Sakhi One Stop Centre Yojana Maharashtra 2025 हि योजना केंद्र सरकारकडून सुरु करण्यात आली असून महाराष्ट्रात सुद्धा राबवली जात आहे. महिला व बालविकास विभाग द्वारे हि योजना चालवण्यात येत आहे. सखी वन स्टॉप सेंटर योजना चा मुख्य उद्देश आहे हिंसाचार, अत्याचार, छळ किंवा कोणत्याही संकटात सापडलेल्या महिलांना त्वरित सर्व प्रकार ची मदत एकाच ठिकाणी उपलब्ध करणे आहे.
Sakhi One Stop Centre Yojana Maharashtra राज्यातील महिलांसाठी खूप लाभदायक योजना आहे. या योजनेतून पोलीस मदत, वैद्यकीय सेवा, कायदेशीर सल्ला, मानसोपचार सल्ला आणि तात्पुरते निवास अशा सर्व सेवा एका छताखाली उपलब्ध करून देतात. महिलांना कशा प्रकारे या योजनेचा लाभ मिळणार आहे आणि योजनेचा सविस्तर माहिती या लेखमध्ये आम्ही तुमच्यासाठी उपलब्ध केली आहे.
Mofat Gas Cylinder Yojana 2025: आता याच महिलांना मिळणार फ्री गॅस सिलेंडर
Sakhi One Stop Centre Yojana Maharashtra म्हणजे काय?
सखी वन स्टॉप सेंटर (One Stop Centre – OSC) ही एक अशी जागा आहे जिथे कोणत्याही हिंसाचाराचा बळी ठरलेल्या महिलांना तात्काळ आणि सर्व प्रकारची मदत एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिली जाते. महिलांचा सुरक्षासाठी सरकारने बनवलेली एकमेक योजना आहे.
या योजनेची माहिती राज्यातील सर्व महिलांपर्यंत पोहचणे आवश्यक आहे. आजकाल आपण बघतोच आहे राज्यात किती महिलांवर अत्याचार होत आहे तसेच बऱ्याच महिलांना आपल्या पतीकडून सुद्धा हिंसाचाराचा सामना करावा लागतो. (NFHS-V, 2019-21) नुसार 87% महिला कोणतीच मदत घेत नाही. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन राज्य सरकारने Sakhi One Stop Centre Yojana Maharashtra सुरु करण्यात आली आहे.
सखी वन स्टॉप सेंटर योजनेचा उद्देश
राज्यातील गरजू महिलांसाठी हि योजना खूप लाभदायक ठरणार आहे. आतापर्यन्त या योजनेतून हजारो महिलांना मदत करण्यात आली आहे. सखी वन स्टॉप सेंटर योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे महिलांना मानसिक, वैद्यकीय, कायदेशीर व सामाजिक आधार देणे तसेच हिंसाचारग्रस्त महिलांना सुरक्षित वातावरणात तात्काळ मदत करणे आहे. पीडित महिलांना समाजात पुन्हा आत्मसन्मानाने जगता येईल यासाठी न्याय मिळवून देणे हा योजनेचा मुख्य हेतू आहे.
सखी सेंटरमध्ये महिलांना मिळणाऱ्या सेवा
- पोलीस मदत – FIR लिहून घेणे, गुन्हा दाखल करणे आणि पोलिसांशी संपर्क साधणे
- वैद्यकीय मदत – अत्याचार, मारहाण, जळाल्याचे प्रकार इत्यादींमध्ये तातडीने डॉक्टरांची मदत मिळते.
- कायदेशीर सल्ला – महिलेला न्याय मिळवण्यासाठी वकिलांमार्फत सल्ला व मदत करणे.
- 181 हेल्पलाईन सेवा – तात्काळ मदतीसाठी राज्यातील कोणतीही महिला 181 क्रमांकावर संपर्क करू शकतात.
- तात्पुरते निवासस्थान – सुरक्षिततेसाठी काही दिवस निवारा दिला जातो.
योजनेचा लाभ कोण घेऊ शकतो?
सखी वन स्टॉप सेंटर योजनेसाठी पात्रता उपलब्ध नाही. राज्यातील सर्व महिलांसाठी Sakhi One Stop Centre Yojana उपलब्ध आहे. कोणत्याही वयोगटातील महिला योजनेचा लाभ घेऊ शकतात. अनेक प्रकारचा अडचणीत किंवा हिंसाचार, अत्याचार झालेल्या महिलांना मदत केली जाते. कौटुंबिक हिंसाचाराचा बडी पडलेल्या महिला, लैंगिक अत्याचार, विनयभंग, छेडछाड, बलात्कार यांचे बळी, मानवी तस्करी किंवा जबरदस्तीच्या विवाहाचे बळी, मानसिक किंवा भावनिक छळ सहन करणाऱ्या महिला अडचणीत सापडलेल्या स्त्रिया, जसे की बेघर महिला, वंध्यत्वामुळे टाकलेल्या महिला अशा सर्व प्रकार चा महिलांना या योजनेतून मदत केली जाईल.
महाराष्ट्रातील सखी वन स्टॉप सेंटरची स्थिती
महाराष्ट्र एकूण 30 पेक्षा जास्त सखी वन स्टॉप सेंटर कार्यरथ आहे. खालीलप्रमाणे दिलेल्या जिल्यांमध्ये सखी केंद्रे कार्यरत आहेत.
- मुंबई
- पुणे
- नाशिक
- औरंगाबाद
- नागपूर
- सोलापूर
- कोल्हापूर
- अमरावती
- रत्नागिरी
- धुळे
सेवांचा लाभ घेण्यासाठी प्रक्रिया काय आहे?
थेट सखी सेन्टर मध्ये भेट देऊन मदत मिळवू शकता, कोणत्याही प्रकार चे पूर्वनियोजन न करता मदत मिळू शकते.
181 हेल्पलाईन नंबर वर कॉल करून तात्कळ गरज असल्यास पोलिस, डॉक्टर, समुपदेशक यांना बोलावता येते.
जिल्हा महिला व बाल विकास कार्यालयाशी संपर्क करून मदत घेऊ शकता.
योजनेची वैशिष्ट्ये
- 24×7 महिलांसाठी सेवा उपलब्ध आहे, केंद्र सातत्याने चालू असते
- सर्व सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध
- फक्त राज्यातील महिलांसाठी सेवा पूर्णतः मोफत आहे
- महिला अधिकारांबाबत जागरूकता
- तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली काम
निष्कर्ष
Sakhi One Stop Centre Yojana Maharashtra हि योजना सुरु करण्यासाठी राज्य सरकारची खरंच सर्वानी प्रशंसा करायला पाहिजे. अशा योजना महिलांसाठी खूप लाभदायक आहे. राज्यातील प्रत्येक महिलांना या योजनेची माहिती असणे आवश्यक आहे. गरज पडल्यास या योजनेचा लाभ न घाबरता घ्यावा, महिलांना तातडीने मदत केली जाईल.
टीप: अधिक माहितीसाठी तुम्ही https://wcd.nic.in या अधिकृत वेबसाइट किंवा महाराष्ट्र महिला व बाल विकास विभागाच्या अधिकृत वेबसाइटला जावून माहिती घेऊ शकता.
FAQ
1) सखी सेंटर राज्यात कुठे उपलब्ध आहेत?
सखी सेंटर राज्यातील जवळपास सर्व जिल्ह्यांमध्ये उपलब्ध आहेत. जसे की – मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर, सोलापूर, अमरावती इत्यादी.
2) तात्काळ मदतीसाठी संपर्क कसा करावा?
कोणतीही महिला 181 हेल्पलाईन नंबरवर कॉल करून सखी सेंटरशी थेट संपर्क करू शकते.
3) ही सेवा पूर्णपणे मोफत आहे का?
होय. सखी वन स्टॉप सेंटर योजना अंतर्गत सर्व सेवा महिलांसाठी पूर्णपणे मोफत आहेत.
मी नितिकेश, मागील 4 वर्षांपासून महाराष्ट्रातील विविध शासकीय माहिती, सरकारी नौकरी माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम करतोय. marathisathi.in या वेबसाईटवर तुम्हाला सर्व योजना एका ठिकाणी, अगदी सोप्या भाषेत समजून घेता येतील, कारण तुमचा हक्काचा लाभ मिळवायला माहिती असणं गरजेचं आहे!