Sheli Palan Yojana Maharashtra: शेळी पालनासाठी फक्त एक अर्ज करा आणि मिळवा तब्बल 50 लाख रुपयांचं कर्ज

Sheli Palan Yojana Maharashtra
WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

ग्रामीण भागातील बेरोजगार नागरिक तसेच शेतकऱ्यांसाठी Sheli Palan Yojana Maharashtra राज्य सरकार द्वारा राबवण्यात येत आहे. या योजनेतून लाभार्थी पात्र नागरिकांना १० लाख ते ५० लाख पर्यंत कर्ज ७५% अनुदानावर दिल्या जाणार आहे. शेळी पालन व्यवसाय ग्रामीण भागातील नागरिकांसाठी कमी खर्चात जास्त नफा देणारा व्यवसाय आहे.

शेळी पालन योजनेसाठी ग्रामीण भागातील शेतकरी, महिला बचत गट, बेरोजगार युवक तसेच गरजू व्यक्ती अर्ज करू शकता. चला तर जाणून घेऊ बकरी पालन योजनेसाठी अर्ज प्रक्रिया काय आहे आणि याचा लाभ कसा मिळेल तसेच योजनेची पात्रता काय आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेऊ.

🔶 Kukut Palan Yojana Maharashtra: कमी गुंतवणुकीत जास्त नफा! कुकुटपालन व्यवसायासाठी सरकार देणार 75% अनुदान

Sheli Palan Yojana

Sheli Palan Yojana म्हणजे काय? (थोडक्यात माहिती)

महाराष्ट्र शासनाने राज्यातील ग्रामीण भागातील गरीब व गरजू नागरिक, शेतकरी, पशुपालक नागरिकांना आर्थिक सशक्तीकरण प्रदान करण्यासाठी शेळी पालन योजना सुरु केली आहे. या योजनेतून शेळी खरेदी करण्यासाठी तसेच शेड तयार करण्यासाठी ७५% अनुदानावर आर्थिक सहायता केली जाते. इच्छुक नागरिकांना कमी व्याजदरात १० ते ५० लाख रुपयांपर्यंत कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून दिल्या जाते.

शेळी पालन योजनेसाठी अनुदान

महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांना शेळीपालन व्यवसाय सुरू करण्यासाठी मोठी मदत उपलब्ध करून दिली आहे. Sheli Palan Yojana अनुसूचित जाती आणि जमातीतील शेतकऱ्यांना 75% पर्यंत अनुदान दिले जाते, तर इतर सर्वसामान्य शेतकऱ्यांना 50% अनुदान मिळते.

याशिवाय, शेळीपालनासाठी आवश्यक भांडवल सहज मिळावे म्हणून बँकांमार्फत कमी व्याजदराने कर्जसुविधा दिली जाते. शेतकरी या योजनेतून 10 ते 50 लाख रुपयांचे कर्ज घेऊ शकतात. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांकडे स्वतःचे भांडवल कमी आहे, त्यांनाही शेळीपालनासारखा फायदेशीर व्यवसाय सहज सुरू करता येतो.

🔶 Gay Palan Yojana Maharashtra: आनंदाची बातमी! गाय पालनसाठी सरकार देताय तब्बल 30000 रुपये, येथे अर्ज करा

योजनेचा उद्देश

शेळीपालन योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे ग्रामीण भागातील गरीब व गरजू नागरिक, शेतकरी, पशुपालक नागरिकांना शेळी पालन व्यवसामध्ये रुची निर्माण करणे तसेच त्यांना प्रेरित करणे आहे. यामुळे ग्रामीण भागात रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतात आणि ग्रामीण युवकांचे उत्पन्न वाढते. दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना शेळीपालनासारखा पूरक उद्योग उपलब्ध करून देऊन त्यांचे आर्थिक संकट कमी करण्याचा प्रयत्न या योजनेतून केला जातो. तसेच शेळीपालन सुरू करण्यासाठी शेतकऱ्यांना शासनाकडून अनुदान व कर्जसुविधा मिळतात, ज्यामुळे हा व्यवसाय सहज सुरू करता येतो.

शेळीपालनात मिळणारा नफा

शेळीपालन व्यवसाय नियमित व योग्य पद्धतीने केल्यास

  • प्रत्येक वर्षी शेळ्यांना 2 ते 3 पिल्ले होतात.
  • शेळीचे दूध दररोज 1 ते 2 लिटर मिळते.
  • शेळीचे मांस बाजारात चांगल्या भावाने विकले जाते.
  • शेळीची शेणखत शेतात वापरता येते किंवा विक्री करता येते.

बकरी पालन योजनेतून मिळणारे लाभ

Sheli Palan Yojana Maharashtra या योजनेचा लाभ घेऊन व्यवसाय करणाऱ्या नागरिकांना अनके प्रकारचे लाभ मिळतात. राष्ट्रीयकृत व सहकारी बँकांमार्फत सहज कर्जसुविधा उपलब्ध करून दिली जाते. या व्यवसायात योग्य मार्गदर्शन मिळावे म्हणून पशुसंवर्धन विभागाकडून प्रशिक्षण दिले जाते. विशेष म्हणजे महिला बचत गटांना या योजनेत प्राधान्य दिले जाते, ज्यामुळे महिलांना स्वावलंबनाची संधी मिळते.

Sheli Palan Yojana पात्रता अटी

लाभार्थी पात्र नागरिकांना योजनेचा लाभ मिळावा म्हणून शासनाने काही अटी जाहीर केल्या आहे. हि योजना महाराष्ट्रात सुरु आल्यामुळे अर्जदार महाराष्ट्रातील स्थायी रहिवासी असणे आवश्यक आहे. तसेच अर्जदाराचे वय किमान 18 वर्षे आणि जास्तीत जास्त 55 वर्षे असावे. शेळीपालनासाठी योग्य जागा व मूलभूत सुविधा उपलब्ध असणे आवश्यक आहे. तसेच अर्जदाराने यापूर्वी याच प्रकारच्या अनुदानाचा लाभ घेतलेला नसावा.

आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • राहिवासी दाखला
  • जातीचा दाखला (असल्यास)
  • शेतजमिनीचा 7/12 उतारा किंवा भाडेपट्टा
  • बँक पासबुक झेरॉक्स
  • पासपोर्ट आकाराचे फोटो
  • प्रशिक्षण प्रमाणपत्र (जर घेतले असेल तर)

अर्ज कसा करावा

शेळी पालन योजनेसाठी अर्ज प्रक्रिया ऑफलाईन पद्धतींनी आहे. त्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद कार्यालयातून Sheli Palan Yojana Form प्राप्त करावा लागेल. त्यानंतर या फॉर्ममध्ये संपूर्ण माहिती नीट भरावी आणि सोबत आवश्यक कागदपत्रे जोडावे. त्यानंतर हा फॉर्म तुम्हाला ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद मध्ये संबंधित अधिकाऱ्याकडे सादर करायचा आहे.

शेळी पालन योजना फॉर्म सादर केल्यावर जिल्हा पशुसंवर्धन विभाग किंवा बँकेकडून तुमच्या फॉर्मची पड्ताडणी केली जाईल. त्यानंतर पात्र आहे कि नाही हे जाहीर केल्या जाणार आणि लाभार्थ्यांना योजनेचा लाभ दिल्या जाणार.

निष्कर्ष

Maharashtra Sheli Palan Yojana 2025 ही ग्रामीण भागातील शेतकरी, महिला व युवकांसाठी मोठी संधी आहे. शेळीपालन व्यवसाय करण्यास इच्छुक नागरिकांनी या योजनेचा लाभ नक्की घ्यावा. योजनेतून १० ते ५० लाखाचे कर्ज मिळते आणि त्याची परतफेड ३ ते १० वर्षाच्या कालावधीत करू शकता. कमी खर्च करूनही या व्यवसायातून चांगले उत्पन्न मिळते.

FAQ

1) Sheli Palan Yojana किती अनुदान देते?

अनुसूचित जाती व जमातीतील अर्जदारांना 75% पर्यंत अनुदान मिळते, तर इतर सर्वसामान्य शेतकऱ्यांना 50% अनुदान दिले जाते.

2) या योजनेत महिलांना विशेष फायदा आहे का?

होय. महिला बचत गटांना या योजनेत प्राधान्य दिले जाते आणि त्यांना शेळीपालनाद्वारे स्वावलंबी होण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते.

3) शेळीपालनासाठी प्रशिक्षण मिळते का?

होय. पशुसंवर्धन विभाग व कृषी विज्ञान केंद्रांमार्फत शेळीपालनासंबंधी मार्गदर्शन व प्रशिक्षण दिले जाते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

1 thought on “Sheli Palan Yojana Maharashtra: शेळी पालनासाठी फक्त एक अर्ज करा आणि मिळवा तब्बल 50 लाख रुपयांचं कर्ज”