फक्त शेतकर्यांसाठी सुरु केलेली Solar Pump Subsidy Yojana 2025 अतिशय लाभदायक आहे. अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांना तब्बल 90% सबसिडी सरकार देणार आहे, शेतकऱ्यांना फक्त 10% खर्च करायचा आहे. आता शेतकर्यांचे उत्पन्न वाढवण्यापासून कोणीच थांबवू शकत नाही.
ग्रामीण भागातील मोठ्या प्रमाणात नागरिक हे शेतीवर अवलंबून असतात, अनेक शेतकऱ्यांचा मुख्य व्यवसाय हा शेतीच असतो. शेतकऱ्याला शेती उत्पन्न तेव्हाच चांगलं देते जेव्हा त्या शेतीला पाणी चांगलं मिळते. त्यामुळे शेतात पाण्याची सोय असणे शेतकऱ्यांसाठी आवश्यक असते परंतु विजेचा खर्च आणि डिझेलचा खर्च शेतकऱ्याला परवडत नसल्यामुळे सरकारने खास शेतकऱ्यांसाठी “प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा आणि उत्थान महाअभियान (पीएम कुसुम योजना)” सुरू केली आहे.
Solar Pump Subsidy Yojana मध्ये सबसिडी किती मिळते?
सोलर पंप सबसिडी योजना लाभार्थ्यांना एकूण खर्चाच्या 60% ते 90% पर्यंत सबसिडी दिली जाते. शेतकऱ्यांना फक्त 10% ते 40% खर्च स्वतःच्या खिशातून करावा लागतो. जिल्हा नुसार व शेतकऱ्यांच्या परिस्तिथिनुसार सबसिडीमध्ये बदल होण्याची शक्यता असते. या योजनेतून मिळणारी सबसिडीची रक्कम शेतकऱ्यांच्या थेट खात्यात जमा करण्यात येते.
सोलर पंप सबसिडी योजनेचे फायदे
हि योजना केवळ शेतकऱ्यांसाठी आहे त्यामुळे लाभार्थी पात्र शेतकऱ्यांना या योजनेचा खूप फायदा मिळतो, त्यांचे उत्पन्न दुप्पट होते आणि विजेचा खर्च सुद्धा वाचतो. सिंचन वेळेवर करता येते, त्यामुळे पिकांची उत्पादकता वाढते, अतिरिक्त वीज उत्पादन झाल्यास ती विकून उत्पन्न मिळवता येते, सरकारकडून मिळणारे मोठे अनुदान शेतकऱ्यांचे आर्थिक ताण कमी करते. अशा प्रकारचे अनेक फायदे शेतकऱ्यांना होते.
सोलर पंप योजनेचे नियम आणि पात्रता
सोलर पंप योजना हि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी असल्यामुळे अर्जदार शेतकरी हि राज्याचा स्थायी रहिवासी असणे आवश्यक आहे. तसेच शेतकऱ्याच्या नावावर शेतजमीन असणे सुद्धा आवश्यक आहे. जर यापूर्वी तुम्ही सोलर पंप योजनेचा लाभ घेतला असेल तर परत अर्ज करता येणार नाही. एका शेतकऱ्याला एकदाच लाभ मिळतो. सर्व आवश्यक कागदपत्रे (आधार, जमीन नोंद, फोटो इ.) तयार असावीत.
Aadhar Yojana Scholarship| राज्यातील मुलींना शिक्षणासाठी मिळणार 60,000 हजाराचे अनुदान.
अर्ज कसा करावा?
अर्ज प्रक्रिया हि पूर्णपणे ऑनलाईन असल्यामुळे योजनेची अधिकृत वेबसाइट https://pmkusum.mnre.gov.in यावर भेट द्या. येथे तुम्हाला सर्व आवश्यक माहिती भरून रेजिस्ट्रेशन करावे लागेल. त्यांनतर अर्ज फॉर्म मध्ये सर्व माहिती अचूक भरून आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा. शेवटी अर्ज सबमिट करा इतकं केल्यानंतर तुमचं आवेदन पूर्ण होईल.
योजना झलक
मुद्दा | माहिती |
---|---|
विभाग | नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय |
सुरुवात वर्ष | मार्च 2019 |
अनुदान | 60% ते 90% पर्यंत |
अधिकृत वेबसाइट | pmkusum.mnre.gov.in |
निष्कर्ष
Solar Pump Subsidy Yojana खास शेतकऱ्यांच्या समस्या लक्षात घेऊन सुरु करण्यात आलेली योजना आहे. 90% अनुदानाचा लाभ घेऊन शेतकरी बांधवानी आपल्या शेतामध्ये सोलर पंप लावून घयावा. अश्याच योजनांच्या माहिती साठी आमच्या व्हाट्स अँप ग्रुप ला जॉईन करा आणि वेळेवर सर्व अपडेट मिळवा.
मी नितिकेश, मागील 4 वर्षांपासून महाराष्ट्रातील विविध शासकीय माहिती, सरकारी नौकरी माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम करतोय. marathisathi.in या वेबसाईटवर तुम्हाला सर्व योजना एका ठिकाणी, अगदी सोप्या भाषेत समजून घेता येतील, कारण तुमचा हक्काचा लाभ मिळवायला माहिती असणं गरजेचं आहे!