Us Todani Yantra Anudan Yojana 2025: ऊस तोडणी यंत्र मिळवा 40 ते 50% अनुदानवर, असा करा अर्ज

Us Todani Yantra Anudan Yojana
WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Us Todani Yantra Anudan Yojana 2025: नागरिकांनो आपल्या महाराष्ट्रात उसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. तसेच महाराष्ट्र राज्य साखर उत्पादनासाठी आघाडीवर असलेले राज्य म्हटले जाते. ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ऊस तोडणी हा अंतिम आणि महत्वाचा टप्पा असतो. परंतु आजकाल तोडणी साठी शेतकऱ्यांना मजदूर भेटणे कठीण झालं आहे आणि खर्च मात्र वाढतच चालला आहे.

मुख्यतः आजचा काळात शेतकरी सर्व शेतीचे कामे हि आधुनिक यंत्राद्वारे करतात परंतु काही गरीब, सीमांत शेतकरी आधुनिक यंत्र घेऊ शकत नाही. अशा सर्व शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी Us Todani Yantra Anudan Yojana Maharashtra लागू करण्यात आली आहे. आजचा लेख मधून जाणून घेऊ ऊस तोडणी यंत्रासाठी अर्ज कसा करायचा आणि पात्रता काय आहे अशी सर्व माहिती जाणून घेऊ.

Divyang E Rickshaw Yojana Maharashtra 2025: दिव्यांग व्यक्तींना मिळणार लाखोंचं ई-रिक्शा मोफत, अर्ज कसा करायचा

Us Todani Yantra Anudan Yojana म्हणजे काय?

महाराष्ट्रात अनेक ठिकाणी उसाची पिके घेतली जातात परंतु शेतकऱ्यांना ऊस तोडणी साठी मजूर मिळणे कठीण झाले आहे त्यामुळे सर्व शेतकरी यंत्राचा साहाय्याने ऊस तोडणी करतात. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना ऊस तोडणी यंत्र खरेदी करण्यासाठी शासनाकडून आता 40 ते 50 टक्केपर्यंत अनुदान दिलं जात आहे. ऊस तोडणी यंत्र खरेदीसाठी राज्य सरकारने तब्बल ₹232.43 कोटींचं बजेट मंजूर करून जाहीर केलं आहे. तर शेतकरी मिंत्रांनो तुम्ही योजनेसाठी पात्र असाल तर लगेच अर्ज करा आणि लाभ घ्या.

या योजनेत काय मिळते?

Maharashtra Us Todani Yantra Anudan Yojana ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी अत्यंत लाभदायक आणि उपयुक्त ठरत आहे. या योजनेतून अनुदान शेतकऱ्याच्या जाती, आर्थिक स्थिती आणि यंत्राच्या प्रकारानुसार बदलते. काही वेळा 40% ते 50% पर्यंत अनुदान दिले जाते. या योजनेतून एका शेतकऱ्याला एक यंत्र घेता येणार आहे आणि कारखानदाऱ्याला 3 यंत्र घेता येणार आहे. 35 लाख रुपये पर्यंत या योजनेतून लाभ अनुदान दिल्या जाणार आहे.

योजनेचा उद्देश

मजुरांच्या कमतरतेमुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये आणि शेतकऱ्यांना ऊस तोडणीसाठी आधुनिक यंत्रांचा वापर करण्यास प्रोत्साहन देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. ऊस तोडणी यंत्राचा मदतीने शेतकऱ्याला तोडणीचा खर्च कमी लागतो त्यामुळे शेतकऱ्यांचा नफा वाढतो. तसेच कमी वेळात जास्त ऊस तोडणी होते त्यामुळे वेळ आणि श्रम दोन्ही वाचते.

योजनेचा लाभ

Us Todani Yantra Anudan Yojana राज्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय लाभदायक आहे. मुख्यतः एका शेतकऱ्याला एक ऊस तोडणी यंत्रावर अनुदान दिल्या जाते परंतु साखर कारखानदाराला या योजनेतून किमान 3 ऊस तोडणी यंत्रावर अनुदान दिले जाते. या योजनेतून शेतकऱ्यांना ऊस तोडणी यंत्र खरेदीवर 35 लाख रुपयांचे अनुदान मिळू शकते. यंत्राची 20 टक्के रक्कम शेतकऱ्यांना भरावी लागेल.

यंत्राद्वारे उसाची तोडणी केल्यानी शेतकऱ्यांचे श्रम आणि वेळ दोन्ही ची बचत होते. कमी वेळात जास्त ऊस तोडणी करता येते. शेतकऱ्यांना मजदुरांवर अवलंबून राहावं लागत नाही. योग्य वेळेत तोडणी केल्याने उसाची गुणवत्ता सुद्धा वाढते. अशे अनेक लाभ शेतकऱ्यांना या योजनेतून मिळू शकते.

योजनेसाठी पात्रता

Us Todani Yantra Anudan Yojana महाराष्ट्रातील असल्यामुळे अर्जदार हा महाराष्ट्राचा स्थानिक रहिवासी असणे आवश्यक आहे. तसेच अर्जदाराचा नावावर शेती असणे आवश्यक आहे. ज्या साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात ऊस तोडणी केली जाणार आहे, त्या कारखान्याचे संमतीपत्र अर्जासोबत असणे आवश्यक आहे.

यंत्र खरेदी करताना निवड करण्याची संपूर्ण जबाबदारी अर्जदार शेतकरी किंवा कारखाना मालक यांची असेल. या योजनेतून मिळालेल्या यंत्राचा वापर फक्त महाराष्ट्रातच करता येईल ते महाराष्ट्राबाहेर नेण्यास परवानगी नसेल. जर कोणी हे यंत्र महाराष्ट्राबाहेर वापरले, तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होईल आणि दिलेलं पूर्ण अनुदान शासन परत वसूल करेल.

Kanda Chal Anudan Yojana Maharashtra 2025: कांदा चाळीसाठी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार 50% अनुदान, अर्ज सुरु

आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • बँक पासबुकची प्रत
  • 7/12 उतारा आणि 8A उतारा
  • पासपोर्ट साईज फोटो
  • मोबाइल नंबर
  • ऊस लागवडीचा पुरावा

अर्ज करण्याची पद्धत

अर्ज करण्याची प्रक्रिया हि पूर्णपणे ऑनलाईन आहे. MahaDBT अधिकृत वेबसाइट वर योजनेचा संबंधित सर्व माहिती व सुविधा उपलब्ध आहे. अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला mahadbt.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यावी लागेल. येथे तुम्हाला लॉगिन करण्यासाठी फार्मर आयडी ची आवश्यकता लागेल. फार्मर आयडी टाकून पोर्टल लॉगिन करू शकता.

पोर्टल लॉगिन झाल्यावर तुम्हाला योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करायचा आहे. दिलेल्या फॉर्ममध्ये सर्व माहिती अचूक भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा. त्यानंतर फॉर्म सबमिट करा. फॉर्म सबमिट करताना तुम्हाला 23 रुपयांचे भुगतान करावे लागतील. या प्रकारे तुम्ही Us Todani Yantra Anudan Yojana Form Online भरून योजनेचा लाभ घेऊ शकता.

निष्कर्ष

Us Todani Yantra Anudan Yojana ही ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय लाभदायक योजना आहे. या योजनेतून हजारो शेतकऱ्यांना लाभ मिळाला आहे. तुम्ही सुद्धा योजनेसाठी पात्र नागरिक असाल तर आजच अर्ज करा आणि योजनेचा लाभ घ्या.

FAQ

1) यंत्र कोणतेही खरेदी करता येते का?

नाही. फक्त केंद्र सरकारच्या मान्यताप्राप्त तपासणी संस्थेकडून प्रमाणित यंत्रालाच अनुदान मिळते.

2) या योजनेत मिळालेलं यंत्र महाराष्ट्राबाहेर वापरता येईल का?

नाही. मिळालेलं ऊस तोडणी यंत्र फक्त महाराष्ट्रातच वापरता येईल. महाराष्ट्राबाहेर वापरल्यास कायदेशीर कारवाई होईल आणि अनुदानाची संपूर्ण रक्कम परत वसूल केली जाईल

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *