Pradhanmantri Jan Arogya Yojana: 5 लाखापर्यंत होणार मोफत उपचार। PM-JAY साठी असा करा अर्ज.

Pradhanmantri Jan Arogya Yojana
WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Pradhanmantri Jan Arogya Yojana: मित्रांनो, आपले आरोग्य चांगले असले तर आपण सर्व काही मिळवू शकू, परंतु जर आरोग्याचं चांगले नसते तर कितीही संपत्ती असली तरी ती आपल्या काहीच कामाची नाही. म्हणून जुने लोक, चांगले आरोग्य हीच खरी संपत्ती असे म्हणायचे. जे काही एकदम बरोबर आहे. परंतु कधी कधी काही अशा बिमाऱ्या होतात कि ज्या आपल्या हाती नसतात आणि गरीब परिवाराचे मात्र खूप जास्त हाल होतात. कारण पैशाच्या अभावी त्यांना योग्य उपचार मिळू शकत नाही आणि कधी कधी तर मृत्यू सुद्धा होता. त्यामुळे स्वतः केंद्र सरकार या नागरिकांसाठी धावून आले आहे आणि Pradhanmantri Jan Arogya Yojana सुरु केली आहे.

Also Read: PM Awas Yojana List: तुमच्या गावानुसार बघा प्रधानमंत्री आवास योजनेची पात्रता यादी

Pradhanmantri Jan Arogya Yojana काय आहे?

मित्रांनो, प्रधानमंत्री जण आरोग्य योजना (PM-JAY) हि केंद्र सरकार मार्फ़त देशातील गरजू आणि दारिद्र्य रेषेखालील नागरिकांना मोफत उपचार सेवा देण्यासाठी सुरु केली गेलेली आहे. योजनेच्या माध्यमातून पात्र लाभार्त्याला आणि त्याच्या परिवाराला 5 लाखाचे विमा संरक्षण मिळते तसेच 5 लाखांपर्यंतचा मोफत उपचार हा सरकारी आणि काही खासगी रुग्णालयामध्ये सुद्धा दिला जाणार आहे. हि योजना केंद्राच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या माध्यमातून देशभर राबविली जाते. दरवर्षी देशातील कोट्यवधी नागरिक योजनेचा लाभ घेऊन उपचार करतात आणि चांगले जीवन जगात. मित्रांनो आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार किमान 1500+ गंभीर आजारांवर उपचार एकदां फ्री दिला जाणार आहे.

योजनेचा उद्देश

देशातील गरीब परिवाराला मोफत आणि योग्य उपचार मिळावा जेणेकरून मिळालेले आयुष्य चांगल्या पद्धतीने जगता येईल. यासाठी शासनाने हि मोफत उपचार योजना सुरु केली आहे.

योजनेचे फायदे

देशातील प्रत्येक राज्यातील, प्रत्येक गरजू कुटुंबातील, प्रत्येक सदस्याला 5 लंकापर्यंतचा उपचार मोफत मिळतो. रुग्णालयात जेव्हापासून पेशंट ऍडमिट होतो तेव्हपासूनच सर्व खरंच शासन उचलणार आहे. यासाठी एक रुपयाही रुग्णालयात भरण्याची गरज नसेल, त्यामुळे याला कॅशलेस आणि पेपरलेस उपचार असेही म्हंटले जाते. योजनेच्या माध्यमातून प्रसूती, शस्त्रक्रिया आणि त्यावरील सर्व औषधे सुद्धा मोफत मिळणार आहेत.

योजनेचा लाभ कोणाला मिळेल?

SECC च्या अधिकृत डेटानुसार देशातील गरजू आणि गरीब कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. राशन कार्ड धारक सर्वच कुटुंबे या योजनेसाठी पात्र असणार आहे. तसेच शहराती काही विशिष्ट व्यावसायिक कुटुंबांनाच हि योजना लागू होईल याची शहरी भागातील नागरिकांनी नोंद घ्यावी.

Also Read: PM Wi-Fi योजना 2025: मोफत इंटरनेटसाठी सरकारची मोठी संधी। PM Wi-Fi Yojana 2025

कोणती कागदपत्रे लागतील?

  • आधार कार्ड
  • राशन कार्ड
  • मोबाईल नंबर
  • ओळखपत्र

लाभ घेण्यासाठी अर्ज कसा करावा?

परिवारात एखादा व्यक्ती कोणत्या आजाराने त्रस्त असेल किंवा नसेल, तरी सुद्धा तुम्हाला pmjay.gov.in या अधिकृत साईट वरती भेट द्यायची आहे. तिथे तुम्हाला Am I Eligible असा एक पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करून घ्या आणि तुमचा मोबाईल नंबर किंवा राशन कार्ड नंबर टाकून तुम्ही निकषांमध्ये बसता का ते तपास करा. जर तुम्ही पात्र असाल तर तुम्हला तिथे तुमची आणि परिवाराची माहिती टाकून Pradhanmantri Jan Arogya Yojana मार्फत “आयुष्मानकार्ड” काढून घ्या. ते कार्ड कुठल्याही दवदखान्यात दाखवले असता तुमचा मोफत उपचार केला जाईल.

निष्कर्ष

PM-JAY अर्थात प्रधानमंत्री जण आरोग्य योजना हि गरिबांसाठी देवाच्या वरदान सारखीच काम करत आहे. लाखो पेशंटला आयुष्मान कार्डच्या माध्यमातून उपचार देऊन त्यांना मृत्यूच्या तोंडातून बाहेर काढण्याचे कामही करण्यात आले आहे. आजकाल महागाईच्या जमान्यात खाजगी दवाखान्याची फीज किती आहे आपल्याला तर माहीतच आहे, म्हणून तेच सर्व उपचार सुद्धा या योजनेच्यामाध्यमातून देण्याचा शासनच हेतू स्पष्ट होतो.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *