Shetkari Apghat Vima Yojana: शेतकरी, ज्याला जगणे जगाचा पोशिंदा म्हणून ओळख दिली आहे. मर सर्वाधिक दुर्लक्ष हे आपल्या बळीराज्यावरच केले जाते. मालाला भाव मिळत नाही आणि वरून निसर्ग सुद्धा साथ देत नाही. अशा चिंतेतच शेतकरी जीवन जगात असतो. आपण पाहिले असेल शासकीय जे नोकरदार असतात त्यांचे विमे हे संबंधित कंपनी किंवा शासन बनून देत असते. परंतु अचानक मात्र कुठलाही विमा मिळत नव्हता. म्हणून शेतकऱ्यांच्या काळजी पोटी शेतकऱ्यांचा सुद्धा विमा असावा जेणेकरून त्यांचे जीवन संरक्षित राहील, त्यासाठी राज्यसरकारच्या माध्यमातून Shetkari Apghat Vima Yojana राज्यभर राबविली जात आहे.
Shetkari Apghat Vima Yojana काय आहे? (थोडक्यात)
शेतकरी बंधूंनो, शेतकऱ्याने जीवन हे विम्याच्या जाड दोरीने संरक्षित करण्याचा हा शासनाचा प्रयत्न आहे. जर एखाद्या शेतकऱ्याचा अपघात झाला आणि त्याचा मृत्य झाला तर या योजनेच्या माध्यमातून त्याच्या कुटुंबाला सहानुभूती म्हणून 2 लाखाची आर्थिक मदत दिली जाते. तसेच जर कायमस्वरूपी अपंगत्व आले तर 1 लाखाची मदत आणि तात्पुरते अपंगत्व असेल तर 50 हजाराची आर्थिक मदत शासन करणार आहे. जेणेकरून अपघातग्रस्त शेतकऱ्याला आणि त्याच्या परिवारला पुढील काही दिवस जगण्यास मदत होईल.
शेतकरी अपघात विमा योजनेचे उद्देश?
अपघात झालेल्या शेतकऱ्याला आर्थिक स्थिरता देणे आणि त्याच्या कुटुंबाचे मनोबल वाढवणे. शेतकरी हा घराचा मुख्य कमावता व्यक्ती असतो, जर अपघातामध्ये काही बरे वाईट झाले किंवा कायमचे अपंगत्व आले तर शासन Shetkari Apghat Vima Yojana अंतर्गत परिवाराला आर्थिक संरक्षण देण्याचा उद्देश बाळगत आहे.
कोण शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत?
महाराष्ट्रातील रहिवासी असलेल्या शेतकऱ्यांनाच शेतकरी विमा योजनेचा लाभ घेता येणार आहे. तसेच शेतीच्या 7/12 उताऱ्यामध्ये शेतकऱ्याचे नाव असणे आवश्यक असेल. 18 ते 70 या वयोगटामधील शेतकरी या योजनेचा अर्ज करू शकतील. जर अपघात हा शेतामध्ये किंवा शेत संबंधी काम करत असतांना झाला असेल तरच या योजनेचा लाभ मिळू शकेल, याची नोंद घ्यावी.
अर्ज करतांना कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?
- आधार कार्ड
- 7/12 उतारा
- अपघाताचा FIR उतारा किंवा पोलिसांचा पंचनामा
- मृत्यू प्रमाणपत्र( मृत्यू झाल्यास)
- वैद्यकीय अहवाल
- बँकेचे खातेबुक
- नातेवाईकांशी संबंध प्रमाणपत्र/ राशन कार्ड
अपघात झाल्यास किती मदत मिळते?
| अपघाती मृत्यू | 2,00,000 |
| कायमचे अपंगत्व | 1,00,000 |
| अंशतः अपंगत्व | 50,000 |
अर्ज कुठे आणि कसा करावा?
अर्ज हा तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने तुमच्या जवळील कृषी कार्यालयामध्ये किंवा महसूल कार्यालयामध्ये जाऊन करता येणार आहे. संबंधी अधिकाऱ्याकडून Shetkari Apghat Vima Yojana चा अर्ज मिळवावा आणि योग्य ती माहिती भरून सर्व कागदपत्रांसह तिथेच सबमिट करावा. तुमच्या अर्जाची तपासणी केली जाईल आणि तुमची विम्यासाठी पात्र असाल तर तुमच्या बँक खात्यात लाभ वर्ग केला जाईल.
संपर्क माहिती
शेतकरी अपघात विमा योजनेचा अर्ज करताक्षणी काही अडाणी येत असेल तर तुम्हला खालीलप्रमाणे संपर्क करून अडचणींचे निवारण करू शकता.
- अधिकृत वेबसाईट: krishi.maharashtra.gov.in
- कार्यालय: जिल्हा व तालुका कृषी अधिकारी कार्यालय.
निष्कर्ष
शेतकरी आणि त्यांच्या परिवारासाठी अत्यंत उपयुक्त असलेली हि अपघात विमा योजना असून सर्वच शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला पाहिजे. कारण जर शेतकऱ्याला अपघातामध्ये काही झाले तर त्याच्या परिवाराला तारुण्याचे काम हि योजना करणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱयांना ह्या योजनेची माहिती द्या, धन्यवाद.
नमस्कार,
माझे नाव आकाश भगत आहे, मी एक ब्लॉगिंग क्षेत्रामध्ये मागील 4 वर्षांपासून कार्यरत आहे. मी 2023 पासून योजना या टॉपिक वरती ब्लॉग लिहतोय. त्यामुळे माझ्याकडे जवळपास 2 वर्षाचा योजना, नौकरी आणि इतर शासकीय माहितीच्या टॉपिक चा अनुभव आहे. तसेच मी सध्या marathisathi.in या साईट च्या माध्यमातून सर्व माहिती सोप्या आणि खऱ्या स्वरूपाची देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहे.