PM SME Credit Card म्हणजेच Small and Medium Enterprises, हे एक सरकारी क्रेडिट कार्ड असणार आहे. याचा फायदा राज्यातील छोटे उद्योजकांना होणार आहे. भारतात हजारो लहान व्यवसाय चालतात जे देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा आधार देतात. पण अशा व्यवसायांना रोजच्या कामासाठी किंवा व्यवसाय वाढवण्यासाठी नेहमीच आर्थिक मदतीची गरज असते. यासाठी अनेक बँका आणि वित्तीय संस्था SME क्रेडिट कार्डची सुविधा देतात.
PM SME Credit Card म्हणजे काय?
SME क्रेडिट कार्ड हे एक प्रकारचे क्रेडिट कार्ड आहे जे खास लहान उद्योगधंद्यांसाठी बनवलेले असते. या कार्डच्या माध्यमातून मिळणारे क्रेडिट चा वापर तुम्ही तुमच्या व्यवसायासाठी करू शकता. हे कार्ड तुम्हाला रोजच्या खर्चासाठी, माल खरेदीसाठी, मशीनरी खरेदीसाठी, प्रवासासाठी, आणि इतर व्यवसायाशी संबंधित खर्चासाठी वापरता येते.
Aple Sarkar: आपले सरकार या पोर्टलच्या 200 सेवा मिळणार What’s App वर, येणार उपडेट व्हर्जन
SME क्रेडिट कार्डची मुख्य वैशिष्ट्ये
SME क्रेडिट कार्ड हे लहान व मध्यम उद्योगांसाठी खूप उपयोगी आहे. हे कार्ड वापरून व्यवसायाच्या दैनंदिन खर्चासाठी पैसे सहज मिळू शकतात. उदाहरणार्थ, उपकरणे खरेदी करणे, कच्चा माल घेणे किंवा इतर व्यवसायाशी संबंधित व्यवहार करणे आता सोपे झाले आहे.
याशिवाय, या क्रेडिट कार्डमुळे तुमच्या व्यवसायाच्या खर्चावर लक्ष ठेवणं सहज शक्य होतं. तुम्ही कोणत्या कामासाठी किती पैसे खर्च केले हे स्पष्टपणे पाहू शकता. त्यामुळे व्यवसायाचे आर्थिक नियोजन करणं सोपं आणि व्यवस्थित होतं. तसेच, सर्व व्यवहारांची पारदर्शक नोंद राहते, ज्यामुळे भविष्यात कोणतेही गडबड होण्याची शक्यता कमी होते.
PM SME Credit Card कोण घेऊ शकते?
- किराणा दुकानधारक
- लहान मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स
- सर्व्हिस प्रोव्हायडर्स (जसे की सैलून, रिपेयर शॉप्स)
- ट्रेडर्स आणि व्यापारी
SME क्रेडिट कार्डचे फायदे
- सुलभ कर्ज उपलब्धता – व्यवसायासाठी तात्काळ आणि सुलभ कर्ज मिळते.
- लवचिक परतफेड योजना – तुमच्या गरजेनुसार EMI किंवा फक्त मिनिमम पेमेंट पर्याय निवडता येतो.
- व्यवसाय वाढीस मदत – नवीन उपकरणे खरेदी, स्टाफ वाढवणे, मार्केटिंगसाठी खर्च करता येतो.
- ऑनलाइन व ऑफलाइन व्यवहारासाठी वापरता येते – कुठेही तुम्ही सहज वापरू शकता.
- विविध ऑफर्स आणि डिस्काउंट्स – बँकांद्वारे विविध ऑफर्स मिळतात जसे की फ्यूल कार्डसह सवलत, ट्रॅव्हल बेंजिट्स इत्यादी.
SME क्रेडिट कार्ड कसे मिळवावे?
- बँकेत अर्ज करा – तुमच्या व्यवसायाचे दस्तऐवज आणि PAN कार्ड, आधार कार्ड, व्यवसायाची माहिती बँकेत सादर करा.
- क्रेडिट चेकिंग – बँक तुमच्या व्यवसायाची आर्थिक स्थिती पाहून निर्णय घेते.
- कार्ड मंजूर झाल्यानंतर वितरण – बँक तुम्हाला SME क्रेडिट कार्ड वितरीत करते.
SME क्रेडिट कार्ड कोणकोणत्या बँकांकडून मिळते?
भारतामध्ये अनेक प्रमुख बँका SME (लहान-मध्यम उद्योग) साठी खास क्रेडिट कार्डची सुविधा देतात. या बँका तुमच्या व्यवसायाच्या गरजेनुसार आर्थिक मदत करण्यासाठी विविध प्रकारच्या ऑफर्ससह SME क्रेडिट कार्ड उपलब्ध करून देतात. मुख्य बँका ज्या SME क्रेडिट कार्ड ऑफर करतात त्या खालीलप्रमाणे आहेत:
SBI (State Bank of India), HDFC Bank, Axis Bank, Kotak Mahindra Bank, Standard Chartered Bank, IndusInd Bank
मी नितिकेश, मागील 4 वर्षांपासून महाराष्ट्रातील विविध शासकीय माहिती, सरकारी नौकरी माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम करतोय. marathisathi.in या वेबसाईटवर तुम्हाला सर्व योजना एका ठिकाणी, अगदी सोप्या भाषेत समजून घेता येतील, कारण तुमचा हक्काचा लाभ मिळवायला माहिती असणं गरजेचं आहे!