Small Cause Court Mumbai Bharti 2025: सरकारी नोकरी करू इच्छुतो उमेदवारांसाठी आनंदाची बातमी. तुम्ही फक्त ७वी ते १०वी पास जरी असाल तरी तुम्हाला सरकारी नोकरी करण्याची संधी आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 सप्टेंबर 2025 आहे. वयोमर्यादा 18 ते 43 वर्षे ठेवण्यात अली आहे. अर्ज करण्याची पद्धत जाणून घेण्यासाठी हा लेख पूर्ण वाचा, भरती बद्दल संपूर्ण सविस्तर माहिती मिळेल.
Small Cause Court Mumbai Bharti 2025 संपूर्ण माहिती
- भरती विभाग: लघुवाद न्यायालय, मुंबई
- भरती प्रकार: सरकारी नोकरी
- पदाचे नाव: • ग्रंथपाल • वॉचमन (पहारेकरी) • माळी
- मासिक वेतन: ₹21,700 ते ₹69,100
- एकूण पदसंख्या: १२ रिक्त पदे
- नोकरीचे ठिकाण: मुंबई
शैक्षणिक पात्रता
- ग्रंथपाल – कमीत कमी एसएससी बोर्ड परीक्षा उत्तीर्ण, पदवीधारकांना प्राधान्य
- वॉचमन – कमीत कमी ७ वी उत्तीर्ण (मराठी भाषेसह)
- माळी – यासाठी शैक्षणिक पात्रतेची गरज नाही.
अंतिम तारीख
अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख 25 सप्टेंबर 2025 (सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत)
अर्ज करण्याची पद्धत
- अर्ज फक्त ऑफलाईन पद्धतीने (RPAD किंवा Speed Post द्वारे) केला जाईल.
- उमेदवारांनी लघुवाद न्यायालयाच्या अधिकृत संकेतस्थळावरून अर्ज व घोषणापत्र डाऊनलोड करून भरावे.
- अर्ज सुस्पष्ट व सुवाच अक्षरात A4 आकाराच्या चांगल्या दर्जाच्या कागदावर भरावा.
- प्रत्येक पदासाठी वेगळा अर्ज करावा. एकाच अर्जावर तीनही पदे लिहिल्यास अर्ज रद्द केला जाईल.
- अर्ज पाठवताना बंद लिफाफ्यावर अर्ज केलेल्या पदाचे नाव ठळक अक्षरात लिहावे.
- अर्ज व इतर कागदपत्रे शेवटच्या तारखेपर्यंत पोहोचलेली असावी.
अर्ज पाठवण्याचा पत्ता
प्रबंधक,
लघुवाद न्यायालय,
लोकमान्य टिळक मार्ग,
धोबी तलाव,
मुंबई – 400 002
PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
निष्कर्ष
Small Cause Court Mumbai Bharti, लघुवाद न्यायालय मुंबईत सरकारी नोकरीसाठी ही सुवर्णसंधी आहे. योग्य पात्र उमेदवारांनी अर्ज करण्याची अंतिम तारीख लक्षात ठेवून अर्ज करावा. ही नोकरी आर्थिक व सामाजिक सुरक्षिततेसाठी चांगली संधी आहे. अर्ज करताना सर्व नियम नीट पाळावेत.
मी नितिकेश, मागील 4 वर्षांपासून महाराष्ट्रातील विविध शासकीय माहिती, सरकारी नौकरी माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम करतोय. marathisathi.in या वेबसाईटवर तुम्हाला सर्व योजना एका ठिकाणी, अगदी सोप्या भाषेत समजून घेता येतील, कारण तुमचा हक्काचा लाभ मिळवायला माहिती असणं गरजेचं आहे!