PM Awas Yojana Gramin Survey 2025: केंद्र सरकारने देशातील प्रत्येक कुटुंबाला पक्के घर मिळावे यासाठी PM Awas Yojana Gramin Survey सुरु केला आहे. प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत सर्व लाभार्थी पात्र कुटुंबाना घर बांधण्यासाठी या योजनेतून आर्थिक आर्थिक मदत दिली जाणार आहे.
PM Awas Yojana Gramin Survey का केला जातो? (थोडक्यात माहिती)
प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण सर्वे केला जातो कारण देशातील सर्व लाभार्थी पात्र गरीब व गरजू कुटुंबाना स्वतःचे पक्के घर मिळावे. यामध्ये झोपडीत, कच्च्या किंवा तुटक्या घरात राहणाऱ्या कुटुंबांची ओळख पटवून त्यांची माहिती गोळा केली जाते. तसेच बेघर लोकांची यादी तयार करून ग्रामीण भागातील गरीब कुटुंबांना प्राधान्य दिले जाते. या सर्वेच्या मदतीने फसवणूक आणि भ्रष्टाचार रोखून खऱ्या पात्रांना घर बांधण्यासाठीची सरकारी मदत मिळवून देणे हे सरकारचे उद्दिष्ट आहे.
योजनेचे फायदे
या योजनेत लाभार्थी पात्र असणाऱ्या लाभार्थ्यांना पक्के घर बांधण्यासाठी ₹1.20 ते ₹1.30 लाख पर्यंतची आर्थिक मदत दिली जाते. महिलांच्या सशक्तीकरणासाठी घराचे नाव पती-पत्नी दोघांच्या नावावर नोंदवले जाते. योजनेचा स्वच्छ भारत अभियानाशीही संबंध असून शौचालय बांधण्यासाठी मदत मिळते. घर बांधकामासाठी लागणाऱ्या श्रमिकांना मनरेगा अंतर्गत मजुरी दिली जाते. तसेच संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक ठेवण्यासाठी सर्व रक्कम थेट DBT पद्धतीने लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते.
आर्थिक मदत
क्षेत्र | आर्थिक मदत | अतिरिक्त मदत |
---|---|---|
साधारण क्षेत्र | ₹1.20 लाख | शौचालय व इतर सुविधा |
डोंगराळ/कठीण क्षेत्र | ₹1.30 लाख | शौचालय व इतर सुविधा |
पात्रता (Eligibility)
- अर्जदार भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे तसेच ग्रामीण भागात राहत असावा.
- कुटुंब कच्च्या घरात, झोपडीत किंवा अस्थायी घरात राहत असावे.
- कुटुंबाची वार्षिक उत्पन्न मर्यादा ₹3 लाखांपेक्षा कमी असावी.
- कुटुंबाकडे पक्के घर, चारचाकी वाहन किंवा मोठी मालमत्ता नसावी.
- अर्जदाराचे नाव SECC 2011 च्या यादीत किंवा सध्याच्या ग्रामीण सर्वे लिस्टमध्ये असणे आवश्यक आहे.
आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- राशन कार्ड
- उत्पन्न प्रमाणपत्र
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- बँक पासबुक प्रत
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ग्रामीण सर्वे नोंदणी आयडी (असल्यास)
ग्रामीण सर्वेची प्रक्रिया
- ग्रामपंचायत स्तरावर सर्वे टीम प्रत्यक्ष भेट देऊन माहिती गोळा करते.
- कुटुंबाची आर्थिक व सामाजिक स्थितीची तपासणी केली जाते.
- सर्वे डेटा ऑनलाइन पोर्टलवर अपलोड केला जातो.
- पात्र कुटुंबांची अंतिम यादी तयार केली जाते.
अर्ज प्रक्रिया (ऑनलाईन पद्धत)
- अधिकृत वेबसाइट pmayg.nic.in वर जा.
- “Stakeholder” मध्ये जाऊन “Data Entry” वर क्लिक करा.
- यूजर आयडी आणि पासवर्डने लॉगिन करा.
- “New Registration” निवडा.
- आधार नंबर टाकून OTP द्वारे व्हेरिफाय करा.
- कुटुंबाची माहिती भरा जसे नाव, पत्ता, उत्पन्न, बँक खाते इ.
- आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
- सबमिट करून अर्जाची पावती सुरक्षित ठेवा.
लाभार्थी यादी कशी पाहावी?
- pmayg.nic.in या वेबसाइटवर जा.
- “Beneficiary List” वर क्लिक करा.
- नोंदणी क्रमांक किंवा मोबाईल नंबर टाका.
- आपले नाव व अर्जाची स्थिती स्क्रीनवर दिसेल.
निष्कर्ष
PM Awas Yojana Gramin Survey 2025 हा ग्रामीण भागातील गरीब आणि बेघर कुटुंबांसाठी पक्के घर मिळवण्याची मोठी संधी आहे. जर तुम्ही ग्रामीण भागात राहता आणि तुमच्याकडे अजूनही पक्के घर नाही, तर लवकरात लवकर या योजनेत नोंदणी करून सरकारी मदतीचा लाभ घ्या आणि स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण करा.
मी नितिकेश, मागील 4 वर्षांपासून महाराष्ट्रातील विविध शासकीय माहिती, सरकारी नौकरी माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम करतोय. marathisathi.in या वेबसाईटवर तुम्हाला सर्व योजना एका ठिकाणी, अगदी सोप्या भाषेत समजून घेता येतील, कारण तुमचा हक्काचा लाभ मिळवायला माहिती असणं गरजेचं आहे!