Tractor Trolley Anudan Yojana: महाराष्ट्रातील शेतकरीबांधव हे एक उत्तम शेतकरी तर आहेच यामध्ये कुठलेही दुमत नाही. परंतु त्यांना त्यांच्या शेतीसोबत थोडी यंत्रांची जोड मिळाली तर तर अधिक चांगले उतपन्न ते घेऊ शकतात. परंतु काही शेतकऱ्यांनाही कर्ज काढून ट्रॅक्टर सारखे महागडे आधुनिक यंत्र तर खरेदी केले परंतु लाखो रुपयाची ट्रॅक्टरची ट्रॉली खरेदीकरण्यासाठी मात्र पैसे नाही आहेत. ज्यामुळे अनेक कामे त्यांची रखडली जातात. तर त्यांना आता काळजीओ करण्याची अजिबात गरज नाही आहे. कारण आज या आर्टिकल मध्ये आपण Tractor Trolley Anudan Yojana बघणार आहोत. ज्या अंतरागत तुम्ही तुमच्या ट्रॅक्टर साठी ट्रॉली खेडेकरण्यासाठी 1 लाखापर्यंत अनुदान अनुदान मिळवू शकणार आहेत.
Also Read: Kadba Kutti Machine Yojana 2025: शेतकऱ्यांना मिळणार 50 टक्के अनुदानावर कडबा कुट्टी मशीन
Tractor Trolley Anudan Yojana नेमकी काय आहे?
राज्यसरकारच्या कृषी यांत्रिकीकरण योजनेमधील एक भाग आणि एक योजना Tractor Trolley Anudan Yojana होय. हि योजना महाराष्ट्र सरकार अंतर्गत कृषी विभागामार्फत राबविली जाते. या योजनेचा लाभ हा फक्त राज्यातील सर्व ट्रॅक्टर धारक शेतकऱ्यांनाच मिळणार आहे. अनुसूचित जाती, जमाती किंवा महिला व अल्पभूदारक शेतकऱ्यांनी या योजनेसाठी अर्ज केला असता त्यांना 1.25 लाखाचे अनुदान एका ट्रॉलीवर दिले जाते, तर सर्वसाधारण शेतकऱ्याला 1 लाखापर्यंतअनुदान मिळते. आणि उर्वरित रक्कम मात्र स्वतः शेतकऱ्याला भरावी लागणार आहे.
योजनेचे उद्देश
शेतकरी दिवस रात्र हा शेतात राब रब राबत असतो हे आपल्या सर्वांनाच माहित आहे. मात्र शेतकऱ्याचे हे श्रम कुठे तरी आधुनिक तंत्रज्ञानाच्या माधयमातून कमी व्हावे आणि कमी वेळेत अधिक काम होऊन अधिक नफा शेतकऱ्यांना मिळवता यावा यासाठी हि योजना राबवण्याचा उद्देश महाराष्ट्र सरकारचा आहे.
अनुदानाची रक्कम व लाभ
| प्रवर्ग | अनुदान | रक्कम |
|---|---|---|
| सर्वसाधार शेतकरी | 50% अनुदान | 1,00,000 रुपये |
| महिला शेतकरी, ST,SC आणि अल्पभूदारक शेतकरी | 60% अनुदान | 1,25,000 रुपये |
जर समजा एका ट्रॅक्टर ट्रॉलीची किंमत हि 2 लाख रुपये असेल तर, त्या ट्रॉलीला खरेदी करण्यासाठी सर्वसाधारण शेतकऱ्याला 50% अनुदान म्हणजेच 1,00,000 रुपये मिळतील. तसेच जर अर्जदार हा महिला शेतकरी, ST,SC आणि अल्पभूदारक शेतकरी असेल तर त्यांना कमाल 60% अनुदान 1,25,000 रुपये पर्यंत अनुदान मळणार आहे.
योजनेचे पात्रता निकष
महाराष्ट्रातील शेतकरी असणाऱ्या अर्जदाराला या योजनेअंतर्गत ट्रॉली मिळू शकते. परंतु त्यांच्या काढे किंवा त्यांच्या परिवाराकडे एक ट्रॅक्टर असावे. योजनेसाठ अर्ज करणाऱ्या व्यक्तीच्या नावाने शेती असणे बंधनकारक असेल. मागील किमान दहा वर्षांमध्ये जर या योजनेअंतर्गत ट्रॅक्टर ट्रॉली घेतली असेल तर त्यांना या योजनेचा सध्यातरी लाभ मिळणार नाही. तसेच अर्जदाराचे बँकांसोबत आधार लिंक असणे आवश्यक असणार आहे.
Also Read: Tadpatri Anudan Yojana: ताडपत्री खरेदीसाठी 75% अनुदान, अर्ज झाले सुरु, बघा संपूर्ण माहिती
आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- जमिनीचा 7/12 उतारा व 8-अ
- ट्रॅक्टर असल्याचा पुरावा
- ट्रॉलीचे कोटेशन
- बँक पासबुक
- जात प्रमाणपत्र
- स्वयंघोषणापत्र
- ट्रॉलीचे तपासणीपत्र
असा करा ऑनलाईन अर्ज
शेतकरी बांधवांनो, Tractor Trolley Anudan Yojana चा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्र सरकारची अधिकृत वेबसाईट mahadbt.maharashtra.gov.in या अधिकृत वेबसाईट वरती जायचे आहे. तिथे कृषी यांत्रिकीकरन या विभागामध्ये जाऊन ट्रॅक्टर ट्रॉली अनुदान योजना या पर्यायावरती क्लीक करा. तुमच्या पुढे योजनेचा फ्रॉम येईल. तो फ्रॉम भरा आणि कागदपत्रे अपलोड करून सबमिट करा. परंतु हो हि सर्व प्रक्रिया करण्यापूर्वी तुम्हाला खाते असेल तर लॉग इन कारण आवश्यक असेल आणि जर खाते नसेल तर नवीन रजिष्ट्रेशन करून हि प्रोसेस करता येईल.
म्हत्वाची माहिती: योजनेचा अर्ज केल्यानंतर ट्रॉली खरेदीची घाई करू नये. अर्ज पात्र झाल्यानंतरच ट्रॅक्टर ट्रॉली खरेदी करावी नाहीतर लाभ मिळाणार नाही. तसेच सरकारी नोंदणीकृत डीलर पासूनच तुम्ही तरळली घायची आहे याची नोंद घ्या.
निष्कर्ष
शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी योजना म्हणजे कृषी यांत्रिकरण योजना होय. त्यामधि एक योजना भाग हि ट्रॅक्टर ट्रॉली योजना जरुरी असली तरी मात्र या योजनेतूम फार मोठी आर्थिक मांडत हि आपल्या शेतकरी बांधवांना होऊ शकते. म्हणून जास्तीत जास्त शेतकरायण हि योजना नक्की शेयर करा, धन्यवाद.
नमस्कार,
माझे नाव आकाश भगत आहे, मी एक ब्लॉगिंग क्षेत्रामध्ये मागील 4 वर्षांपासून कार्यरत आहे. मी 2023 पासून योजना या टॉपिक वरती ब्लॉग लिहतोय. त्यामुळे माझ्याकडे जवळपास 2 वर्षाचा योजना, नौकरी आणि इतर शासकीय माहितीच्या टॉपिक चा अनुभव आहे. तसेच मी सध्या marathisathi.in या साईट च्या माध्यमातून सर्व माहिती सोप्या आणि खऱ्या स्वरूपाची देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहे.