SMAM Yojana: मित्रांनो, आजकाल महिला प्रत्येक क्षेत्रामध्ये उताररून स्वतःचे कर्तृत्व सिद्ध करून यशाला आपल्याकडे खेचून आणत आहेत. मंग आमच्या शेतकरी बांधवांच्या कारभारणी कुठे मग राहतील होय, आधुनिक तंत्रज्ञानाकडे संपूर्ण जगाची वाटचाल सुरु असतांनाच शेतकऱ्यांनी सुद्धा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अधिक चांगल्या पद्धतीने शेती करावी. विशेषतः महिला शेतकरी जे आत्ता पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून शेती करत आहेत. त्यांना अधिक सोयींसकर जावे म्हणून केंद्र सरकारने “सब मिशन ऑन ऍग्रिकल्चरल मेकनायझेशन” (SMAM Yojana) अंतर्गत महिला शेतकऱ्यांसाठी ट्रॅक्टर खरेदीवर 50% अनुदान देणारी योजना सुरु केलेली आहे.
SMAM Yojana काय आहे आणि कोणाला मिळणार लाभ?
शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकरी महिला असतील किंवा ज्या महिलांच्या नावाने शेती असेल अश्या महिलांना केंद्र सरकार या SMAM Yojana च्या माध्यमातून 50% अनुदान देणार आहे अर्थातच 4.5 लाखाचा ट्रॅक्टर 2.25 लाखात मिळणार. यामुळे कमी खर्च करून नवीन ट्रॅक्टर तुम्ही खरीदी करू शकणार आहे. ज्यामुळे तुमची शेती आधुनिक ट्रॅक्टरने करणे आता अधिक सोयीस्कर होऊ शकते. ज्यामुळे महाला शेतकरी अधिक उत्पन्न काढून आधी आर्थिकदृष्ट्या समर्थ बनतील. शेतकऱ्यांना खर्च कमी होण्यासाठी हि योजना 2014-15 राबवण्यात येत असते.
योजनेचे उद्देश
गरजू शेतकऱ्यांना अधिनिक संसाधने अनुदान देऊन कमी खर्च खरेदी करता येण्यासाठी आणि शेतीचा विकास होण्यासाठी हि योजना राबविली जाते. जेणेकरून कमी खर्च करून, कमी वेळेत अधिक मेहनत न करता जास्त उत्पादन शेतकऱ्यांना काढता यावे. मित्रांनो या योजनेसाठी 2025 या आर्थिक वर्षाकरिता 1000 कोटी प्लस निधीची तरतूद केलेली आहे.
योजनेचा लाभ योजनेअंतर्गत मिळणार लाभ
SMAM Yojana अंतर्गत अल्पभूदारक शेतकऱ्यांना आणि कोणत्याही महिला शेतकऱयांना नवीन ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी कमाल 50% अनुदान अनुदान दिले जाते. परंतु ज्या महिला शेतकरी आहेत त्या अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती मधील असतील तेव्हाच एवढे अनुदान दिले जाणार आहे. तर इतर सर्वसाधार शेतकरी असतील अशा बांधवाना मात्र 40% अनुदान देण्यात येत असते.
योजनेअंतर्गत मिळणारे इतर फायदे
याच SMAM Yojana अंतर्गत अर्जदार शेतकऱ्याला ट्रॅक्टर व त्यांची सर्व उपकरणे, पावर ट्रिलर, सिड ड्रिल, स्प्रे पंप,हार्वेस्टर, थ्रेशर,ड्रीप व स्प्रिंकरचे उपकरणे, ड्रोन इत्यादी वस्तूंवर सुद्धा अनुदान देण्यात येणार आहे.
आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- बँकेकचे पासबुक
- जातीचा दाखला
- उत्पनाचा दाखला
- अर्जदाराचे फोटो
- मोबाईल नंबर
- 7/12 उतारा
असा करा अर्ज
या योजनेचा अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम agrimachinery.nic.in या अधिकृत वे पोर्टलवरती जा. तिथे फार्मर आयडीने रजिष्ट्रेशन करा. नंतर तुम्हाला कोणते यंत्र अनुदानावर हवे त्याची निवड करा. सांगण्यात आलेली जी कागदपत्रे आहेत ती सर्व उपलोड करून SMAM Yojana चा अर्ज सबमिट करा. नंतर तुमच्या अर्जाची पडताळणी केली जाईल आणि किमान एका महिन्याच्या आत तुमच्या बँक खात्यात अनुदानाची रक्कम जमा केली जाईल.
निष्कर्ष
अल्पभूदारक शेतकरी आणि महिला शेतकऱ्यांना SMAM Yojana एक मोठी संधी ठरणार आहे. या संधीचा लाभ घेऊन तुम्ही शेतामधून अधिक उत्पन्न काढू तर शकता सोबतच इस्त्राच्या शेतामधील कामे करून व्यवसाय सुद्धा करू शकता आणि स्वतःचे आर्थिक स्वातंत्र्य प्रपात करू शकता, धन्यवाद.
नमस्कार,
माझे नाव आकाश भगत आहे, मी एक ब्लॉगिंग क्षेत्रामध्ये मागील 4 वर्षांपासून कार्यरत आहे. मी 2023 पासून योजना या टॉपिक वरती ब्लॉग लिहतोय. त्यामुळे माझ्याकडे जवळपास 2 वर्षाचा योजना, नौकरी आणि इतर शासकीय माहितीच्या टॉपिक चा अनुभव आहे. तसेच मी सध्या marathisathi.in या साईट च्या माध्यमातून सर्व माहिती सोप्या आणि खऱ्या स्वरूपाची देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहे.