेण्यासाठी Mukhyamantri Rajshri Yojana Maharashtra ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. अर्ज केल्या शिवाय लाभ मिळणार नाही. त्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला सगळ्यात महत्वाचे म्हणजे कागदपत्रे आहे, सर्व आवश्यक कागदपत्रे आधी स्कॅन करून ठेवा. त्यानंतर महाराष्ट्र शासनाचा जनकल्याण पोर्टल वर जा. येथे तुम्हाला “राजश्री योजना” हा पर्याय शोधावा लागेल. पोर्टल ला रजिस्टर करून लॉगिन करायचं आहे त्यानंतर तुम्ही योजनेचा फॉर्म भरू शकता. सगळे कागदपत्रे अपलोड करून फॉर्म ला सबमिट करा.
निष्कर्ष
Mukhyamantri Rajshri Yojana Maharashtra, गरीब कुटुंबातील मुलींसाठी तसेच परिवारसाठी अतिशय लाभदायक योजना आहे. मुलीचा जन्मापासून तर शिक्षणापर्यंतचा प्रवासाला सरकारची साथ राहणार आहे. जर तुमचा घरामध्ये मुलीचा जन्म झाला असेल आणि तुम्ही योजनेसाठी पात्र असाल तर आताच अर्ज करा आणि योजनेचा लाभ घ्या.
FAQ
1) Rajshri Yojana Maharashtra फक्त सरकारी शाळांमध्ये शिकणाऱ्या मुलींना लागू आहे का?
नाही, ही योजना शासकीय किंवा शासन मान्यताप्राप्त खासगी शाळांमध्ये शिकणाऱ्या मुलींनाही लागू आहे.
2) अनुदानाची रक्कम कुठे मिळते?
अनुदानाची रक्कम मुलीच्या आई किंवा वडिलांच्या नावावरील बँक खात्यात थेट जमा केली जाते.
3) जर मुलगी शाळा सोडली तर काय?
जर मुलीने शिक्षण सोडले, तर त्या पुढील टप्प्यांवरील रक्कम देण्यात येणार नाही आणि योजना रद्द केली जाऊ शकते.
मी नितिकेश, मागील 4 वर्षांपासून महाराष्ट्रातील विविध शासकीय माहिती, सरकारी नौकरी माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम करतोय. marathisathi.in या वेबसाईटवर तुम्हाला सर्व योजना एका ठिकाणी, अगदी सोप्या भाषेत समजून घेता येतील, कारण तुमचा हक्काचा लाभ मिळवायला माहिती असणं गरजेचं आहे!