Pik Vima Vatap: राज्यतील पावसाचा हाहाकार ज्यामुळे सर्व शेतकरी बांधव हतबल झालेले आहेत. त्यात काही शेतकर्त्यांनी पीक विमा 2025 काढला तर काहींनी काढलाच नाही. त्यासाठी सुद्धा सरकारने स्वतःच सर्वे स्वतःच्या मोबाईल वर करण्याच्या सूचना सुद्धा दिलेल्या आहे.
ज्या शेतकऱ्यांनी पीकविमा आधी काढला होता त्यांना तर ते खात्यामध्ये 2024-25 चा जमा झाला, परंतु त्यामध्ये सुद्धा काही शेतकऱ्यांना जमा होण्यास अडचणी येत होत्या त्याचे निवारण करण्यासाठी शासनाने हेल्पलाईन सुरु केली तेथे तक्रार केल्यानंतर शेवटी थकीत शेतकर्यांचा पीक विमा सुद्धा खात्यामध्ये जमा होणेस सुरुवात झाली असा. असं अधिकृत जीआरच शासनाने कृषी विभागाअंतर्गत काढला आहे. तुमचा सुद्धा अजून पीक विमा जमा झाला नाही तर त्यासाठी काय प्रक्रिया आहे, कोणाला जमा होणार आहे याची सविस्तर माहिती आपण या आर्टिकल मध्ये विस्तारपूर्वक घेणार आहोत.
Pik Vima Vatap करता कॅबीनेटची मजुरी
मित्रांनो, बऱ्याच दिवसापासून पीक विमाचा वाटपाचा प्रश्न रखडलेला होता. शासनाकडून पीक विमा वाटपासाठी आर्थिक रक्कम उपलब्ध झाली नसल्यचे कारणे बऱ्याचदा आपण एकत होतो. शेवटी आता शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आणि पीक विमा कंपन्यांच्या मागणीला यश मिळाले आहे. काल दिनांक 22 सप्टेंबर 2025 मध्ये शासनाने कॅबिनेट मध्ये निर्णय घेऊन Pik Vima Vatap करण्यासाठी मंजुरी दिलेली आहे.
या शेतकऱ्यांच्या खात्यात होणार Pik Vima Vatap
मित्रांनो आंबिया बहार 2024-25 या वार्षिक कालावधीत ज्या शेतकऱ्यांच्या पिकाला पावसाचा मोठा झटका बसला आहे त्यांचा हे 2024-25 चा पीक विमा वाटप केला जाणार आहे. ज्यामध्ये संत्रा, मोसंबी, डाळिंब, चिकू, पेरू, निंबू, सीताफळ आणि द्राक्ष या पिकांची नुकसान भरपाई म्हणून राज्यातील 26 जिल्ह्यात पीक विमा वाटप प्रक्रियाला आजपासून सुरुवात करण्यात आलेली आहे. या पिकांच्या संपूर्ण नुकसान भरपाईकरता राज्यशासनाच्या एक हिंसा म्हणून 374 कोटी 50 लाख 76 हजार रुपये एव्हडं वाटप होणं अपेक्शित होत त्यापैकी पहिले 159,18,16,283 एव्हडी एकूण रक्कम वितरित करण्यात आलेली होती. त्यानंतरचे अनेक वितरित रकमेचे हिस्से बाकी असल्यामुळे सरकार आता 203,74,18,555 एव्हडी रकम शासनाकडून विमा कंपन्यांना देण्यात आलेली आहे.
निष्कर्ष
शेतकऱ्यांसाठी अतिशय मोठी अशी खुशखबरच आपण या आर्टिकल मध्ये बघितली आहे. राज्यतील शेतकऱ्याची अतिवृष्टीमुळे झालेली दुर्दशा तुम्ही सोशलमिडीया आणि प्रसारमाध्यमांमध्ये बघितलीच असेल. हा पीक विमा वाटपाला मंजुरी मिळाल्यामुळे लाभार्थी शेतकऱ्यांना मोठी आर्थिक मदत मिळणार आहे.
नमस्कार,
माझे नाव आकाश भगत आहे, मी एक ब्लॉगिंग क्षेत्रामध्ये मागील 4 वर्षांपासून कार्यरत आहे. मी 2023 पासून योजना या टॉपिक वरती ब्लॉग लिहत आहो. त्यामुळे माझ्याकडे जवळपास 2 वर्षाचा योजना, नौकरी आणि इतर शासकीय माहितीच्या टॉपिक चा अनुभव आहे. तसेच मी सध्या marathisathi.in या साईट च्या माध्यमातून सर्व माहिती सोप्या आणि खऱ्या स्वरूपाची देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहे.