Yavatmal DCC Bank Bharti 2025: विदर्भातील उमेदवारांसाठी यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड मध्ये नोकरी करण्यासाठी सुवर्ण संधी आहे. इच्छुक उमेदवारांकडून कनिष्ठ लिपिक (Junior Clerk) व सहाय्यक कर्मचारी (शिपाई/Peon) या पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. एकूण 133 पदांसाठी ही भरती होणार असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2025 संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आहे.
Yavatmal DCC Bank Bharti 2025 रिक्त पदांची माहिती
- कनिष्ठ लिपिक (Junior Clerk): 119 पदे
- सहाय्यक कर्मचारी (शिपाई/Peon): 14 पदे
- एकूण पदे: 133
शैक्षणिक पात्रता
कनिष्ठ लिपिक (Junior Clerk): मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी किमान 45% गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक. संगणकाचे ज्ञान आवश्यक आहे. तसेच GDC&A, CAIIB किंवा बँकिंग डिप्लोमा असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.
सहाय्यक कर्मचारी (Peon): किमान 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक.
वयोमर्यादा
- कनिष्ठ लिपिक: 21 ते 35 वर्षे
- सहाय्यक कर्मचारी (Peon): 18 ते 35 वर्षे
वेतनमान
- कनिष्ठ लिपिक: रु. 15,200 + महागाई भत्ता (DA) + घरभाडे भत्ता (HRA)
- सहाय्यक कर्मचारी (Peon): रु. 12,200 + महागाई भत्ता (DA) + घरभाडे भत्ता (HRA)
अर्ज प्रक्रिया
- अर्ज करण्याची पद्धत: फक्त ऑनलाईन
- अर्ज सादर करण्यासाठी अधिकृत वेबसाईट: 👉 https://ydccbank.org/
- अर्ज सुरू होण्याची तारीख: 18 सप्टेंबर 2025
- शेवटची तारीख: 30 सप्टेंबर 2025 संध्याकाळी 5:00 वाजेपर्यंत
अर्ज शुल्क
सर्व पदांसाठी: ₹900 + जीएसटी ₹162 = ₹1062/- (परत न मिळणारे शुल्क)
निवड प्रक्रिया
उमेदवारांची निवड खालीलप्रमाणे होईल:
- लेखी परीक्षा
- मुलाखत (Interview/Personality Test)
PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
मी नितिकेश, मागील 4 वर्षांपासून महाराष्ट्रातील विविध शासकीय माहिती, सरकारी नौकरी माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम करतोय. marathisathi.in या वेबसाईटवर तुम्हाला सर्व योजना एका ठिकाणी, अगदी सोप्या भाषेत समजून घेता येतील, कारण तुमचा हक्काचा लाभ मिळवायला माहिती असणं गरजेचं आहे!