Tar Kumpan Yojana Maharashtra 2025: महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवत असतात त्याचप्रमाणे हि योजना सुद्धा शासनाने शेतकऱ्यांसाठी सुरु केली आहे. तार कुंपण योजना शेतकऱ्यांसाठी अतिशय लाभदायक आहे. या योजनेतून लाभार्थी शेतकऱ्यांना 90 टक्के पर्यंत अनुदान दिले जाते.
राज्यातील शेतकऱ्यांना शेती करताना खूप अडचणींचा सामना करावा लागतो, तो शेतकरी अशा सर्व अडचणी सामना करत नेहमी पुढे जात असतो. परंतु कधी अशा अडचणी येतात त्याचा तो सामना नाही करू शकत, जसे जनावरे शेतीत घुसतात, कधी डुकरं किंवा नीलगाय सारखे प्राणी पिकांची नासधूस करतात. यामुळे शेतकऱ्यांचं खूप नुकसान होतं. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन शासनाने Mukhyamantri Tar Kumpan Yojana Maharashtra सुरु केली आहे.
गोठा बांधण्यासाठी गाई गोठा अनुदान योजनेतून मिळवा 3 लाख रुपयांचे अनुदान – Gai Gotha Yojana 2025
Tar Kumpan Yojana Maharashtra म्हणजे काय?
तार कुंपण योजना हि महाराष्ट्रातील सरकारी योजना आहे. या योजनेतून शेतकऱ्यांना शेतामध्ये कुंपण घालण्यासाठी अनुदान दिले जाते. शेतकऱ्यांनाच पिकाला जनावरांनी त्रास देऊ नये शेतीमधल्या पिकांचे नुकसान करू नये म्हणून तार कुंपण घालण्यासाठी सरकार या योजनेचा माध्यमातून शेतकऱ्यांना मदत करतात.
तार कुंपण योजनेत किती अनुदान मिळते?
Tar Kumpan Yojana Maharashtra या योजनेचा माध्यमातून फक्त शेतकऱ्यांना लाभ दिला जातो. जर शेतकऱ्याकडे 1 ते 2 हेक्टर जमीन असेल तर अशा शेतकऱ्यांना 90 टक्के अनुदानावर लाभ दिला जातो. तसेच जर शेतकऱ्याकडे 2 ते 3 हेक्टर जमीन असेल तर 60 टक्के आणि 3 ते 5 असेल तर 50 टक्के आणि 5 हेक्टर पेक्षा जास्त असेल तर 40 टक्के अनुदान दिले जाते. उर्वरित रक्कम हि शेतकऱ्याला भरावी लागणार आहे.
योजनेचा लाभ कोण घेऊ शकतो?
योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांनाच मिळतो. म्हणून फक्त राज्यातील रहिवासी शेतकऱ्यांनीच योजनेसाठी आवेदन करावे. शेतजमिनीचा मालकाने च योजनेसाठी अर्ज करावा अन्यथा अर्ज स्वीकारल्या जाणार नाही. तसेच शेतातील पिकांचे नुकसान झाल्याचा पुरावा अर्जदाराकडे असणे आवश्यक आहे. अर्ज करण्याआधी शेतकऱ्याने सर्व कागदपत्रे गोळा करून ठेवावे आणि महत्वाचे म्हणजे शेतकऱ्याने याआधी योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
अर्ज करताना लागणारी कागदपत्रे
- आधार कार्ड
- 7/12 उतारा
- बँक पासबुक
- जात प्रमाणपत्र (जर लागलं तर)
- फोटो
- शेतीचा नकाशा
- पीकविम्याचा पुरावा
- मोबाइल नंबर
योजनेचे फायदे
Tar Kumpan Yojana Maharashtra हि योजना शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची आहे. या योजनेचा लाभ घेणाऱ्या अनेक शेतकऱ्यांना शेती मध्ये फायदा झाला आहे. मोकाट जनावरे व प्राण्यांपासून सुरक्षा मिळते तसेच शेतकऱ्याचे पीक सुरक्षित राहते. पिकांची चोरी करणे टाळते, उत्पन्नामध्ये वाढ होते, कुंपण घालण्यासाठी शेतकऱ्याला पूर्ण खर्च नाही द्यावा लागणार. अशा प्रकारचा सुविधा शेतकऱ्यांना मिळते.
Tar Kumpan Yojana Maharashtra या योजनेसाठी अर्ज कसा करावा?
मुख्यतः हि योजना ग्रामीण विभागामध्ये राबवली जात आहे त्यामुळे शेतकऱ्यांना अर्ज हा ऑफलाईन पद्धतींनी करावा लागणार आहे. अर्जदार शेतकऱ्याला अर्ज करण्यासाठी आपल्या गावचा ग्रामपंचायत किंवा कृषी अधिकारी कार्यालयात जाऊन योजनेचा फॉर्म घ्यावा लागेल. या फॉर्म मध्ये दिलेली सर्व माहित नीट वाचून घ्यावी त्यानंतर फॉर्म मध्ये विचारलेल्या सर्व जागी योग्य माहिती भरावी. सर्व आवश्यक कागदपत्रांची झेरॉक्स जोडावी लागेल. त्यानंतर फॉर्म एकदा नीट तपासून फॉर्म त्याच कार्यालयामध्ये जमा करा.
फॉर्म जमा केल्यानंतर अर्जदार शेतकरी हा पात्र आहे कि नाही याची नोंद केल्या जाईल. त्यानंतर तुमची शेतीची तपासणी होईल आणि जर तुम्ही खरंच योजनेसाठी लाभार्थी असाल तर लवकरच तुमचा फॉर्म मंजूर केल्या जाईल आणि तुम्हाला लाभ दिल्या जाईल.
अडचणी आल्यास संपर्क करा
महाडीबीटी हेल्पलाइन: 1800-120-8040
तालुका कृषी कार्यालय
ग्रामसेवक / कृषी सहाय्यक
निष्कर्ष
Tar Kumpan Yojana Maharashtra, हि शेतकऱ्यांसाठी खूप महत्वाची व उपयुक्त योजना आहे. या योजनेतून राज्यातील हजारो शेतकऱ्यांना लाभ दिल्या गेला आहे. तुम्ही जर राज्यातील शेतकरी असाल आणि योजनेसाठी पात्र असाल तर आजच अर्ज करून मुख्यमंत्री तार कुंपण योजनेचा लाभ घ्या.
FAQ
प्रश्न 1: तार कुंपण योजनेचा लाभ पुन्हा घेता येतो का?
उत्तर: नाही. ही योजना फक्त एकदाच मिळते. एकदा लाभ घेतल्यानंतर पुन्हा अर्ज करता येत नाही.
प्रश्न 2: अर्ज मंजूर झाल्यावर किती दिवसांत काम सुरू करता येईल?
उत्तर: अर्ज मंजूर झाल्यानंतर कृषी विभागाकडून सूचना दिल्यावरच काम सुरू करावं. मंजुरीपूर्वी कुंपणाचं काम सुरू केल्यास अनुदान मिळणार नाही.
प्रश्न 3: अधिक माहिती कुठे मिळेल?
उत्तर: तुमच्या गावातील ग्रामसेवक
कृषी सहाय्यक / कृषी अधिकारी कार्यालय
महाडीबीटी हेल्पलाईन नंबर: 1800-120-8040
मी नितिकेश, मागील 4 वर्षांपासून महाराष्ट्रातील विविध शासकीय माहिती, सरकारी नौकरी माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम करतोय. marathisathi.in या वेबसाईटवर तुम्हाला सर्व योजना एका ठिकाणी, अगदी सोप्या भाषेत समजून घेता येतील, कारण तुमचा हक्काचा लाभ मिळवायला माहिती असणं गरजेचं आहे!