Tadpatri Anudan Yojana: शेतकरीबांधवांना ताडपत्री किती महत्वाची असते हे सांगण्याची गरज नाही. कारण जेवहा जेव्हा निसर्ग साथ सोडतो तेव्हा तेवहा हाती आलेल्या पिकांना वाचवण्यासाठी ताडपत्रीच कामा पडत असते. सध्या जो महाराष्ट्रभर णिसर्वाच्या ढगफुटी सदृश पावसाचा कहर सुरु आहे ज्यामुळे लाखो शेतकरी बांधवांचे पिके हि पाण्यात सामावून गेली आहेत. परंतु जय शेतकऱ्यांची पीक असूनही सुखरूप आहेत, त्यांना जे पीक हाती आले ते वाचवण्यासाठी शासन पंचायत समिती अंतर्गत Tadpatri Anudan Yojana राबवून ताडपत्रीवर 75% पर्यंत अनुदान देत आहे. तर चला बघूया काय आहे हि ताडपत्री योजना आणि याचा लाभ कसा घेता येईल.
Also Read: Gai Gotha Yojana: गोठा बांधण्यासाठी गाई गोठा अनुदान योजनेतून मिळवा 3 लाख रुपयांचे अनुदान, अर्ज सुरु
Tadpatri Anudan Yojana काय आहे?
सद्याच्या महागाईमध्ये सध्या मिठाचे सुद्धा भाव गरिबाला खूप अधिक वाटतअसतात. तर ताडपत्रीचे भाव तर अधिकच आहेत. जर आपल्या पिकांच्या संरक्षणासाठी आपण ताडपत्री घेणार असू तर ते एकदम चांगलीच घेऊ, परंतु एकदां चान्गल्या ताडपत्रीचे भाव सुद्धा चांगलेच असते. जवळपास एक चांगल्या कंपनीची ताडपत्री खेडी करणतों म्हण्टले तर 15-20 हजाराची किंमत मोजावी लागते. एव्हडी महाग ताडपत्री साधारण शेतकऱ्यानांकडून कडून शक्य होत नाही, आणि म्हणून अशा शेतकऱ्यांना अतिवृष्टी पासून वाचवण्यासाठी Tadpatri Anudan Yojana अंतर्गत जवळपास 50%- 75% अनुदान देऊन ताडपत्री खरेदीस मदत केली जाते.
ताडपत्री अनुदान योजनेचे उद्देश काय आहे?
गरिबातील गरीब असलेल्या शेतकऱ्याला त्याच्या शेतातील पिकाचे संरक्षण करता यावे यासाठी आर्थिक मदत करणे हे या योजनेचे उद्देश शासनाचे असणार आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांचे पिकाचे नुकसान थांबेल आणि अधिक उत्पन्न होईल.
ताडपत्री अनुदान योजनेचे फायदे काय?
शेतकऱ्याला कमी पैशांध्ये एकदम चांगली ताडपत्री खरेदी करता येणे शक्य होईल. त्याच्यावर आर्थिक तणाव निर्माण होणार नाही. पावसामुळे हाती आलेले पिकाचे होणारे नुकसान टळेल आणूनि भरघोस उत्पादन होण्यास मदत होईल. शेतकऱ्याला उत्पादन चांगले झाले तर तर भाव सुद्धा चांगला मिळू शकतो ज्यामुळे देशाची अर्थव्यवस्तेला चालना मिळेल. मिळालेल्या ताडपत्रीचा उपयोग लाभार्थी अन्य कामांसाठीसुद्धा करून घेऊ शकतो.
ताडपत्री अनुदान योजनेसाठी कोण अर्ज करू शकतो?
महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असलेलेच शेतकरी ताडपत्री अनुदानासाठी अर्ज करू शकतील. तसेच जर अर्जदाराने या पूर्वी ताडपत्री करता इत्तर योजनेचा लाभ घेतला असेल तर त्याला अपात्र करण्यात येईल. एका कुटुंबातील कीं सातबाऱ्यावरील एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ देण्यात येईल. ज्या अर्जदाराला पात्र केले असेल त्यांना सर्वप्रथम स्वखर्चातून ताडपत्री खरेदी करावी लागणार आहे, त्यानंतरच तुमच्या पात्रतेनुसार अनुदानाची रक्कम तुमच्या बँक खात्यात वर्ग केली जाईल.
ताडपत्री योजनांसाठी कोणती कागदपत्रे लागतील?
- योजनेचा अर्ज
- ताडपत्रीचे खरेदीचे बिल
- आधार कार्ड
- मोबाईल नंबर
- मेल आयडी
- रहिवासी दाखला
- उत्पन्नाचा दाखल
- जातीचा दाखला
- शेताचा नक्षा
- भागीदाराची संमतीपत्र
- बँकेचे पासबुक
- 7/12 उतारा
- 8- अ
ताडपत्री अनुदानासाठी अर्ज कसा करायचा?
Tadpatri Anudan Yojana हि पंचायत समिती अंतर्गत राबवली जात असल्यामुळे त्याचा अर्ज सुद्धा ऑफलाईन पद्धतीने पंचायत समिती मधेच करावा लागेल. त्यामुळे योजनेचा अर्ज हा तुमच्या गावातील कृषी सहाय्यकाकडून मिळवायचा आहे. त्यामध्ये तुमची आणि शेताची विचारण्यात आलेली संपूर्ण माहिती भरावा सोबत वरती जे आपण आवश्यक कागदपत्रे बघितलेत ते जोडा. आता हे ताडपत्री योजनेचा अर्ज आणि कागदपत्र घेऊन तुमच्या पंचायत समिती कार्यालयातील कृषी विभागात जाऊन सबमिट करा.
निष्कर्ष
शेतकऱ्यांना हाती आलेल्या पिक्कण्णा वाचवण्याची हि शेवटची संधी आहे. त्यामुळे जर खर्च पीक वाचवायचे असेल तर तुम्हला जास्त खर्च न करता फक्त या योजनेचा अर्ज भरून द्या आणि अनुदानावर ताडपत्री मिळवा. अर्ज कसा कार्यच, कुठे करायचा, कागदपत्रे यांविषयीची संपूर्ण माहितीआपण या आर्टिकल मध्ये दिलेली आहे.
नमस्कार,
माझे नाव आकाश भगत आहे, मी एक ब्लॉगिंग क्षेत्रामध्ये मागील 4 वर्षांपासून कार्यरत आहे. मी 2023 पासून योजना या टॉपिक वरती ब्लॉग लिहतोय. त्यामुळे माझ्याकडे जवळपास 2 वर्षाचा योजना, नौकरी आणि इतर शासकीय माहितीच्या टॉपिक चा अनुभव आहे. तसेच मी सध्या marathisathi.in या साईट च्या माध्यमातून सर्व माहिती सोप्या आणि खऱ्या स्वरूपाची देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहे.