PM Shram Yogi Yojana 2025: भारतात अनेको कामगार हे असंघटित स्वरूपात काम करत असतात. मोठे शहर वगळता कामगारांच्या कुठल्याही संघटना गावात, खेळात आणि इतर जिल्ह्यात आपल्याला बघायला मिळत नाही. त्यामुळे त्यांच्या हक्काची लढ़ाई लढणारे कोणीही राहत नाही. म्हणून केंद्र सरकारने अशा कामगारांना PM Shram Yogi Yojana सुरु करून त्यांना म्हातारपणी पेन्शन सुविधा देण्याचा निर्धार केलेला आहे.
PM Shram Yogi Yojana 2025 काय आहे?
असंघटित कामगारांचा विचार करून त्यांच्या वृद्धपकाळात पेंन्शन मिळायची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारने हि योजना सुरु केलेली आहे. हि योजना देशभर 2019 पासून राबवण्यात येत आहे. ज्यामुळे राज्यातील कामगार बांधवांचे भविष्य सुरक्षित होणार आहे. या योजनेचा लाभ स्ट्रीट व्हेंडर, ड्राइवर, रिक्षाचालक आणि कृषी श्रमिक सारख्या कामगारांना दिला जाणार आहे.
योजनेचे उद्देश
ज्याप्रमाणे जवाणीमध्ये कामगार स्वतःच्या कमाईवर जीवन जगतात त्याच प्रमाणे म्हातारपणी सुद्धा त्यांना आत्मनिर्भयार्पणे जीवन जगण्यासाठी सक्षम बाणाने हाच शासनाचा उद्देश आहे.
योजनेसाठी कोण असेल पात्र?
स्ट्रीट व्हेंडर, ड्राइवर, रिक्षाचालक आणि कृषी श्रमिक कामगार ज्यांचे वय हे 18-40 दरम्यान असणे आवश्यक आहे. तसेच अर्जदाराचे वार्षिक उत्पादन हे 15 हजारापेक्षा जास्त नसावे. कामगारांचे EPFO,ESIC किंवा NPS खाते नसावे. योजनेचा आभा घेण्यासाठी अर्जदाराचे आधार बँकेसोबत लिंक असणे बंधनकारक आहे.
पेन्शन आणि योगदान
कामगारच वय | दर महिन्याचे कामगार योगदान | दर महिन्याचे शासनाचे योगदान |
---|---|---|
18 वर्ष | 55 रुपये | 55 रुपये |
30 वर्ष | 100 रुपये | 100 रुपये |
40 वर्ष | 200 रुपये | 200 रुपये |
योजनेचे फायदे
जेवढी रकम तुम्ही विवश करणार आहेत तेवढीच रकम शासन सुद्धा तुमच्या खात्यात जमा करेल. जेव्हा लाभार्थी 60 वर्षाचा होईल, त्यानंतर जिवंत असे पर्यंत त्याला दार महिन्याला 3,000 रुपये पेन्शन दिली जाणार आहे. गुंतवणुकीसाठी कुठलेही शासन आहे.
असा करा योजनेसाठी अर्ज
तुम्हाला तुमच्या परिसरातील सेतू किंवा CSC सेंटर ला भेट द्यावी लागेल. तिथे जाऊन तुमचे आधार कार्ड, बँकेचे पासबुक आणि मोबाईल नंबर देऊन नियमानुसर प्रीमियमची रक्कम भरून अर्ज भरावा लागेल. रजिष्ट्रेशन झाल्यानंतर तुम्हला तुमचे पेन्शन कार्ड देण्यात येईल.
निष्कर्ष
ग्रामीण भागातील आणि छोट्या शहरातील कामगारांना नेहमी त्यांच्या भविष्याची चिंता सतावत असते. आता मात्र करण्याची अजिबात गरज नाही, कारण शासनच आता या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला पेन्शन देणार आहे. हणून जास्ती जास्त कामगारांपर्यंत हि माहिती नक्की शेयर करा, धन्यवाद.
नमस्कार,
माझे नाव आकाश भगत आहे, मी एक ब्लॉगिंग क्षेत्रामध्ये मागील 4 वर्षांपासून कार्यरत आहे. मी 2023 पासून योजना या टॉपिक वरती ब्लॉग लिहतोय. त्यामुळे माझ्याकडे जवळपास 2 वर्षाचा योजना, नौकरी आणि इतर शासकीय माहितीच्या टॉपिक चा अनुभव आहे. तसेच मी सध्या marathisathi.in या साईट च्या माध्यमातून सर्व माहिती सोप्या आणि खऱ्या स्वरूपाची देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहे.