Sheli Palan Yojana 2025: सध्या शेतीचे भाव हे गगन भरारी घेत चालले आहेत, त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना शेती खरेदी करणे जणू अश्यक्यच ठरणार आहे. जी बाबदाड्याकडन मिळालेली शेती होती ती तिसऱ्या पिढीपर्यंत फक्त एक किंवा दोन एकर वर येऊन पोहोचत आहे. अशा वेळेला सरकारी नोकरीचा विचार केला तर लाखो विद्यार्थ्यांसोबतची स्पर्धा समोर येते.
म्हणून तरुणांना एक बेस्ट पर्याय हा करियर बनवण्यासाठी शिल्लक राहतो, तो म्हणजे उद्योग करण्याचा. परंतु त्यासाठी लागतो तो अमाप पैसा. त्यासाठी आत्ता काळजी करण्याची अजिबात गरजच नाही आहे. कारण Sheli Palan Yojana 2025 अंतर्गत शेळी पालन करण्यासाठी शासन देणार 90% अनुदान देत आहे. ते कशे तर चला बघूया पूर्ण माहिती.
Sheli Palan Yojana 2025 काय आहे? (थोडक्यात)
राज्यातील तरुण आणि तरुणींना उद्योगाकडे येण्यास प्रवृत्त आणि प्रोत्साहित करण्यासाठी शासन Sheli Palan Yojana 2025 राज्यभर राबवत आहे. ज्यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी हा शेती सोबतच उद्योगापासून सुद्धा चांगला नफा कमाऊ शकेल. सद्य देशभर जी शेतकऱ्यांची परिस्थिती पावसाने केली आहे हे काही कोणापासून झाकलेली नाही आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीला पूरक असा व्यवसाय हा शेळीपालन असणार आहे. या योजनेच्या माध्यमातून लाभार्थ्याला त्याच्या पात्रतेनुसार 75% पासून ते 90% पर्यंत अनुदान देत आहे. अर्थात अर्जदाराने जर का एक युनिट शेळ्या अर्थात दहा शेळ्या 90 शेळ्या ह्या दहा लाखात खरेदी केल्या तर त्या दहा लाभाचे 90% रक्कम हि शासन भरलं तर बाकीची जी रक्कम असेल ती लाभार्थ्याला भरावी लागणार आहे.
शेळीपालन योजनेसाठीचे अनुदान
मित्रांनो, शेळीपालन करण्यासाठी शासन या योजनेच्या माध्यमातून किमान 10 ते कमाला 50 लाख रुपयांपर्यंत अनुदान देऊ करत आहे. त्यामुळे तुम्हाला जर का समभार जरी शेळ्या/ बकऱ्या खरेदी कार्याच्या असल्या तरी सुद्धा त्यावर तुम्हाला शासन 75% पासून ते 90% पर्यंत अनुदान देईल. ज्यामुळे लाभार्थ्याला कमी खर्च करून मोठा उद्योग निर्माण करता येऊ शकतो. तसेच कर्ज फेडण्याची कुठलीच झंझट नसणार आहे. जर लाभार्थ्याकडे शिल्लकची रक्कम भरण्यासाठी सुद्धा पैसे नसेल तर त्यांच्यासाठी शासनच स्वतः बँकांच्या अंतर्गत कर्ज उपलब्ध करून देईल.
योजनेचे उद्देश
ग्रामीण भागातील तरुणांसाठी स्वयंरोजगाराच्या नवीन संधी तयार करून देणे, ज्याचा लाभ घेऊन अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती.विमुक्त जमाती, भटक्या जमाती आणि महिला बचत गट हे आर्थिक बाबतीने सक्षम बनतील. शेळीपालन हा व्यवसाय पिढ्यानपिढ्या पासून चालत आलेला आहे, त्यामुळे आता त्याला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिल्ने आवश्यक आहे जेणेकरून दूध व मास उत्पादन वाढण्यास मदत होईल. शेतकऱ्यांना कमी गुंतवणुकीत जास्त नाफा मिळवून देणार व्यवसाय आणि आयुष्यभर टिकणार व्यवसाय निर्माण करून देणे.
अनुदानाचा लाभ कोणाला मिळेल?
मित्रांनो या योजनेअंतर्गत जे 90% अनुदान दिले जाते ते विशेषतः खालील प्रमाणे सांगितलेल्या लाभार्थ्यांना असेल.
- अनुसूचित जाती
- अनुसूचित जमाती
- विमुक्त जाती व भटक्या जमाती
- महिला बचत गट
- ग्रामीण व शेतकरी कुटुंब ज्यांचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा कमी आहे.
योजनेअंतर्गत मिळणारे लाभ
वरती जे घटक आपण सांगितलं त्यामधील अर्जदाराला 90% अनुदान दिले जाईल तर इतर प्रवर्गातील अर्जदाराला 75% अनुदान मिळणार. हे अनुदान शेळ्या आणि बकऱ्या खरेदीसाठी असणार आहे. तसेच Sheli Palan Yojana 2025 अंतर्गत पशुपालकाला पशुपालन प्रशिक्षण व मार्गदर्शनासह शेळ्यांसाठी पशुवैद्यकीय सेवा सुद्धा उपलब्ध करून दिली जाईल. जर गरज पडली तर शेळ्यांसाठी शेड बांधण्यासाठी सुद्धा वेगे अनुदान दिले जाईल.
योजनेची पात्रता निकष
अर्जदार जर महाराष्ट्राचा रहिवासी असेल तरच त्याला शेळी पालन योजनेचा चा लाभ घेता येईल. तसेच अर्जदार हा अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती किंवा महिला बचत गटातील तरी सदस्य असायला हव्यात. या योजनेचा लाभ हा फक्त 18 -55 या वयोगटातीलच व्यक्तींना घेता येईल. अर्जदाराकडे ग्रामीण भागात शेळ्यांकरता शेत निर्माण करण्यासाठीची जागा किंवा शेती असणे आवश्यक आहे. तसेच जर अर्जदाराला पशुपालनाचा अनुभव असेल तर त्यांना विशेष प्राधान्य सुद्धा मिळाणारा आहे.
आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- राहवासी दाखला
- उत्पन्नाचा दाखला
- जातीचा दाखला
- जमिनीचा 7/12 उतारा किंवा 8-अ
- बँकेचे पासबुक
- पासपोर्ट फोटो
- प्रशिक्षण घेतले असलेया त्याचे प्रमाणपत्र
अर्ज कसा करावा?
शेळी पालन योजनेसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येऊ शकणार आहे. त्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या ग्रामपंचात/पंचायत समिती/जिल्हा परिषद कार्यालयातून शेळी पालन योजनेचा अर्ज प्राप्त करावा लागणार आहे. त्यामध्ये विचारण्यात आलेली तुमची संपूर्ण माहिती भरा आणि अधिकाऱ्याकडे कागदपत्रांसह सबमीट करा.
निष्कर्ष
राज्यातील विशेषतः ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना आणि बेरोजगार युवकांना स्वतःचा पशुपालन व्यवसाय उभारण्यासाठी मोठी आर्थिक मदत हि अनुदान स्वरूपात दिली जात आहे. त्यामुळे उद्योजक बनण्याचे स्वप्न बाळगणाऱ्यांसाठी हि मोठी संधी आहे. तसेच अनुदानाव्यतिरिक्त जी रक्कम तुम्हाला भरावी लागते त्याला भरण्यासाठी तीन ते दहा वर्षाचा कालावधी मिळणार आहे.
FAQs
-
शेळीपालनासाठी किती अनुदान मिळते?
Ans: Sheli Palan Yojana च्या माध्यमातून आर्थिक व सामाजिक मागास असलेल्या नागरिकांना 90% अनुदान तर इतर सर्वसामान्य नागरिकांना 75% अनुदान दिले जाणार आहे.
-
शेळीपालन अनुदानासाठी अर्ज कसा करावा?
Ans: शेळीपालनासाठी अनुदान मिळवायचे असेल तर ऑफलाईन पद्धतीने पंचायत समिती किंवा तुमच्या जिल्हा परिषद कार्यालयात कृषी विभागामध्ये अर्ज करावं लागणार.
-
महाराष्ट्रात शेळीपालन फायदेशीर आहे का?
Ans: शेळीपालन करून राज्यातील पशेळीपालक कोट्यवधींची उलाढाल करत आहेत. त्यामुळे शेळीपालन वुवसाय हा महाराष्ट्रात सद्यातरी फायदेशीरच आहे. कारण शेळ्यांचे दूध, मास, केस सर्वच मार्केट मध्ये विकले जातात ज्यामुळे शेळ्यांना मागणी वाढत जात आहे.
नमस्कार,
माझे नाव आकाश भगत आहे, मी एक ब्लॉगिंग क्षेत्रामध्ये मागील 4 वर्षांपासून कार्यरत आहे. मी 2023 पासून योजना या टॉपिक वरती ब्लॉग लिहतोय. त्यामुळे माझ्याकडे जवळपास 2 वर्षाचा योजना, नौकरी आणि इतर शासकीय माहितीच्या टॉपिक चा अनुभव आहे. तसेच मी सध्या marathisathi.in या साईट च्या माध्यमातून सर्व माहिती सोप्या आणि खऱ्या स्वरूपाची देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहे.
Mala sheli palan madhe intrest ahe Ani mi sheli palan prashikshan ghehun alo MLA prashikshan madhe sheli badal khup chan padtine mahiti dili ahe