Ropvatika Anudan Yojana Maharashtra सरकार या योजनेच्या माध्यमातून लाभार्थी पात्र शेतकऱ्यांना फळझाडे, भाजीपाला, फुलझाडे तसेच इतर लागवडीसाठी लागणाऱ्या रोपवाटिका उभारण्यासाठी ५०% अनुदान देते. हि योजना राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत लाभदायक आणि उपयुक्त ठरते. या योजनेचा लाभ घेऊन शेतकरी मित्र स्वतःच्या जमिनीत दर्जेदार रोपे तयार करून कमी खर्चात शेती उत्पादन वाढवू शकतात.
चला तर जाणून घेऊ शेतकरी बांधवाना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका अनुदान योजना महाराष्ट्र या योजनेतून काय लाभ मिळणार आहे आणि योजनेसाठी पात्रता काय राहणार आहे. तसेच पात्र असलेल्या शेजाऱ्यांनी अर्ज कुठे करायचा अशी सर्व माहिती आपण या लेखाच्या माध्यमातून जाणून घेऊ. तुम्ही शेतकरी असाल तर हा लेख पूर्ण वाचा तुम्हाला कामाची माहिती मिळेल.
Ropvatika Anudan Yojana म्हणजे काय?
महाराष्ट्र रोपवाटिका अनुदान योजना हि राज्यातील शेतकऱ्यांसाठी सुरु केलेली योजना आहे. महाराष्ट्र शासन शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी वेळोवेळी अनेक योजना राबवत असते. त्यामधीलच एक महत्त्वाची योजना आहे. शेतकऱ्यांना हवी असलेली झाडे खरेदी करतात त्यामध्ये त्यांचा जास्त खर्च होतो. परंतु या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना स्वतःची लहानमोठी रोपवाटिका उभारता येते.
Ropvatika Anudan Yojana या योजनेच्या लाभार्थी पात्र शेतकऱ्यांना शासनाकडून ५०% अनुदान दिले जाते. या योजनेचा फायदा घेतल्यास शेतकऱ्यांना उच्च दर्जाची रोपे, कमी खर्चात आणि वेळेवर उपलब्ध होतात.
रोपवाटिका अनुदान योजनेचे उद्दिष्ट
Ropvatika Anudan Yojana शेतकऱ्यांसाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहे. यामध्ये शेतकऱ्यांना दर्जेदार आणि रोगमुक्त रोपे सहज उपलब्ध करून दिली जातात, ज्यामुळे शेतकऱ्यांना महागडी किंवा परदेशी वाणांची रोपे विकत घ्यावी लागत नाहीत. यामुळे शेतकऱ्यांचा खर्च मोठ्या प्रमाणात कमी होतो.
या योजनेमुळे शेतकरी बांधवाना उत्पन्नाचे नवे स्रोत उपलब्ध होतात. फळबाग, भाजीपाला आणि फुलशेतीला प्रोत्साहन मिळून शेतीत विविधता वाढते. याशिवाय, स्वतःची रोपवाटिका असल्यामुळे शेतकऱ्यांना शेतीत आत्मनिर्भरता निर्माण होते आणि त्यांचा नफाही वाढतो.
योजनेसाठी कोण पात्र आहेत?
योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार हा महाराष्ट्रातील स्थायी रहिवासी असणे गरजेचे आहे. तसेच अर्जदाराकडे स्वतःची किम ०.४० हेक्टर जमीन असावी आणि रोपवाटिकेसाठी कायस्वरूपी पाण्याची सोया असणे आवश्यक आहे. महिला शेतकरी, अनुसूचित जाती/जमाती तसेच लघु व सीमान्त शेतकऱ्यांना या योजनेत प्राधान्य दिले जातील.
Ropvatika Anudan Yojana अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- जमीन सातबारा उतारा (7/12)
- शेतीचा दाखला
- बँक पासबुकची प्रत
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- इतर आवश्यक कागदपत्रे (शासन आदेशानुसार)
योजनेचा लाभ
या योजनेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे शेतकऱ्यांना स्वतःची रोपवाटिका उभारता येते. त्यामुळे त्यांना उच्च दर्जाचे आणि रोगमुक्त रोपे सहज उपलब्ध होतात. याचबरोबर भाजीपाला, फळबाग आणि फुलशेतीमधून चांगले उत्पन्न मिळते. बाहेरून बियाणे किंवा रोपे खरेदी करण्याचा खर्च कमी होतो त्यामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पादनात वाढ होते. या प्रक्रियेमुळे इतरांना काम मिळून ग्रामीण भागात रोजगार निर्मितीलाही चालना मिळते.
Tokan Yantra Yojana Maharashtra: शेतकऱ्यांना मिळणार टोकन यंत्र खरेदीवर 10,000 रुपयांचे अनुदान
अर्ज कसा करावा?
या योजनेची अर्ज प्रक्रिया हि पूर्णपणे ऑफलाईन पद्धतींनी असल्यामुळे शेतकऱ्यांना जवळच्या कृषी विभागाच्या कार्यालयात संपर्क साधावा लागेल. तेथे तुम्हाला Ropvatika Anudan Yojana Form मिळेल. या फॉर्म मध्ये संपूर्ण माहिती नीट भरावी आणि सोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडावी. त्यानंतर संबंधित कार्यालयात फॉर्म सादर करावा. अर्जाची पडताळणी झाल्यानंतर पात्र शेतकऱ्यांना शासनाकडून अनुदानाची रक्कम मंजूर केली जाते.
रोपवाटिका अनुदान योजना अंतर्गत कोणती रोपे करावी?
फळझाडांची रोपे
या झाडांमुळे दीर्घकालीन उत्पन्न मिळते
- आंबा
- पेरू
- लिंबू
- संत्री
- डाळिंब
- सीताफळ
- चिकू
भाजीपाल्याची रोपे
भाजीपाला लागवड जलद उत्पन्न देते आणि बाजारात कायम मागणी असते.
- टोमॅटो
- वांगी
- मिरची
- भोपळा
- कारले
- भेंडी
फुलझाडांची रोपे
फुलशेतीमुळे सण-उत्सवाच्या काळात चांगला नफा मिळतो.
- झेंडू
- गुलाब
- जास्वंद
- शेवंती
इतर उपयोगी झाडे
- शेतीसाठी सावली देणारी झाडे (सुबाभूळ, नेम, कडुलिंब)
- औषधी वनस्पती (तुळस, आल्याची रोपे, अश्वगंधा)
अनुदान किती मिळणार?
Ropvatika Anudan Yojana अंतर्गत शेतकऱ्यांना प्रकल्प खर्चाच्या ५० टक्के अनुदान मिळते. कमाल अनुदानाची मर्यादा ₹२,३०,०००/- आहे. हे अनुदान थेट शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यावर जमा केले जाते.
रोपवाटिका अनुदान योजना – अनुदानाचे तपशील
घटक | अनुदानाची टक्केवारी | कमाल रक्कम (₹) |
---|---|---|
शेडनेट (Shade Net) | ५०% | १,९०,०००/- |
पॉली टनेल (Poly Tunnel) | ५०% | ३०,०००/- |
पॉवर नॅपसॅक स्प्रेअर (१ नग) | ५०% | ३,८००/- |
प्लास्टिक क्रेट्स (६२ नग) | ५०% | ३,८००/- |
एकूण कमाल अनुदान | — | २,३०,०००/- |
अनुदान देण्याची पद्धत
टप्पा | तपासणी अधिकारी | टक्केवारी | कमाल रक्कम (₹) |
---|---|---|---|
प्रथम टप्पा (प्रकल्प उभारणीनंतर) | उपविभागीय कृषी अधिकारी | ६०% | १,३८,०००/- |
द्वितीय टप्पा (रोपांची विक्री/उचल झाल्यानंतर) | मंडळ कृषी अधिकारी | ४०% | ९२,०००/- |
निष्कर्ष
Ropvatika Anudan Yojana या योजनेचे पूर्ण नाव पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटीका योजना असे आहे. हि योजना शेतकऱ्यांसाठी चांगली संधी आहे. या योजनेतून कमी खर्चात चांगला नफा करून देणारी योजना आहे.
FAQ
1) अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांना कशी मिळते?
अनुदानाची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यावर जमा केली जाते.
2) अनुदान मिळण्याची प्रक्रिया कशी आहे?
प्रकल्प उभारणीनंतर प्रथम तपासणीनंतर ६०% अनुदान (कमाल ₹१.३८ लाख) मिळते. उर्वरित ४०% अनुदान (कमाल ₹०.९२ लाख) रोपांची विक्री/उचल झाल्यावर व दुसऱ्या तपासणीनंतर मिळते.
मी नितिकेश, मागील 4 वर्षांपासून महाराष्ट्रातील विविध शासकीय माहिती, सरकारी नौकरी माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम करतोय. marathisathi.in या वेबसाईटवर तुम्हाला सर्व योजना एका ठिकाणी, अगदी सोप्या भाषेत समजून घेता येतील, कारण तुमचा हक्काचा लाभ मिळवायला माहिती असणं गरजेचं आहे!