शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, गाय म्हैस खरेदीसाठी आता मिळणार तब्बल ९०% अनुदान | Cow Buffelo Yojana

Cow Buffelo Yojana
WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी एक खास योजना सुरु केली आहे त्याचे नाव आहे Cow Buffelo Yojana, या योजनेतून शेतकऱ्यांना गाय म्हैस खरेदीसाठी तब्बल ९०% पर्यंत अनुदान दिले जाणार आहे. राज्यात दूध व्यवसायाला चालना मिळावी यासाठी सरकारने हि योजना सुरु केली आहे. कमी खरचत जास्त उत्पन्न मिळवून देणारा हा व्यवसाय ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी उपयुक्त आहे.

चला तर जाणून घेऊ या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना कसा मिळणार आहे, तुम्ही जर शेतकरी असाल तर अर्ज करण्याची प्रक्रिया या लेखाच्या माध्यमातून जाणून घ्या तसेच योजनेचा लाभ, पात्रता, अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे अशी संपूर्ण या लेखात उपलब्ध आहे.

PM Kisan Next Installment: या दिवशी जमा होणार शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसान योजनाचा 21 वा हप्ता

महाराष्ट्रात गाय म्हशींसाठी किती अनुदान आहे?

शेतकऱ्यांसाठी शेतीसोबत गाय म्हैस पालन हा व्यवसाय एक स्थिर उत्पन्न देणारा व्यवसाय आहे. पण चांगल्या दर्जाच्या गायी किंवा म्हशी खरेदी करायला खूप पैसे लागतात. ही अडचण लक्षात घेऊन सरकार आता गाय-म्हैस खरेदीसाठी ९०% पर्यंत अनुदान देणार आहे. म्हणजेच, जर एखाद्या म्हशीची किंमत ₹७०,००० असेल तर शेतकऱ्याला फक्त ₹७,००० ते ₹१०,००० इतकाच खर्च करावा लागेल. उरलेले सर्व पैसे सरकारकडून मदत म्हणून मिळतील. यामुळे लहान आणि गरीब शेतकऱ्यांनाही दुग्धव्यवसाय सुरू करता येईल.

शेतकऱ्यांना किती अनुदान दिले जाते?

मुख्यतः हि योजना ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी राबवण्यात येते. त्यामुळे या योजनेतून मिळणारा पूर्ण लाभ हा शेतकऱ्यांसाठी असतो. गाय किंवा म्हैस खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना तब्बल ९०% अनुदान दिले जात आहे. कमी खर्च करून शेतकऱ्यांना जास्त उत्पन्न मिळावा असा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. यामुळे राज्यातील दूध उत्पादक चालना मिळेल.

योजनेसाठी पात्रता

  • अर्जदार महाराष्ट्र राज्याचा स्थायी रहिवासी असणे आवश्यक आहे.
  • अर्जदाराचे नाव सातबारा उताऱ्यात असणे आवश्यक आहे.
  • राज्यातील गरीब व गरजू शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ दिल्या जाणार.
  • ज्या शेतकऱ्यांकडे दूध गोळा करण्याची केंद्रे आहेत अश्या शेतकऱ्यांना प्राधान्य दिल्या जाणार.
  • मागील ५ वर्षात शेतकऱ्याने अश्या कुठल्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा.

अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड (शेतकरी व कुटुंबातील सदस्य)
  • सातबारा उतारा व शेतीचा पुरावा
  • रहिवासी दाखला
  • पॅन कार्ड
  • पासपोर्ट साईज फोटो
  • बँक खात्याची माहिती (आधार संलग्नित)

Bakri Palan Business Loan Yojana 2025: बकरी पालन करण्यासाठी सरकार देत आहे ५ लाख रुपये पर्यंत कर्ज, असा करा अर्ज

अर्ज कसा करावा

  • सर्वात आधी आपल्या जवळच्या जिल्हा पशुसंवर्धन विभागाच्या कार्यालयात जा.
  • तेथे अर्ज फॉर्म घ्या आणि त्यात लागणारी सर्व माहिती नीट भरा.
  • आवश्यक कागदपत्रे जोडून तो अर्ज जमा करा.
  • अर्जाची पडताळणी पूर्ण झाल्यावर शेतकऱ्याचे नाव लाभार्थी यादीत टाकले जाईल.
  • त्यानंतर शेतकरी गाय किंवा म्हैस खरेदी करून बँकेमार्फत पैसे भरतो.
  • खरेदीची नोंदणी झाल्यावर सरकारकडून थेट ९०% अनुदान शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा केले जाते.

ही संपूर्ण प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना थेट लाभ मिळतो.

सरकारचा उद्देश आणि पुढील योजना

ही योजना सुरू करण्यामागचा मुख्य हेतू म्हणजे शेतकऱ्यांना स्थिर आणि कायमस्वरूपी उत्पन्नाचा आधार मिळवून देणे. त्यामुळे शेतकरी केवळ शेतीवर अवलंबून न राहता दुग्धव्यवसायातूनही चांगला नफा कमावू शकतील. पुढील काळात सरकार आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून दुध प्रक्रिया उद्योग वाढवण्यावर भर देणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना फक्त कच्चे दूध विकण्याऐवजी दुग्धजन्य पदार्थ तयार करून जास्त कमाई करण्याची संधी मिळेल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *