Shaktipeeth Highway Maharashtra Yadi: शेतकरी बांधवांसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आली आहे. राज्यातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतातून हा महामार्ग जाणार असल्यामुळे राज्य सरकार त्या शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीची किंमत लाखो रुपये देणार आहे. त्याचप्रमाणे भरपाई नुकसान सुद्धा मिळणार आहे. शक्तीपीठ महामार्गामुळे अनेक शहर व गावे जोडली जाणार असल्यामुळे व्यवसायाला मोठी चालना मिळेल.
Shaktipeeth Highway Maharashtra Yadi
महाराष्ट्र हे धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेने समृद्ध राज्य आहे. येथे असंख्य देवस्थाने, मंदिरे आणि शक्तीपीठे आहेत. भाविकांसाठी दर्शनाचा सोयीस्कर मार्ग उपलब्ध व्हावा आणि पर्यटनाला चालना मिळावी यासाठी महाराष्ट्र सरकारने “शक्तीपीठ महामार्ग” बनवण्याची घोषणा केली आहे. राज्यातील प्रमुख शक्तीपीठांना एकमेकांशी महामार्गाद्वारे जोडले जाणार आहे.
शक्तीपीठ महामार्ग म्हणजे काय?
शक्तीपीठ महामार्ग महाराष्ट्र शासनाचा एक महत्वाचा प्रकल्प आहे. नागपूर पासून गोवा पर्यंत जाणारा हा महामार्ग आहे. या महामार्गाला शक्तीपीठ नाव देण्याचे कारण म्हणजे, महाराष्ट्रात अनेक देवीची मंदिरे शक्तीपीठ म्हणून प्रसिद्ध आहेत आणि ते या महामार्गाने जोडले जाणार आहे.
महामार्ग कोणत्या जिल्ह्यांमधून जाणार?
शक्तीपीठ महामार्ग (Nagpur–Goa Shaktipeeth Expressway) पावनार (Wardha) येथून सुरू होऊन पत्रादेवी (Sindhudurg) येथे संपणार आहे. हा महामार्ग महाराष्ट्रात १२ जिल्ह्यांतून जातो. नागरिकांच्या सुरक्षिततेचा विचार करून त्याचे रस्ते नियोजन करण्यात आले आहे.
- वर्धा
- यवतमाळ
- हिंगोली
- नांदेड
- परभणी
- बीड
- लातूर
- धाराशिव
- सोलापूर
- सांगली
- कोल्हापूर
- सिंधुदुर्ग
महाराष्ट्रातील प्रमुख शक्तीपीठांची यादी
महाराष्ट्रात अनेक देवीची मंदिरे शक्तीपीठ म्हणून प्रसिद्ध आहेत. खाली त्यातील काही महत्वाची स्थळे दिली आहेत जी या महामार्ग योजनेत समाविष्ट केली जात आहेत.
- तुळजापूर भवानी माता मंदिर (जि. उस्मानाबाद) – महाराष्ट्राचे कुलदैवत मानले जाणारे तुळजाभवानी मंदिर दरवर्षी लाखो भाविकांना आकर्षित करते.
- महूर गड रेनुका माता मंदिर (जि. नांदेड) – जगदंबेचे हे एक प्रमुख शक्तीपीठ असून संत एकनाथ महाराजांची आई येथे जन्माला आल्याचे मानले जाते.
- कोल्हापूर अंबाबाई मंदिर (महालक्ष्मी) – कोल्हापूरची महालक्ष्मी माता हे भारतातील ५१ शक्तीपीठांपैकी एक मानले जाते.
- सप्तश्रृंगी गड देवी मंदिर (जि. नाशिक) – सप्तशृंगी गडावरील देवी हे शक्तीचे मूर्त स्वरूप मानले जाते. नवरात्रीत येथे मोठी यात्रा भरते.
- अकोला येथील अकोटच्या यमाई देवी – स्थानिक स्तरावर प्रसिध्द असलेले हे मंदिर देखील धार्मिकदृष्ट्या महत्वाचे आहे.
- पंढरपूरची विठोबाची पत्नी रुक्मिणी देवी मंदिर – शक्तीपीठ महामार्गाचा एक महत्वाचा भाग म्हणून याचाही समावेश केला गेला आहे.
कधी सुरू होणार हा प्रकल्प?
- मुख्यमंत्रींच्या आदेशांनुसार भूसंपादन प्रक्रिया आधीच ऑगस्ट 2025 पर्यंत पूर्ण होईल.
- डिसेंबर 2025 पर्यंत जमिनीची हस्तांतरण प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता आहे.
- त्यानंतर 2026 पासून निविदा (Tendering) प्रक्रिया सुरू होईल आणि बांधकामाचे टप्पे काही भागात सुरू होऊ शकतात.
- जर सर्व प्रक्रिया सुरळीत पार पडल्या, तर 2028–2029 मध्ये टप्प्याटप्प्याने हा महामार्ग पूर्ण होऊन वाहतुकीसाठी उघडला जाऊ शकतो.
FAQ
1) हा महामार्ग कधी सुरू होणार आहे?
सरकारने ऑगस्ट 2025 मध्ये भूसंपादनाला मंजुरी दिली असून, 2026 पासून बांधकाम सुरू होण्याची शक्यता आहे. प्रकल्प पूर्ण होऊन प्रवासासाठी 2028–2029 पर्यंत उपलब्ध होईल असा अंदाज आहे.
2) या महामार्गाची एकूण लांबी किती आहे?
शक्तीपीठ महामार्गाची एकूण लांबी सुमारे 802 किमी आहे.
मी नितिकेश, मागील 4 वर्षांपासून महाराष्ट्रातील विविध शासकीय माहिती, सरकारी नौकरी माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम करतोय. marathisathi.in या वेबसाईटवर तुम्हाला सर्व योजना एका ठिकाणी, अगदी सोप्या भाषेत समजून घेता येतील, कारण तुमचा हक्काचा लाभ मिळवायला माहिती असणं गरजेचं आहे!