राज्यातील सर्व शेतकरी Namo Shetkari Yojana 7th Hafta चे 2000 रुपये किस्त ची वाट पाहत होते. परंतु आता त्यांची वाट संपली आजपासून सर्व लाभार्थी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात हफ्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर सांगितले राज्यातील ९१ लाख ६५ हजार १५६ शेतकऱ्यांच्या खात्यात १८९२ कोटी ६१ लाख रुपये जमा केले गेले आहे.
🌾 नमो शेतकरी योजनेचा उद्देश
शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत देऊन त्यांच्या शेतीसंबंधित खर्च आणि अडचणी कमी करणे हा या योजनेचा मुख्य हेतू आहे. नमो शेतकरी योजना ही महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली एक अत्यंत उपयुक्त योजना आहे. शेतकरी बांधवांना आर्थिक मदत देण्याच्या उद्देशाने ही योजना राबवली जाते. विशेषतः छोटे व मध्यम शेतकरी यांना त्यांच्या शेतीसंबंधित गरजा भागवण्यासाठी आर्थिक सहाय्य करण्यासाठी ही योजना चालवली जाते.
📝 महत्वाचे मुद्दे
योजना | नमो शेतकरी योजना |
हफ्ता क्रमांक | ७वा |
लाभार्थी शेतकरी | ९१ लाख ६५ हजार १५६ |
प्रति शेतकरी रक्कम | २,००० रुपये |
एकूण निधी | १८९२ कोटी ६१ लाख रुपये |
✅ तुमचा हफ्ता जमा नसेल झाला तर असे तपासा
- सर्वप्रथम तुम्हाला NSMNY या योजनेच्या अधिकृत वेबसाइट वर भेट द्यावी लागेल.
- तेथे ‘Beneficiary Status’ (लाभार्थी स्थिती) हा पर्याय निवडावा.
- लॉगिन करण्यासाठी तुम्हाला ३ पर्याय उपलब्ध होईल.
- नोंदणी क्रमांक
- आधार क्रमांक
- आधारशी संलग्न मोबाईल क्रमांक
- तुम्ही निवडलेल्या पर्यायानुसार क्रमांक दर्ज करा आणि कॅप्टचा कोड टाका.
- त्यानंतर ‘Get Aadhaar OTP’ हा पर्याय निवडून तुमच्या मोबाइलला वर आलेला OTP (वन-टाइम पासवर्ड) टाका आणि वेरिफिकेशन प्रक्रिया पूर्ण करा.
हि सर्व प्रक्रिया झाल्या नंतर तुम्हाला तुमच्या आता पर्यंतच्या हफ्त्याची माहिती व वयक्तिक माहिती येथे दिसेल. आता पर्यंत कोणता हफ्ता कोणत्या ताऱखील मिळाला सर्व माहिती उपलब्ध होणार.
मी नितिकेश, मागील 4 वर्षांपासून महाराष्ट्रातील विविध शासकीय माहिती, सरकारी नौकरी माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम करतोय. marathisathi.in या वेबसाईटवर तुम्हाला सर्व योजना एका ठिकाणी, अगदी सोप्या भाषेत समजून घेता येतील, कारण तुमचा हक्काचा लाभ मिळवायला माहिती असणं गरजेचं आहे!