TET Exam News: मित्रांनो, शिक्षक बनण्याचे स्वप्न कोणाचे नसते. आज जर विचार केला तर लाखो विद्यार्थी D.ed झालेले आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत. 2012 पासून शासनाने TET हि परीक्षा शिक्षकांसाठी सुरु केली होती. त्याआधी मात्र ज्याचे D.ed चे शिक्षण पूर्ण झाले ते सुद्धा शिक्षक बनून गेले होते. तसेच कोट्यवधी रुपयांचे घोटाळे सुद्धा करण्यात येत होते.
मात्र जेव्हापासून पवित्र पोर्टलच्या माध्यमातून TET,CTET आणि TAIT सारख्या परीक्षा घेण्यास सुरुवात झाली तेव्हापासून घोटाळे काही प्रमाणात कमी झालेले आहेत. कालच सुप्रीम कोर्टांने TET हि प्रत्येक शिक्षकाने उत्तीर्ण असणे अनिवार्य असल्याचे सांगितले आहे, ज्यामुळे मोठा झटकाच शिक्षकांना मानला जातोय. आटा टीईटी शिवाय शिक्षक बणने तर शक्य नाहीशी सोबतच जे आदी शिक्षक म्हणून रुजू झालेत त्यांना सुद्धा अभ्यास करून परीक्षा उत्तीर्ण करावी लागेल का? या संदर्भातील संपूर्ण माहिती आज आपण या आर्टिकल मध्ये बघुयात.
Also Read: Vihir Durusti Anudan: शेतकऱ्यांना खुशखबर..। जुन्या विहिरीच्या दुरुस्तीसाठी मिळणार 1 लाखाचे अनुदान
सुप्रीम कोर्टाने काय म्हंटले
शिक्षक होण्यासाठी शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टीईटी उत्तीर्ण असणे बंधनकारक असल्याचे सुप्रीम कोर्टाने म्हंटले आहे. ज्या शिक्षकांनी टीईटी उत्तीर्ण न होता शिक्षक बनले त्यांना सुद्धा आता हि परीक्षा उत्तीर्ण कार्वीच लागणार आहे. जे शिक्षक हि पात्रता परीक्षा उत्तीर्ण नसतील अश्या शिक्षकांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागेल. तसेच 2012 पूर्वी रुजू झालेल्या आणि 52 पेक्षा कमी वय असलेल्या शिक्षकांना पात्रता परीक्षा उत्तीर्ण असणे बंधनकारके केले आहे.
ह्या शिक्षकांना टीईटी पासून वगळण्यात आले आहे
मित्रांनो, शिक्षक अधिनियम 2009 पूर्वी नियुक्त झालेले शिक्षक आणि पाच वर्षापेक्षा कमी सेवा शिल्लक राहिलेल्या शिक्षकांना TET मधून वाळण्यात आलं आहे. म्हणजेच या शिक्षकांना कुठल्याही परीक्षेचा लाभच करण्याची गरज पडणार नाही आणि कुठली परीक्षा पासही होण्याची आवश्यकता नसेल. त्यामुळे अशा शिक्षक बांधवांना मोठा दिलासा मिळाला आहे. यांना जरी वगळण्यात आले असले तरी अजूनही हजारो शिक्षकांना मात्र TET च्या परीक्षेत ते सुद्धा दोन वर्षातच उत्तीर्ण होण्याचे आदेश सुद्धा सर्वोच न्यायालयाने दिले आहेत.
ह्या शिक्षकांना सोडावी लागेल नोकरी
राज्यातील जे शिक्षक TET उत्तीर्ण होणार नाही त्यांना मात्र स्वतःच नोकरी सोडावी लागणार असल्याचे मत सुद्धा सर्वोच न्यायाने मांडले आहे. त्यामुले सर्व शिक्षकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. टीईटी उत्तीर्ण करण्याचा कालावधी हा दोन वर्षाचा देण्यात आला आहे या कालावधीमध्ये जर शिकासकांनी हि परीक्षा उत्तीर्ण केली नाही तर मात्र त्यांची नोकरी सुद्धा जाऊ शकते.
राज्यसरकारने पुनर्विचार याचिका केली दाखल
जर राज्यातील शिक्षकांनी संप सुरु केले किंवा आंदोलने केलीत तर मात्र सर्व शाळा ठप्प पडतील. ज्यामुळे सर्वात मोठे नुकसान विद्यार्थ्यांचे होणार आहे. जे कि सरकारला अजिबात परवडणारे नसेल. म्हणून महाराष्ट्र सरकारनेच सुप्रीम कोर्टाच्या या निकालावर पुनर्विचार याचिका दाखल केली आहे. ज्यामध्ये महाराष्ट्र सरकार ज्याची आणि शिक्षकांची बाजू मांडेल. तर दुसरीकडे राज्य शिक्षक संघटनांनी सुद्धा पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. त्यांचे म्हणणे आहे कि अशापद्धतीने अचानक निर्णय घेता शिक्षकांमध्ये जनजागृती करून हा प्रश्न मार्गी लागू शकतो. तसेच सर्वोच न्यायालयाचे मुख्य सरण्याधीअश्नऔढा या प्रकाणामध्ये थोडं अधिक लक्ष घालण्याची विनन्तीसुद्धा शिक्षक संघटनानकरून करण्यात आली आहे.
निष्कर्ष
सर्वोच्य न्यायालयामध्ये नागपूर मधील बोगस शिक्षकांचा जो खटला होता त्यावर निर्णय देतांना सर्वोच न्यायालयाने सर्व शिक्षकांना धारेवर धरले होते. या निर्णयामुळे राज्यासह देशभरातील शिक्षकांमध्ये सुद्धा सांभरं निर्मण झाला आहे. आता महाराष्ट्र सरकारने जी पुनर्विचार याचिका केली त्यावर काय निर्णय होईल, हे बघणे सुद्धा महत्वाचे असेल.
नमस्कार,
माझे नाव आकाश भगत आहे, मी एक ब्लॉगिंग क्षेत्रामध्ये मागील 4 वर्षांपासून कार्यरत आहे. मी 2023 पासून योजना या टॉपिक वरती ब्लॉग लिहत आहो. त्यामुळे माझ्याकडे जवळपास 2 वर्षाचा योजना, नौकरी आणि इतर शासकीय माहितीच्या टॉपिक चा अनुभव आहे. तसेच मी सध्या marathisathi.in या साईट च्या माध्यमातून सर्व माहिती सोप्या आणि खऱ्या स्वरूपाची देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहे.