Two in One Silai Machine: फक्त अर्ज करा आणि मिळवा टू-इन-वन सिलाई मशीन साठी 10000 रुपये!

Two in One Silai Machine
WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Two in One Silai Machine ही योजना महाराष्ट्र सरकारच्या आदिवासी विकास विभागाने सुरू केली आहे. यामध्ये राज्यातील अनुसूचित जमातीच्या महिलांना रोजगाराची संधी देण्यासाठी टू-इन-वन शिवणयंत्र योजना राबवण्यात आली आहे. या योजनेतून लाभार्थी पात्र महिलांना 10000 रुपयांचे अनुदान शिलाई मशीन खरेदीसाठी दिल्या जाणार आहे.

आजच्या काळात महिलांसाठी आणि घरबसल्या रोजगार करू इच्छिणाऱ्या लोकांसाठी शिवणकाम हा उत्तम पर्याय ठरतो. पारंपरिक हाताने चालणाऱ्या मशीनच्या तुलनेत आता आधुनिक Two in One Silai Machine अधिक सोयीस्कर व उपयुक्त ठरत आहे.

Mofat Solar Atta Chakki 2025: महिलांसाठी खास योजना! या महिलांना सरकार देतंय मोफत सोलर आटा चक्की, येथे अर्ज करा

Two in One Silai Machine म्हणजे काय? (थोडक्यात माहिती)

या मशीनला “Two in One” असे नाव देण्यामागचे कारण म्हणजे हे मशीन हातानेही चालवता येते आणि वीजेवरही चालवता येते. म्हणजेच वीज नसली तरी हाताने पायाने चालवून शिवणकाम करता येते आणि वीज असल्यास सहजतेने इलेक्ट्रिक पद्धतीने चालवता येते. या मशीनला इलेक्ट्रिक मोटर लावलेली असल्यामुळे ते वीजेवर सहज चालते आणि त्यामुळे शिवणकाम करणे खूप सोपे व जलद होते.

टु-इन-वन शिलाई मशीनचे उद्दिष्टे

या शिलाई एंचीने वर अनुदान देण्याचे मुख्य उद्देश म्हणजे अनुसूचित जमातीतील महिलांना घरबसल्या रोजगार मिळावा, त्या आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हाव्यात आणि शिवणकामातून नियमित उत्पन्न मिळावे हा आहे. ज्या महिलांना शिवण काम येते अशा महिलांसाठी चांगली संधी आहे. या राज्य सरकारच्या योजनेतून महिलांना ८५% अनुदान तर काही महिलांना १००% अनुदानावर सुद्धा हि शिलाई मशीन मिळत आहे.

मुख्य वैशिष्ट्ये

  • हाताने व वीजेवर चालणारे – दोन्ही सोयी
  • घरगुती वापरासाठी तसेच छोट्या व्यवसायासाठी उपयुक्त
  • वजनाने हलके आणि सहज वाहून नेता येणारे
  • विविध प्रकारचे कपडे शिवता येतात
  • वीज वाचवणारे आणि टिकाऊ मशीन

Two in One Silai Machine साठी पात्रता

Two in One Silai Machine मिळवण्यासाठी महिला महाराष्ट्र राज्यातील स्थायी रहिवासी असणे गरजेचे आहे तसेच ती महिला अनुसूचित जमातीची असणे सुद्धा आवश्यक आहे. महिलेचे वय १८ ते ५५ वर्ष असणे आवश्यक आहे. तसेच लाभार्थी पात्र महिलेला शिवण काम येणे सुद्धा गरजेचे आहे किंवा शिवण कामाचे प्रशिक्षण घेतले असल्यास प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

Nirdhur Chul Yojana 2025: सरकार देतंय मोफत निर्धुर चूल, लगेच अर्ज करा नाहीतर संधी हातची जाईल

आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • जात प्रमाणपत्र
  • रहिवासी दाखला
  • बँक पासबुक प्रत
  • पासपोर्ट साईज फोटो
  • पूर्ण भरलेला अर्ज
  • शिवण काम प्रशिक्षण (गरज असल्यास)

अर्ज कसा करावा?

Two in One Silai Machine योजनेची अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने केली जाते. त्यासाठी तुम्हाला https://scheme.nbtribal.in/register या अधिकृत वेबसाइट वर जावं लागेल. तेथे सर्वप्रथम “User Registration” हा पर्याय निवडावा. त्यानंतर आवश्यक माहिती नीट भरून आपले खाते तयार करावे. खाते तयार झाल्यावर खाते क्रमांकाने लॉगिन करून घ्यावे. Two in One Silai Machine Yojana साठी निवड झाल्यानंतर अर्जदाराने ऑनलाईन अर्ज फॉर्म भरावा. फॉर्ममध्ये मागितलेली सर्व माहिती नीट भरून आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत आणि शेवटी अर्ज सबमिट करावा.

निष्कर्ष

Two in One Silai Machine शिवणकाम करणाऱ्यासाठी इच्छुक महिलांना एक चांगली संधी आहे. घरी बसून आपला स्वतःचा व्यवसाय सुरु करू शकता. वीज असो वा नसो, शिवणकाम सुरू ठेवता येते. रोजगारासाठी तसेच घरातील छोट्या-मोठ्या गरजा भागवण्यासाठी हे मशीन महिलांसाठी एक उत्तम साधन ठरते.

FAQ

1) निवड कशी केली जाते?

अर्जदार महिलांची निवड शासनाच्या निकषांनुसार केली जाते. पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांची यादी अधिकृत वेबसाईटवर जाहीर केली जाते.

2) ही योजना संपूर्ण महाराष्ट्रात लागू आहे का?

हो, ही योजना राज्यातील अनुसूचित जमातीतील महिलांसाठी संपूर्ण महाराष्ट्रभर लागू आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *