डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेतून गरीब विद्यार्थ्यांसाठी ₹51,000 मोठी शिष्यवृत्ती मदत | Swadhar Yojana

Swadhar Yojana
WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Swadhar Yojana या योजनेचे पूर्ण नाव डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना आहे. या योजनेतून पात्र गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना सरकार कडून ₹51,000 पर्यंत शिष्यवृत्ती मिळते. ही महाराष्ट्र शासनाची एक महत्त्वाची शैक्षणिक योजना आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत ही योजना २०१८ साली सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा उद्देश अनुसूचित जाती (SC) आणि नवबौद्ध समुदायातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी आर्थिक मदत करणे हा आहे.

10 वी पास विद्यार्थ्यांना मिळणार मोफत टॅबलेट। असे करा Online Registration: Mahajyoti Free Tablet Yojana 2025

Swadhar Yojana मुख्य उद्देश

स्वाधार योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे अनुसूचित जाती (SC) आणि नवबौद्ध समुदायातील गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी प्रेरित करणे आहे. आर्थिक अडचणीमुळे कोणत्याही विद्यार्थ्यांना आपले शिक्षण थांबवावे लागू नये आणि जे विद्यार्थी सरकारी वसतिगृहात प्रवेश मिळवू शकले नाहीत, त्यांना शिक्षण सुरू ठेवण्यासाठी या योजनेतून ₹51,000 मोठी शिष्यवृत्ती मदत केली जाते. या मदतीतून विद्यार्थ्यांचे ट्युशन फी, पुस्तकांचा खर्च, प्रवास भत्ता, आणि राहण्याचा खर्च भागवला जाऊ शकतो.

आर्थिक मदत किती मिळते?

स्वाधार योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना दरवर्षी आर्थिक सहाय्य दिले जाते. हे सहाय्य त्यांच्या निवासस्थानानुसार वेगळे असते.

प्रदेशवार्षिक मदत (₹)
मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, पिंपरी-चिंचवड₹60,000
इतर महानगरपालिका क्षेत्र₹51,000
नगर परिषद क्षेत्र₹43,000
ग्रामीण व तालुका क्षेत्र₹38,000

योजनेचे फायदे

Swadhar Yojana हि गरीब व गरजू कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी अतिशय लाभदायक योजना ठरत आहे. या योजनेमुळे विद्यार्थ्यांना शिक्षण सुरू ठेवण्यासाठी आर्थिक स्थैर्य मिळते. उच्च शिक्षण घेण्यासाठी आर्थिक अडचणी कमी होतात तसेच त्यांना समाजात समानता मिळते.

राज्यातील बेरोजगार मुलांना मिळणार रोजगाराची नवीन संधी। एवढा मिळणार पगार: Ladka Bhau Yojana 2025

Swadhar Yojana पात्रता अटी

योजनेचा लाभ पात्र विद्यार्थ्यांना मिळावा म्हणून काही पात्रता व अटी जाहीर करण्यात आल्या आहे. जसे अर्जदार विद्यार्थी हा महाराष्ट्राचा स्थायी रहिवासी असणे आहे तसेच अर्जदार अनुसूचित जाती किंवा नवबौद्ध समुदायातील असावा. विद्यार्थ्याने मान्यताप्राप्त संस्थेत प्रवेश घेतलेला असावा आणि तो नियमितपणे शिक्षण घेत असावा. त्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ₹2.5 लाखांपेक्षा कमी असावे. त्याचबरोबर मागील वर्गात किमान 50% गुण मिळालेले असावेत. अश्या सर्व अटी पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना योजनेचा लाभ दिल्या जाईल.

आवश्यक कागदपत्रे

  • आधारकार्ड
  • जात प्रमाणपत्र
  • उत्पन्न प्रमाणपत्र
  • निवास प्रमाणपत्र
  • गुणपत्रिका (10वी/12वी)
  • रेशनकार्ड
  • जन्म प्रमाणपत्र
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • मोबाइल नंबर

अर्ज प्रक्रिया (Swadhar Yojana Online Application)

अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम अधिकृत संकेतस्थळ 👉 https://hmas.mahait.org या लिंकवर जा. तेथे “Dr. Babasaheb Ambedkar Swadhar Yojana” या लिंकवर क्लिक करा. अर्ज फॉर्म उघडल्यानंतर आवश्यक सर्व माहिती काळजीपूर्वक भरा आणि लागणारी कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा. सर्व माहिती भरल्यानंतर अर्ज सबमिट करा. त्यानंतर अर्जाची तपासणी केली जाते आणि पात्र विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात आर्थिक मदत थेट जमा केली जाते.

राज्यातील मुलींसाठी आनंदाची बातमी या योजनेतून शिक्षणासाठी मिळणार 60,000 रुपयांचे अनुदान। Aadhar Yojana Scholarship

निष्कर्ष

Dr. Babasaheb Ambedkar Swadhar Yojana ही खरोखरच विद्यार्थ्यांसाठी वरदान आहे. गरीब, अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणातून स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी ही योजना मोठी मदत करत आहे. त्यामुळे पात्र विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर या योजनेसाठी अर्ज करून शासनाच्या या उपक्रमाचा लाभ घ्यावा.

अधिकृत वेबसाइट https://hmas.mahait.org/

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *