Tokan Yantra Yojana Maharashtra: शेतकऱ्यांना मिळणार टोकन यंत्र खरेदीवर 10,000 रुपयांचे अनुदान, असा करा अर्ज

Tokan Yantra Yojana Maharashtra
WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Tokan Yantra Yojana Maharashtra 2025: महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांना टोकन यंत्रावर अनुदान उपलब्ध करून देण्यासाठी फ्री टोकन यंत्र अनुदान योजना सुरु केली आहे. या योजनेचा माध्यमातून राज्यातील लाभार्थी शेतकऱ्यांना टोकन यंत्र खरेदीवर 10,000 रुपयांचे अनुदान दिले जातील. आजकाल शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी अनेक यंत्राची गरज लागते त्यापैकीच टोकन यंत्र सुद्धा आहे.

महाराष्ट्र राज्य हे कृषी प्रदान राज्य आहे, इथे ग्रामीण भागातील नागरिकांचा मुख्य व्यवसाय हा शेती आहे. राज्य सरकार शेतकऱ्यांना चांगला उत्पन्न होण्यासाठी, शेतकऱ्याला सशक्त बनवण्यासाठी नवीन नवीन योजना राबवण्यात येतात. Maharashtra Free Tokan Yantra Yojana हि राज्यातील गरीब व छोट्या शेतकऱ्यांसाठी खूप लाभदायक योजना आहे.

Panchayat Samiti Silai Machine Yojana 2025: पंचायत समिती कडून महिलांना फ्री शिलाई मशीन

Tokan Yantra Yojana Maharashtra म्हणजे काय?

Tokan Yantra

महाराष्ट्र राज्य सरकारने कृषी विभागाचा अंतर्गत राज्यातील ग्रामीण भागातील गरीब शेतकऱ्यांसाठी हि योजना सुरु केली आहे. या योजनेतून शेतकऱ्यांना टोकन यंत्रावर अनुदान दिल्या जाते. शेतकऱ्यांसाठी टोकन यंत्र हे अतिशय महत्वाचं यंत्र आहे.

शेतकऱ्याला पेरणी करण्यासाठी या यंत्राचा वापर करावा लागतो. ज्या शेतकऱ्यांकडे ट्रॅक्टर आहे किंवा शेती जास्त प्रमाणात आहे ते शेतकरी ट्रॅक्टरने पेरणी करतात. परंतु ग्रामीण भागातील छोटे शेतकरी ज्यांचा कडे शेती कमी आहे ते टोकन यंत्राचा वापर करतात.

टोकन यंत्र अनुदान

मनुष्य चालित टोकन यंत्रासाठी अनुदान हे खालीलप्रमाणे आहे.

  • लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत फवारणी पंपाच्या एकूण किंमतीपैकी 50 टक्के किंवा जास्तीत जास्त 10,000 रुपये इतके अनुदान मिळू शकते
  • बहुभूधारक शेतकरी : किंमतीच्या 40% किंवा जास्तीत जास्त रु.8,000/-

फ्री टोकन यंत्र योजनेचा मुख्य उद्देश

महाराष्ट्र फ्री टोकन यंत्र अनुदान योजना हि राज्यातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची योजना आहे. हि योजना सुरु करण्यामागे सरकारचा मुख्य उद्देश आहे गरीब वर्गातील शेतकऱ्यांना पेरणी करण्यासाठी सहायता करणे तसेच शेतकऱ्याचे मनोबल वाढवणे, शेतकऱ्याला सशक्त बनवणे हा हेतू आहे.

योजनेचा फायदा

Tokan Yantra Yojana Maharashtra ही योजना राज्य सरकारने ग्रामीण भागातील गरजू शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सुरू केली आहे. या योजनेतून लाभार्थी शेतकऱ्यांना अनुदानावर टोकन यंत्र दिल्या जाते. 10 हजार रुपये पर्यंत शेतकऱ्यांना अनुदान मिळू शकतो. या यंत्राचा माध्यमातून शेतकरी तूर, चना, सोयाबीन, मका सारख्या बियाण्याची पेरणी करू शकतो.

Tar Kumpan Yojana Maharashtra 2025: शेतकऱ्यांना तार कुंपणावर मिळणार 90 टक्के अनुदान

Tokan Yantra Yojana अर्ज करण्यासाठी पात्रता

फक्त ग्रामीण भागातील गरजू शेतकऱ्यांना लाभ मिळावा यासाठी सरकारने पात्रता जाहीर केल्या आहे. अर्ज करण्यासाठी अर्जदार शेतकरी हा महाराष्ट्र राज्याचा स्थानिक असणे आवश्यक आहे. 7/12 उताऱ्यावर शेतकऱ्याचे नाव असणे आवश्यक आहे. ज्या शेतकऱ्यांकडे स्वतःची जमीन आहे अशाच शेतकऱ्यांना योजनेचा लाभ घेता येणार आहे. अर्जदार शेतकर्याने मागील 3 वर्षात या योजनेतून यंत्र घेतलेले नसावे. सीमांत व अल्पभूधारक शेतकऱ्यांना फक्त योजनेचा लाभ घेता येणार आहे.

अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • बँक पासबुक
  • 7/12 उतारा (जमिनीचे दस्तऐवज)
  • स्वघोषणापत्र
  • जातीचा दाखला (आवश्यक असल्यास)
  • कोटेशन / पर्चेस बिल (तपासणीसाठी)

Tokan Yantra Yojana Maharashtra 2025 अर्ज करण्याची प्रक्रिया

फ्री टोकन यंत्रासाठी अर्ज पद्धती हि ऑनलाईन माध्यमातून केली जाते त्यामुळे MahaDBT पोर्टलवर तुमचे अकाउंट असणे आवश्यक आहे. अकाउंट नसेल तर तुम्हाला रेजिस्ट्रेशन करून घ्यावे लागेल आणि त्यानंतर तुमि योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता. अर्ज करण्यासाठी सगळी आवश्यक कागदपत्रे तुमचाकडे असणे आवश्यक आहे.

अनुदान कधी मिळते?

लाभार्थी पात्र असलेल्या शेतकऱ्यांना आधी टोकन यंत्र विकन घ्यावे लागणार त्यानंतर MahaDBT पोर्टलवर योजनेचा फॉर्म भरून आवश्यक बिल व दस्तऐवज अपलोड करावे लागतील. तुमचे अर्ज स्वीकारल्यावर अनुदानाची रक्कम बँक खात्यात जमा होईल.

निष्कर्ष

Tokan Yantra Yojana Maharashtra ग्रामीण भागातल्या गरजू शेतकऱ्यांसाठी ही योजना खूप उपयोगी आणि फायदेशीर ठरते. खूप सोप्या पद्धतींनी हि यंत्र चालवून शेतकरी आपल्या शेतात पेरणी करू शकतो. या योजनेमुळे शेतकऱ्याला दुसऱ्यावर अवलंबून नही राहावे लागणार. तुम्ही सुद्धा शेतकरी असाल आणि योजनेसाठी पात्र असाल तर आजच योजनेसाठी अर्ज करा आणि लाभ घ्या.

FAQ

1) टोकन यंत्राची किंमत किती आहे?

टोकन यंत्र हे त्याचाच कंपनी आणि क्षमतेनुसार अवलंबून असते, 15000 ते 25000 पर्यंत या टोकन यंत्राची किंमत राहू शकते.

2) अनुदानाची रक्कम बँक खात्यात कधी जमा होते?

तुम्ही अर्ज केल्यानंतर 30 ते 45 दिवसाचा कालावधी मध्ये पैसे बँक खात्यात जमा होते।

3) या योजनेचा लाभ एका शेतकऱ्याला किती वेळा घेता येतो?

एका शेतकऱ्याला 3 वर्षात एकदा लाभ घेता येतो.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *