राज्यातील दिव्यांग बांधवांसाठी दिव्यांग मंत्रालयाचे नवीन सचिव श्री तुकाराम मुंडे साहेब यांनी मोठी घोषणा केली आहे. राज्य सरकार आणि केंद्र सरकार आपल्या देशातील दिव्यांग नागरिकांसाठी अनेक सुविधा व योजना जाहीर करतात, परंतु त्या योग्य पद्धतींनी राबवल्या जात नसल्यामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.
ज्या ठिकाणी सुविधा नाहीत, तिथे लगेच अहवाल द्यावा आणि शक्य तितक्या लवकर त्या सुविधा सुरू कराव्यात. अशी घोषणा तुकाराम मुंडे साहेबांनी केली आहे. चला तर जाणून घेऊ दिव्यांग नागरिकांना यापुढे सर्व सुविधांचा लाभ कश्या प्रकारे मिळणार आहे.
दिव्यांगांसाठी अनेक निर्णय घेतले जातात, पण प्रत्यक्षात त्यांची अंमलबजावणी किती होते?
दिव्यांग मंत्रालय सुरू झाल्यानंतरही लाभार्थी पात्र नागरिकांना अनेक सुविधा वेळेवर पोहोचत नाहीत. भ्रष्टाचार आणि खोट्या दिव्यांगांच्या प्रकरणांमुळे खऱ्या दिव्यांगांना योग्य लाभ मिळत नाही. तसेच, दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 नुसार ज्या सोयी-सुविधा दिल्या जाणार आहेत, त्या प्रत्यक्षात लागू होतात का, याबद्दल नेहमीच शंका निर्माण होते.
दिव्यांगांसाठी एक आशेचा किरण
दिव्यांग बांधवांसाठी हा एक आशेचा किरण ठरला आहे. दिव्यांग बांधवांच्या हक्कांसाठी प्रत्यक्ष कृती करणारे अधिकारी म्हणून तुकाराम मुंडे साहेबांकडे अपेक्षेने पाहिले जात आहे. या पत्रकामुळे त्यांच्या मनात सकारात्मक वातावरण तयार झाले आहे. पुढील काळात अशा आणखी मार्गदर्शक सूचना आणि पत्रके जाहीर होण्याची शक्यता आहे.
तुकाराम मुंडे यांचे महत्वाचे पत्रक
या पार्श्वभूमीवर दिव्यांग मंत्रालयाचे सचिव तुकाराम मुंडे यांनी नुकतेच एक लेखी पत्रक प्रसिद्ध केले आहे. त्यानुसार, सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालये, रुग्णालये, शैक्षणिक संस्था, बाजारपेठा, देवस्थानं, सार्वजनिक स्थळे आणि इमारतींमध्ये दिव्यांगांसाठी आवश्यक सुविधा असणे अनिवार्य आहे.
ज्या ठिकाणी या सुविधा उपलब्ध नाहीत, तिथे तातडीने अहवाल सादर करून त्या लवकरात लवकर सुरू कराव्यात. दिव्यांग बांधवांना ये-जा करणे, फिरणे किंवा वावरणे यात कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी प्रशासनाने योग्य ती पावले उचलणे गरजेचे आहे.
पुढचा मार्ग
सरकारकडून जाहीर झालेल्या योजना, हक्क आणि सुविधा या सर्व दिव्यांग बांधवांपर्यंत पोहोचणे खूपच गरजेचे आहे. समाजातील प्रत्येकाने या माहितीचा प्रसार करणे आणि दिव्यांग बांधवांच्या हक्कांसाठी आवाज उठवणे गरजेचे आहे.
निष्कर्ष
महाराष्ट्र राज्यातील दिव्यांग बांधवांसाठी केलेली हि घोषणा अतिशय महत्वाची आणि लाभकारी आहे. शासन, प्रशासन आणि समाज यांनी एकत्र येऊन दिव्यांगांच्या हक्कांची जपणूक केली, तर त्यांचे जीवन अधिक सुलभ, सुरक्षित आणि सन्मानाने जगता येईल.
मी नितिकेश, मागील 4 वर्षांपासून महाराष्ट्रातील विविध शासकीय माहिती, सरकारी नौकरी माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम करतोय. marathisathi.in या वेबसाईटवर तुम्हाला सर्व योजना एका ठिकाणी, अगदी सोप्या भाषेत समजून घेता येतील, कारण तुमचा हक्काचा लाभ मिळवायला माहिती असणं गरजेचं आहे!